Thursday, November 29, 2012

आधी विचार करा, मग कृती करा

आधी विचार करा, मग कृती करा

स्वाभिमान असावा पण गर्व नसावा

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......

ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर
जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो.

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव
तुम्हाला देईल.

सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
 
नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला

नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला
नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला

जन्मोजन्मी वेड्यासारखी वात पाहायला
लाग आता लग्नासाठी मुलगा शोधायला
मलाच आहेर द्यावा लागेल तुझ्या लग्नाला!

नाही जमणार तुला एकनिष्ठ राहायला
कदाचित लागेल तुला उष्टं खायला
कारणीभूत ठरेल जे प्रेम वाढायला
मलाच यावं लागेल तुझ्या लग्नाला !

नाही जमणार तुला माझं मन सांभाळणे
नाही सहन होणार तुला माझं रागावणं
नाही आवडणार कदाचित माझं विचित्र वागणं
बेधुंद बेदरकार बेफिकीर असणारं माझं जगणं!

नाही कळणार तुला माझ्या मनाचा भाव
नाही घेता येणार तुला माझ्या हृदयाचा ठाव
नाही आवडणार कदाचित माझ्या प्रेमाचा गाव
वादळवाऱ्यात भर समुद्रात असणारी सुसज्ज नाव !

नाही जमणार तुला माझ्यासोबत चालायला
आपली वाट आपणच शोधायला
हृदयातील दु:ख हृदयातच दाबायला
चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणायला

नाही जमणार हा एक जन्म माझ्या सोबत
स्वगत म्हण किवा व्यक्तिगत
सुदैव म्हण किंवा दुर्गत
मग सात जन्मांची काय गत ?
 
पहिला पाऊस......

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं..
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्यापाशी
तळं होऊन साचायचं!

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!

म्हणून..पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

कपडे तंग हे अंगी घातले,वर केसांचा तुरा...

कपडे तंग हे अंगी घातले,वर केसांचा तुरा
कॉलेजकुमार आता झालास तू रे सांगे तव चेहरा
लांडा मनिला अंगी घातला,दिसतो चोळीवाणी
त्यातून दिसते छाती तुझीरे अगदीच केविलवाणी
नित्य तुझ्यारे मुखात असतो,गुटक्याचा तोबरा
कॉलेजकुमार आता झालास तू रे सांगे तव चेहरा
शर्ट तांबडा,पॅंट ही पिवळी, बुट ते टोकदार
छाप मारण्या साठी मुलींवर,तो सिगरेटचा धूर
ह्या सगळ्या रे मेकअप ने तू चालू दिसतोस खरा.
कॉलेजकुमार आता झालास तू रे सांगे तव चेहरा
उनाड मुलापरी,घुमत रहा तू, चित्रगृहाच्या दारी
त्यातून थोडी सवड काढुनि,कर तू मारामारी
भारतीय त्या परंपरेचा, वारस आहे बरा….
कॉलेजकुमार आता झालास तू रे सांगे तव चेहरा
 
पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा

पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा !

बाजुबंद त्या गोठ-पाटल्या बिलवर नक्षीदार
तुझ्या हृदी ग कुणी छेडिली रतिवीणेची तार
सांग कुणी ग अंगठीत या तांबुस दिधला खडा !
मुंडावळि या भाळी दिसती काजळ नयनांगणी
करकमळापरी कुणी गुंफिले सुवासिनीचे मणी
आठवणींचा घेउन जा तू माहेराचा घडा !
स्वप्नफुलांसह रमत रहा तू प्रेमळ संसारी
भाग्यवेल ही मोहरेल ग उद्या तुझ्या दारी
सौख्य पाहता भिजु दे माझ्या डोळ्यांच्या या कडा !

तुझं माझ्या आसपास वास्तव्य असलं

तुझं माझ्या आसपास वास्तव्य असलं
की माझं अस्तित्व
तुझ्या असण्यात विरघळू लागतं..
तो वेळ मी तसाच साठवत राहतो
माझे शब्द, माझं बोलणं
तुझ्या हसण्यात हरवू लागतं..
तुझी लगबग, सावरासावर सारं टिपत राहतो
माझं स्वत:चं असल्यागत..
पण दोघांमधलं काही श्वासांचं हे अंतर
ओलांडायचं धाडस होत नाही
 
माझ प्रेम कधी कलाल नाही तुला....

माझ प्रेम कधी कलाल नाही तुला,
म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,
मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर,
आणि तुही जिवापाड प्रेम केलास माझ्यावर,
पण का का कधी विचारल नाहीस मला,
माझ्या नकाराची भिती होती का तुला?
तुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल
दोघान्चाही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल,
आणि आता ते कायमच राहिल अपुर्णच
कारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच

Tuesday, November 27, 2012

तुला पहिल्याशिवाय राहवतच नाही...

