Tuesday, August 21, 2012

आज काल पाऊस ही.....

आजकाल पाऊस ही माझ्या सोबत पाटशिवणीचा खेळ खेळतो
 मी बाहेर पडायला तोही ढगांनी आभाळ भरून आणतो
क्षणभरात मला ओला-चिंब भिजऊन जातो
मी ही ओलाचिंब होऊन त्याच्या या खेळाकडे हास्याने पाहतो........!!!

आज काल पाऊस ही माझ्या सोबत पाटशिवणीचा खेळ खेळतो
क्षणभर का होईना मी-माझे  मी-पण विसरून जातो
क्षणभर तिच्या आठवणींच्या विश्वात विरून जातो
 क्षणभर दचकून ओल्या अंगाने शहारत तिचे स्वप्न विसरून जातो........!!!

माझ्या त्या सर्व आठवणी तो आपल्या येण्याने जागवून जातो   
तिच्या येण्याची चाहूल माझ्या मनाला लाऊन जातो
क्षणभर स्वताला सावरत मी ही पुढे रस्त्याने तसाच चालत राहतो........!!!

वैभव ............