Tuesday, August 21, 2012

आजकाल तिची आठवण म्हणजे .....

आजकाल तिची आठवण म्हणजे एक पाटशीवणीचा खेळच जणू
कितीही प्रयत्न केलातरी तिच्या विरहाची जाणीव करून देते
कधी नकळत खुद्कन गालावर हसू आणते  
तर कधी अश्रुंच्या रूपाने गालावर ओघळते........!!!

आजकाल तिची आठवण म्हणजे श्रावणात येणार्‍या पावसाची सरच जणू
 कितीही प्रयत्न केलातरी तिच्या आठवणीत भिजवून जाते
 ढग नसतानाही मनात आभाळ भरून आणते
तिच्या आठवणींच्या वेलीला नवी पालवी देऊन जाते........!!!

आजकाल तिची आठवण म्हणजे माझ्या मनाशी चाललेला लपंडावच जणू
कितीही प्रयत्न केलातरी तिच्या येण्याची एक चाहूल देऊन जाते
 माहीत असूनसुद्धा नकळत मागे फिरायला लावते
तिच्या पैंजणीच्या आवाजाची जाणीव करून देते........!!!

वैभव........

तिची ती नजर.........

तिची ती नजर माझ्या शांत मनाला घायाळ करून गेली
क्षणभर माझ्या शांत मनाला वणवा लाऊन गेली
क्षणात नभ फाटून जशी वीज पडावी
तसा एकच कल्लोळ माझ्या मनात ओढवून  गेली........!!!

तिची ती मोहक नजर मला बरच काही सांगून गेली
क्षणभर माझ्या शांत मनाला हुरहूर लाऊन गेली
प्रेमाची एक मंद वात आठवणींच्या रूपात मनात पेटवून गेली
तसाच तो अठवणींचा दिवा माझ्या आयुष्ययात पेटतच ठेऊन गेली........!!!

तिची ती नाजुक अदा माझ्यातील माझेपण हरवून  गेली
क्षणभर माझ्या मनाला विरंगुळा देऊन गेली
नकळत मला त्या आठवणींच्या झुल्यावर बसवून गेली
तसाच तो आठवणीचा झूला माझ्या आयुष्यात झुलतच ठेऊन गेली........!!!
     
वैभव .............

आज काल पाऊस ही.....

आजकाल पाऊस ही माझ्या सोबत पाटशिवणीचा खेळ खेळतो
 मी बाहेर पडायला तोही ढगांनी आभाळ भरून आणतो
क्षणभरात मला ओला-चिंब भिजऊन जातो
मी ही ओलाचिंब होऊन त्याच्या या खेळाकडे हास्याने पाहतो........!!!

आज काल पाऊस ही माझ्या सोबत पाटशिवणीचा खेळ खेळतो
क्षणभर का होईना मी-माझे  मी-पण विसरून जातो
क्षणभर तिच्या आठवणींच्या विश्वात विरून जातो
 क्षणभर दचकून ओल्या अंगाने शहारत तिचे स्वप्न विसरून जातो........!!!

माझ्या त्या सर्व आठवणी तो आपल्या येण्याने जागवून जातो   
तिच्या येण्याची चाहूल माझ्या मनाला लाऊन जातो
क्षणभर स्वताला सावरत मी ही पुढे रस्त्याने तसाच चालत राहतो........!!!

वैभव ............

Saturday, August 11, 2012

माझ हे असच चालायच ......

माझ  हे  असच चालायच आधी  नाही  म्हणायचं  आणि  दुसऱ्यांना  दुखवायचं,
मग  स्वतालाच  त्रास  सहन  करून  परत  त्यांना  खुश  करण्यासाठी  होय  म्हणायचं,
सदैव  दुसऱ्याचा विचार  करायचा ,
आपल्याला  कितीही  त्रास  झाला  तरी  चेहरा  मात्र नेहमी  हसरा  ठेवायचा,
माझ  हे  असच चालायच........!!!

सगळे नेहमी  म्हणतात  तू  हा  असाच  राहणार  तुझ्यात  कधी  बदल  नाही  होणार ,
यावर  मी  फक्त  हसायचं,
जरी  हसलो तरी - मनात  काय  आहे , हे  फक्त  माझं  मलाच  ठाऊक  असायचं ,
पण  पुन्हा  कुणीतरी  दुखवेल  म्हणून  तसच गप्प  बसायचं....
माझ  हे  असच चालायच........!!!

मी  नेहमी  दुसऱ्यांसाठी  झटतो  हाच  एक  सुखद क्षण मला माझ्या मनात साठवायचाय ,
जग काही  म्हणो  मला  हे  माझ काम  अविरत  चालू  ठेवायचं,
घरातीलसुद्धा  काही  म्हणोत  पहिल्यांदा  दुसऱ्यासाठी  जगायचं,  मग  घरांच्याचा  विचार  करायचा ,
माझ  हे  असच चालायच........!!!

दुसऱ्यांना  हसवत - हसवत आपणही आपल जीवन आनंदाने जगत राहायच,
हा-हा  म्हणता-म्हणता आयुष्य हे  असच  संपायच ,
दुसऱ्यासाठी  जगता –जगता  एक  दिवस , दुसर्‍यासाठीच  त्यांचं होऊन मरायचं,
माझ हे  असच चालायचं........!!!

वैभव ...........