वेड्या मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय....
आता काही सुचतच नाही...
तू, तू अन फक्त तूच,
त्याच्याशिवायदुसर काही दिसतच नाही...
अबोल हि प्रीत माझी,
तुला कधीच कळत नाही...
अन वेड हे मन माझ,
तुला पहिल्याशिवाय काही राहवत नाही...
तुला पहिल्याशिवाय,
काही...
राहवतच नाही...

कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम….

कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम
की …
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं
म्हणजे प्रेम …
कोणालातरी सारखं पाहत
रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की …
कोणालातरी विसरता न येणं
म्हणजे प्रेम ….
कोणाची तरी प्रत्येक गोष्ट
आवडणे म्हणजे प्रेम की …
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे
म्हणजे प्रेम …
कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम
की …
कोणाच्या सहवासात … स्वप्न
जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम

कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे
प्रेम की ….
कोणाचातरी विश्वास कधीच
न तोडणे म्हणजेप्रेम ….
कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम
की ….
कुणाची तरी उगीचच
माफी मागणे म्हणजे प्रेम ….
कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम
की ….

मागता कोणाला काहीतरी देणं
म्हणजे प्रेम ….
कोणासाठीतरी रडणारं मन
म्हणजे प्रेम की ….
कुणाच्या तरी आठवणींत
हसणारं मन म्हणजे प्रेम ….
कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम
की …
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …
कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम
की ….
आयुष्यभर कोणासाठी थांबणं
म्हणजे प्रेम की ….
कुणीतरी सुखात
असल्याचा आनंद म्हणजे प्रेम
की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद
म्हणजेच प्रेम….

पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही...

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत
आहे......
भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे
|
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार
मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच
माझ्या शुभेच्छा तुला |
निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील
|
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून
नेतील
|
त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब
तुझेच
असेल |
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात
माझा दिसेल |
वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे
नाही |
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे
नाही |
आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार
नाही |
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे
सोडणार
नाही |
जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील
का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील
का?
जाता जाता थोडे तरी मागे वळून
पाहशील
का?
प्रत्येक्षात
नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील
का?
बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल
|
गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर
मला सांगेल
|
कोठेतरी हृदयात इतिहास
सारा आठवशील
|
तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच
माझी राहशील |
नजरेने जरी ओळखलेस तू,
शब्दांनी मी बोलणार नाही |
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ
आणणार नाही |
नेहमीच पराभव झाला तरी, हक्क
तुझ्यावर
सांगणार नाही |
पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम
करणार नाही....

तुझं आणि तिचं सारखचं असतं.........

मुलीचें जिवन हे असंच
असतं,
तुझं आणि तिचं सारखचं
असतं..
ज्या कुटुंबात वाढुन मोठे
व्हायचं असतं,
त्याचं कुटुंबाला सोडून
जायचं असतं..
ज्या आईचे बोट धरून
चालण शिकायचं असतं,
त्याचं बोटाने कुंकू लावून
निघायचं असतं..
ज्या वडिलांच्या खांद्यावर
खेळून मोठ व्हायचं असतं,
त्याचं खांद्यावर डोकं
ठेवून रडायचं असतं..
ज्या बहीण
भावाला भांडूंण रड्वायचं
असतं,
त्यांनाचं सोडून
जाताना रडायचं
ही असतं..
मुलीचें जिवन हे असंच असतं..
तुझं आणि तिचं सारखचं असतं.

तुला एकदा पाहण्यासाठी...

या जन्मी तु माझी झाली
नाहीस म्हणुन काय झालं
मी लाखो जन्म घेईन......
तुझ्याबरोबर चालण्यासाठी...
तुझ्याबरोबर बोलण्यासाठी...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं..♥
मी लाखो जन्म घेईन....
तुझ्याबरोबर हसण्यासाठी...
तुझ्या अबोल ओठांतले शब्द ओळखण्यासाठी...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं...♥
मी लाखो जन्म घेईन.....
तुझ्यावर जीवापाड प्रेम कराण्यासाठी...
तुझ्या बोलक्या डोळ्यात
स्वतःला साठवण्यासाठी...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं....♥
मी लाखो जन्म घेईन.....
तुझ्या नकळत् तुला माझ्या जीवनात
आणण्यासाठी...
माझ मी पण हरवुण जाण्यासाठी...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं....♥
मी लाखो जन्म घेईन.....
तुझ्यावर निख्खळ प्रेम करण्यासाठी...
तुझ्या पावलांचे आभास अनुभवण्यासाठी.. .
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं...♥
मी लाखो जन्म घेईन.....
रात्र रात्र तूझ्याआठवनीत जागण्यासाठी...
तुझ्यावर निस्वार्थी प्रेम करण्यासाठी...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं....♥
मी लाखो जन्म घेईन......
तुला एकदा पाहण्यासाठी...

आपले नाते विसरू जाऊ नको....

एक अनोळखी ...
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे
नाते पूर्वीचे ते किती ..
ऋणानुबंध जुळले
छान ते किती ...
ना नाव माहिती होते ...
ना गाव माहिती होते...
तरी पण का वाटतंय ..
भेटलो होतो आधी कधी..
कळलेच नाही तू
मला आवडलीस कधी..
समजलच नाही मी
तुज झालो कधी..
एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको ...
प्रीत हि हृदयाची तोडू नको..
एक अनोळखी..
म्हणून विश्वास सोडू नको..
आपले नाते विसरू जाऊ नको....

सदा चरणी राहीन मी आई तुझ्या...

प्रेम तुझं हे एक मोठे आकाश
काळोखात आहे तू माझा प्रकाश
जमिनी एवढी तुझी माया
उन्हा मधली तू छाया
दाखवले तू मला
जग हे रंगीन
नऊ महिने सांभाळले तू मला
सहून वेदना कठीण
शिकवले तू जगायला मला
कशे फेडू मी तुझे उपकार
घेऊन जन्म हजारो सुद्धा
भेटणार नाही तुझ्यासारखी आई
तिन्ही त्रिकाळ
केले असतील मी बरेच पुण्य
जे आलो जन्माला पोटी तुझ्या
जन्म घेऊन मी झालो धन्य
सदा चरणी राहीन मी आई तुझ्या...

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी...

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...

कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...!

Saturday, November 17, 2012

स्वःताच्या दुःखात चूर असणं तर नेहमीच

स्वःताच्या दुःखात चूर असणं तर नेहमीचचं,
कधीतरी इतरांची असंख्य दुःख अनुभवून बघ..
स्वःताला कधी आजमावून बघ,
स्वःताच्याचं दुःखात थोडं हसूण बघ..
दुःखात हरवून जाऊन,
जगणं विसरण्याइतकं आयुष्य स्वस्त नाही..
अनमोल जीवनाला एक स्पर्श तर करुन बघ,
साद घालतील तुला गीत तुझेचं..
शब्द ज्यांचे कधी तू विसरली होतीस,
जमेल सुरांची मैफल पुन्हा..
स्वःतामधला आवाज ऐकून तर बघ,
पुन्हा रंग उजळून येतील..
तूचं अपु-या सोडलेल्या चित्राचे,
स्वप्न घेऊन थोडे रंग भरुन बघ..
खुणावू लागेल मोकळे आकाश तुला,
पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी..
पायातल्या सगळ्या बेड्या तोडून बघ,
बंधनं सगळी झुगारुन दे..
तुझ्या पंखांना थोडं आत्मविश्वासाचं बळ देऊन बघ,
नव्या वाटांवरचे निशिगंध फुलू लागतील..
आठवणींच्या वाटेवर थोडं थांबून बघ,
हिरवळीकडे एकदा पाहून..
नवीन श्वास अंतरात भरुन तर बघ,
शक्य आहे सगळं..
जगता येण्यासारखं खुप आहे आणखी,
थोडं चाकोरी बाहेर जाऊन तर बघ..
स्वःताला नवीन जन्म घेण्याची,
एक संधी देऊन बघ..
एक संधी देऊन बघ.

शब्द काही वळत नाही

शब्द काही वळत नाही
भावना काही कळत नाही
जोडले जातात शब्द मनात
पण कागदावर काही उमटत नाही

होती एक वेळ अशी
जेव्हा शब्दा-शब्दांवर बनायची कविता
आता तर शब्दा सुद्धा सुचत नाही

तर कशी सुचेल कविता
झाली होती माझी चूक
जे मी तुझ्या प्रेमात पडलो
कधी इथे कधी तिथे
कोपऱ्यात बसून रडलो

संपले माझे शब्द
 अपुऱ्या पडल्या माझ्या भावना
ह्या हृदयात तूच आहे
हे तुला कधी कळेना

तिच्या गो-यापान हातावर

तिच्या गो-यापान हातावर
मेंदी कशी खुलून यायची
त्यात ती येताना ओठांवर
जास्वंद चुरडून यायची

ती हसताना प्राजक्तं सांडायची,
अंगभर चाफा लावून यायची

बोलताना ओठ मुडपायची, इकडे
माझ्या कानाची पाळी लाल व्हायची

काळ्याभोर शेपट्यावर कधी मोगरा,
कधी अबोली माळून यायची

मंद वारा जरी स्पर्शला तिला
तरी ती अत्तराची कुपी होउन जायची

चुकून किंवा मुद्दाम, जरा झाला स्पर्श,
ती लाजाळूचं झाड व्हायची
तिचे मेंदीचे हात हातात घेतले की
ती माझी वेल व्हायची.

अभ्यास जरा जास्त आहे...

अभ्यास जरा जास्त आहे, दरवर्षी वाटत,
दरवर्षी syllabus घेऊन, semester मनात दाटत..
तरी lectures करन चालु राहत bunking चालत नाही,
common off शिवाय मनामध्ये कोणीच बोलत नाही.....
तितक्यात कूठून एक सुट्टी time table मध्ये येते,
अभ्यासातला काही भाग पंखाखाली घेते,
syllabus पेट्रोलसारखा संपत राहतो,
मन, बुद्धी, आनंदावरती - career वरती जळू लागतो,
college संपून सुट्ट्यांचा पुन्हा सुरु होतो खेळ,
अभ्यासामागून चालत येते मौजमजेची वेळ,
चक्क डोळ्यासमोर semester syllabus बदलून घेतो,
सुट्ट्यांमध्येही college मध्ये कुठून professor येतो....!!!

तुला पाहुनी .......

ये ना , ये ना , तु ये सजनी..... ये माझ्या ह्या अंगणी....
दे प्रेमाला माझ्या जरा...तुझ्या प्रेमाची ती रागिणी....

तुला पाहुनी तुला पाहुनी
तुझ्या प्रितिच्या मनी राहुनी
तुझ्या संगती रंग रंगती
तु्झ्या भोवती फुले गंधती
झालो वेडा मी तुझ्यासाठी
प्रितिच्या फुला तुझ्यासाठी
चंद्र वेडा जसा चांदणी....

स्थिती आहे तशी ह्या मनी...
हवं आणखी काय, मला गं प्रिये
जन्मोजन्माचं हे नातं आहे
तु लेखनी माझ्या मनाची प्रिये
प्रेमाची कहानी लिहून दे
देखणी तुझी हर एक अदा
अदांवरती तुझ्या झालो मी फिदा
प्रेमदेवतेची तु आरती
रुप तुझे आहे चंदनी....

ये ना , ये ना ,तु ये सजनी..... ये माझ्या ह्या अंगणी....
दे प्रेमाला माझ्या जरा...तुझ्या प्रेमाची ति रागिणी....

देव लोकातल्या कोण्या राणी साठी कुणीतरी घेऊन जाताना

देव लोकातल्या कोण्या राणी साठी कुणीतरी घेऊन जाताना गुलाब फुल,
सांडली असेल पाकळी एक ती म्हणजे तू....

रंग गोरा मन निर्मळ,
पापण्यांत मदनाचे ओघळ,
ओठांवरी मोगर्याचा भास,
गंध कस्तुरी अंगास.
अशी तू दिसतें मोहिनी, कामिनी,

तुला बघताना वाटे तू हवीस जीवनी.
वारा जोराचा वाहिल्यावर सुद्धा तुला खरचतट असेल कदाचित,
विरघळत असेल रंग घामाने वगैरे,
तू थांबून थांबून बोलतेस तेव्हा वाटते,

शब्दालाही भीती वाटत असावी त्रास होईल तुझ्या जिभेला वगैरे .........
तुझी हळुवार हालचाल खिळवत ठेवते नजर तुझ्यावर,

रुमाल सुद्धा इतक्या नाजुकतेने उचलतेस कि त्याचीही घडी विस्कटत नसेल कदाचित,

कापसाचा देह सारा,
कापसाचा स्पर्श सारा,
वाराही जोराने वाहता,
येत असेल अंगी शहारा,

इतके नाजुकपणपण बाई काय कामाचे,
कि प्रत्येक स्पर्शावर लागे पहारा,
शरीरावर तुझ्या तांबूस लव जसं सांजवेळी किरणं सोनेरी,

मनमोहक....... जीवघेणी
भुवया धनुष्याकार .......... आणि खाली नितळ नजरेचा बाण.
बोटात हिर्याची अंगठी जसं हिर्यावर हिरा चढवलेला.
मनगटात नाजुकसे घड्याळ...... एकच बांगडी.
गळ्यात नाजुकशी माळ त्यात हृदयाचा आकाराचं लॉकेट सवंगडी.

खांद्यावर सावरलेली ओढणी.....पाठीमागे सोडलेली वेणी.
इतकाच तुझा साज तरी वरदान तुला कि तू रुपाची खणी......
अगदी देखणी...........मनमोहिनी.....मनमोहिनी......

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं......

"आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं
असली जरी वाट कठीण चालतच जायचं असतं

आयुष्यात मात्र कधी मागे सरायचं नसतं
असेल विश्वास आपल्यांवर जरी
परक्यांवर ठेवायला कधी कातरायचा नसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचं असतं
नवीन काही तरी शोधताना जुन्यांना मात्र कधी विसरायचं नसतं
पण जुन्यांच्या साथीत राहून नव्यांनाकधी डावलायच नसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं

आयुष्यातल्या कटू आठवणी आणि सुखी क्षण वाटण्यासाठी
कुणीतरी असावं लागत असतं
म्हणूनच देवाने बनवली आहे मैत्री या जगात
खरया मित्रांचं ते कर्तव्य असतं पण
खोट्याना ते जमेलच असं नसतं
म्हणूनच आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं..

आयुष्य असते एक लढाई
ती प्रत्येकालाच जिंकावास वाटत असतं
हरलो जरी त्यात कधी खचायचा नसतं
पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकायचंअसतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जरी हरलो तरी साथ घ्यायची जिंकनार्याची
कारण तो सुद्धा हारल्यानंतरच जिंकायला शिकलेला असतो
अनुभवाच्या बोलातून त्याच्या सगळं काही शिकायचा असतं

आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं

आयुष्यात जे जे काही घडतं ते सगळं पहिल्यांदाच आणि नवीनच घडत असतं
पण घडून गेल्यावर मात्र ते कधी विसरायचा नसतं
त्यातूनच घेऊन बोध चांगल्या वाईट गोष्टींचा

आयुष्य सुंदर बनवायचं असतं
म्हणूनच म्हणतो आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं.....
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं...."

आठवणींच्या आरश्यात जेव्हा

आठवणींच्या आरश्यात जेव्हा …. डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात …. त्या हलत्या आरशात मला …. माझे दोन दोन चेहरे दिसतात …. अश्रू होते का पाऊस …. हे ओळखणेही अवघड जाते …. अश्रू काय आणि पाऊस काय …. पाहणार्याला दोन्ही सारखेच असते …. बर्याचदा तुझ्या आठवणी …. पावलं न वाजवताच येतात …. जाताना मात्र मनाच्या रस्त्यात …. तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात …. अवेळी आलेला पाउसही …. सगळं उध्वस्त करतो …. भर दुपारी भरल्या ढगांनी …. काळोखी संध्याकाळ करतो ….

Sunday, November 11, 2012

पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर!

पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर!
आणि इथे आत नुसता आठवणींचा पाऊस
बाहेरच्या पावसापेक्षाही मुसळधार कोसळतोय!
तुझे नी माझे कितीतरी पाऊस सहज कवेत घेत....
तुला आठवतं आपण पहिल्यांदा एकत्र पावसात भिजलो होतो....
पावसापेक्षाही तुझ्या सहवासाने येणारा शहारा!
नंतर जसं काही व्यसनच लागलं पावसाचं....
दरवेळी नव्याने पाऊस अनुभवायचं....
आणि मग कितीवेळा त्या कोसळणार्‍या धारांमधे हरवून जायचो आपण...
स्वत:ला विसरून.....
आणि अचानक एके दिवशी पाऊस रुसला माझ्यावर...
आता इथे कायमचाच दुष्काळाचा मुक्काम आहे!
माझं भेगाळलेलं मन वाट पहातंय पावसाची
तू म्हणशील, की इतका आठवणींचा पाऊस आहे की.....
पण तुला माहीत आहे ना....
इतकं पाणी असलं सगळीकडे तरी
चातकाची तहान भागायला पावसाचेच थेंब हवेत ना?
हल्ली नुसतंच भरून येतं मनाचं आभाळ..
माझा पाऊस तर कधीच वाहून गेला डोळ्यांमधून.....
आता तुझा पाऊस पाठवशील? 

प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू

प्रपातासारखा रोरावत कोसळणारा तू
आणि नदीसारखी स्थिर, शांत मी
उन्मत्त वृक्षासारखा वादळाशी झुंजणारा तू
आणि जमिनीशी नातं जोडणारी मी
क्षितीजाच्यापार झेपावणारा तू
आणि किनार्‍यावरच वाळूचं घरटं जपणारी मी
'साथ देशील का' विचारतोयस खरा
पण भीती वाटते मला,हे सगळं कसं काय जमणार मला?
****
तो

कोसळणारा प्रपात दिसतो सगळ्यांना
पण कड्याच्या टोकापर्यंत शान्त वाहून
त्याला शक्ती देणारी नदीच असते ना?
वृक्ष जेव्हा झुंजतो वादळाशी
मुळं घट्ट धरून ठेवून
त्याला आधार देणारी जमीनच असते ना?
आणि वेडे,पक्षी क्षितिजापार झेपावला तरी
समुद्रावर थोडच विसावणार तो?
संध्याकाळी परतून यायला,घरटंच हवं ना त्याला? 

मी उभा होतो किनार्‍यावर

मी उभा होतो किनार्‍यावर
शांत, स्तब्ध, निश्चल
आणि एक तडाख्यात चिंब चिंब करून गेलीस तू....
वरवर तसं काहीच नाही बदललं
पण आतपर्यंत काहीतरी हललं नक्कीच
थोडंसं गूढ, तरी हवंहवंसं..
तू भरतीचं उधाण लेऊन येताना,
कोसळलीच तुझी आतुरता
आणि ओहोटीसंगे मागे फिरलीस ना,
तेव्हा जाणवली तुझी कासवीस नजर......
असह्यच झाला मला माझा निश्चलपणा!
आणि मग हळूहळू
कणाकणाने तुटत गेलो मी
आता इतरांनाही जाणवलाय बदल
लोक म्हणतात 'खडक झिजला किनार्‍याचा'
बरोबरच आहे, त्यांना कसं कळणार
आता माझा प्रवास अखंड तुझ्या सोबतच-
किनार्‍यावरची रेती होउन!!! 

एकांत तसा आपल्याला एकटा कधीच भेटत नाही

एकांत तसा आपल्याला एकटा कधीच भेटत नाही
जेव्हा जेव्हा भेटतो, सोबत आणतोच काही ना काही

एकांत कधी हळवा, सोबत ठेवणीतल्या आठवणी
क्षणात हलकेच हसू, तर क्षणात डोळ्यात पाणी
आठवणींच्या गावातून मग परत येताच येत नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कधी एकांत कातरवेळी हूरहूर सोबत घेऊन येतो,
सरत्या क्षणांच्या गडद सावल्या मानामधे ठेवून जातो
मनाचे दिवे उजळले तरी हूरहूर मात्र शमत नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कधी एकांत बोलका होतो, शब्दांचं मग चांदणं होतं
एक शब्द उच्चारला तरी त्याचंसुद्धा गाणं होतं
गाण्यच्या त्या स्वरांची साथ मग सुटत नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कधी एकांत दोघांचा होऊन दोन मनं सांधू लागतो
एकेका स्वप्नाची काडी घेऊन प्रेमाचं घरटं बांधू लागतो
स्वप्नांच्या त्या घरट्यातून मन बाहेर येतच नाही
आणि मग एकांत एकटा भेटतच नाही.....

कुणही सोबत आला तरी त्याचं एकच सांगणं असतं
एकांत काही क्षणांचाच - बाकी सोबतच जगणं असतं
त्या काही क्षणातच वेचावं स्वत:साठी थोडं काही
म्हणूनच तर एकांत एकटा कधी भेटत नाही 

Tuesday, November 6, 2012

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज canteenच्या कटींगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
A\C Coneference roomsमध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी, कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODCमध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो-तो projectमध्ये बिझी ज़ालाय
भुला भटका missed call आता महाग झालाय
forwards आणि chain mailsमध्ये खुषालीची मैल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलेब्रेशन्स,पार्टीज साठी pizza hutchaचा रस्ता गाठतो
vegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो
पण pocket moneyसाठवून केलेल्या partyची मजा ह्यात शोधत आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
officeमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आह

ते पण एक वय असतं

ते पण एक वय असतं
दिवसभ पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत एम . एस . ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या ' डोमिनियन स्टेटस ' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

मैत्र! एक गोंडस नाव...

मैत्र! एक गोंडस नाव, एका नात्याचं. रम्य बालपणात;
त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं आपल्याबरोबर, नाही?
या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा. समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून.
मग वाळू सोडून नावेत बसतो आपण; लाटांवर स्वार होण्यासाठी, एकटेच.
पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला. कायमची चुकामूक.
मग आपापल्या वाटेवरून चालत राहायचं, एवढंच उरतं आपल्या हातात.
पण त्या मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचं काम चोख बजावतं आपलं मन.
आणि जसा जसा आयुष्याचा किनारा जवळ येऊ लागतो, तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा.

प्रेम मागुन मिळत नाही

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वेड करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं.

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना……..
हा भास तुझा होताना……..

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात........

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..

...प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय 'chat' वरच संपलेले असतात..

मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं..
आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. ..

'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..

'Available' आणि 'Busy' मध्ये
प्रतेकाचा status घुटमळत राहतो...
आपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो..

ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..

मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net''ची जाळीच का असावी?

कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....

चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ..

आधीच ठरले होते तुझे माझे नाते

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते 

एक नाते मैत्रिचे

एक नाते मैत्रिचे
आपल्या आयुष्याला कधी सुंदर कलाटणी,

तर कधी वेडेवाकडे वळण देणारे!
एक नाते मैत्रिचे सुख-दुखात साथ देणारे

तर कधी अर्ध्या वाटेवरचं सोडून जाणारे!
एक नाते मैत्रिचे

चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारे,
तर कधी चूकीच्या रस्त्यावर चालत जायला सांगणारे!

एक नाते मैत्रिचे
सुर्यासारखे तेजस्वी प्रकाश देणारे

तर कधी अंधारातच सोडून जाणारे!
म्हणूनच, तर मैत्री करावी

सुख-दुःखात साथ देणाऱ्या मित्रांशी
ना चूकीच्या रस्त्यावर चालावला सांगणाऱ्यांशी

म्हणून.. मैत्रीचे नाते असावे
फुल-काट्यांच्या जोडीसारखे,

नेहमीच कष्टाने सुखी रहंणारे!

वेळ आली तर तुलाही सांगीन

वेळ आली तर तुलाही सांगीन,
आयुष्य कस जगायचं असत.
एका-एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचा असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
मन कस जिंकायचं असत.
आवडी-निवडी सांगताना कस
मनात मन गुंतवायच असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
स्पर्श कसा करायचा असतो.
नाजूक उमललेल्या ओठांवरून कसा
हळुवार हात फिरवायचा असतो.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
दुखं कस झिजवायच असत.
अश्रूंचा नवीन संसार करून
सुखाने कस नांदायचं असत.
वेळ आली तर तुलाही सांगीन,
प्रेम कस करायचं असत.
विरहात प्रेमाची आहुती देऊन
क्षितिजाकडे कस बघायचं असत

जगतांना किती खेळले जुगार आम्ही

जगतांना किती खेळले जुगार आम्ही,
दुखाने पेटविली जीवनाची सिगार आम्ही
नका छेड काढू नशिल्या आसवांची
पापण्यांची तोरणे ठेविली उधार आम्ही
भले ते लोक होते जे रडून गेले
मांडला न कधी अश्रूंचा बाजार आम्ही
जरी शोक किती वेचले ओंजळी मधुनी
धार जखमांची जपली अलवार आम्ही
कशास शोध आता मंद काजव्याचा
सुर्यास ही केले अता उबदार आम्ही
हे सागरा ! जरा जपून वाग अता
कैद तुझी केली किनार आम्ही
नका अता पैज कासवा वरी लावू
किती तरी ससे केले पसार आम्ही
जरी पाहुणे होतो दोन-चार घडीचे
फेकले तुमच्यावरी शेर हजार आम्ही

जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असतं

जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असतं
कोणीतरी..
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असतं
कोणीतरी..
...
कोणाला तरी हसतांना लपुन बघत असतं
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत असतं
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असताना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असतं कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असतं
कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट
असतं कोणीतरी.

ओळखत जरी असलो एकमेकना

ओळखत जरी असलो एकमेकना एक वर्षापासून पण कधी एकमेकासमोर प्रेमाच्या गोष्टी केल्याच नाही.
का?त्याने बोलवल्यावर न विचार करता त्याला भेटायला जाते.
ही फक्त मैत्री आहे की प्रेम.
क?जेव्हा घरी जाण्याची वेळ येते तेव्हा एकटे सोडायला तो घाबरतो.
काळजी तर मित्र मैत्रिणी सुधा घेतात.
क? दूर जाताच एकमेकना विचारावे तू व्यवस्तीत पोहचलास ना.
भेट जरी दररोज होत नसली तरी विचार मात्र त्या व्यक्तीचाच करतो.
का? आम्ही दोघे एकमेकना सांगू शकत नाही की खरच मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते.
का? भेटल्यावर मात्र प्रत्येक क्षण अविस्मरणीय जगायचा.
का?मी एखाद्या मुलाबद्ल सांगितल्यावर तो इग्नोर करतो
का? त्याने कोणत्या मुलीबद्दल विचारल्यावर मी सुधा माझ्या भावना लपवून ठेवते.
का? अस वाटत संपूर्ण आयुष्य त्याच्या मिठीतच घालवाव
भावना मात्र दोघांनाही माहिती आहे पण व्यक्त करायला आम्ही दोघे सुधा का घाबरतो.
का आम्ही प्रेम व्यक्त केल्यावर आमच मैत्रीच नात दूरावेल का?.

एक काळ असा होता..

 एक काळ असा होता..
बोलायची हिंमत व्हायची नाही..
मनात असून पाहायचं नाही..
आणि अजून काही बाहि..
आणि आज..
आज कुठून तरी बळ आलंय..
आज मनात काही ठेवत नाही..
आज मी आतबाहेर सारखाच..
तरी आज.. आज मी तसा एकटाच..
कारण काही कळत नाही..
हि वेळ काही टळत नाही..
चालले हातचे क्षण तरी,
नशिब काही पळत नाही..
मी कालही काही शोधत होतो..
मी आजही काही शोधत आहे..
प्रश्न जरा झालेत सोपे..,
पण उत्तर काही साधत नाही..
मी कालही कसल्या शोधात होतो
मी आजही काही शोधत आहे..

मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते

मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते, अनोळखीशी मैत्री मनात घर करून जाते,

तो सहवास अगदी हवाहवासा वाटतो, चंद्र आणि तारयांसोबती गप्पा करू लागतो,

मनात विचारांचा चालू असतो खेळ, पण काही गोष्टींशी बसतच नाही मेळ,

त्या नात्याचा गंध काही कळतच नाही, पाउले वेगळ्या दिशेने चालतात पण मन काही वळतच नाही,

दिवस - रात्र गप्पांचा चालू असतो प्रवास, कधी जर नाही काढली तिने आठवण तर होतो त्रास,

त्या नात्यामध्ये अचानक आपलेपण वाढते, सतत मन तिचीच आठवण काढ़ते,

रागावणे, रुसने, एकदम अधिकार गाजवणे, जसं माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मीच असणे,

मैत्रीच्या नावाखाली हे असचं चालू असतं, कोण विचारेल अगोदर मन वाटचं बघत असतं,

जोड्या स्वर्गात बनतात, त्या अशाच कुठेतरी भेटतात,

कित्येकांचे स्वप्न साकारतात, तर काही पत्यांसारखे कोसळतात,

मी ही आज त्याच वाटेवर चालतोय, माझ्या भावना अशा शब्दात मांडतोय,

कळत नाहीये ती मैत्री आहे की प्रेम, म्हणून तुमच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मागतोय....

रोज अनेक चेहरे दिसतात

रोज अनेक चेहरे दिसतात
पण कॉलेजमधल्या त्या
चेहऱ्याकडे बघायची
मजा काही वेगळीच होती

हे सर्व आठवल्यावर वाटते
अश्या त्या कॉलेज लाईफ़ची
मजाच काही वेगळीच होती..............

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास
जो सुरु होतो,
आपल्या जन्मापासुन
न कदाचित
मरणानंतरही संपत नाही.

अनेक उन्हाळे-पावसाळे
पहायला मिळतात या प्रवासात.
काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात,
तर काही कायमचा
धडा शिकवुन जातात

काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात
तर काही जाणुन बुजुन
पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने
अर्धवटच राहुन जातात

अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं".

एकदाची उगवली ती सकाळ

एकदाची उगवली ती सकाळ
वाट पहात होतो जिची

होते मन उतावीळ
तिच्या तोंडुन ते शब्दं ऎकण्यासाठी

पण ते शब्दं माझ्यासाठी
नव्हतेच कदाचीत

त्यानंतर वाईट असे कधी
वाटलेच नाही

डोळ्यात ह्या अष्रु
कधी तरळलेच नाहीत

ह्या पुढे कदाचीत प्रेमाचा
विचारही हे मन करणार नाही

हसाय्च्याही आधी खुप
वेळा विचार करेल हे मन

आहे खात्री मला ती विसरणार नाही
तरीही मी काही बोलणार नाही

असे असुनही वेडे हे मन माझे
काही केल्या शांत बसेना

आजही मनात कुठेतरी आहे एक आस
की ती येईल परत कदाचित...........

आजपर्यंतच्या प्रवासात

आजपर्यंतच्या प्रवासात
अनेक गोष्टी शिकलो

विचार करायला शिकलो
भर दिवसा स्वप्नं बघायला शिकलो

अनेकदा अडखळूनहि पुन्हा
स्वत:ला सावरायला शिकलो

स्वत:साठी जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायला शिकलो

शब्दांचे अर्थं समजुन घेऊन
कविता लिहायला शिकलो

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंदीत व्हायला शिकलो

स्वत:ला समजुन घेता नाही आले तरी
दुसऱ्यांना ओळखायला शिकलो

एवढे शिकुनही अत्तापर्यंत
"प्रेम" करायला नाही शिकलो............

अंधारलेल्या माझ्या दुनियेत

अंधारलेल्या माझ्या दुनियेत
होतो मी एकटाच जगत..........

होते फ़क्त माझेच शब्दं
माझ्या अवतीभवती

अचानक या दुनियेत आली एक परी
एक आषेचा किरण बनुन.........

बहरली एक नवी उमेद
दिसु लागले सुर्यकिरण..........

शब्दांना माझ्या गवसले अर्थं
माझ्यातच मी झालो धुंद...........

क्षणभर का होईना, वाटू लागले
somewhere I belong

पण विसरलो होतो मी की....
काही स्वप्नं हि स्वप्नंच रहातात
न काही लोक शेवटपर्यंत
"शापित गंधर्व" रहातात.............

घरात येणाऱ्या प्रत्येक सुर्य किरणांत....

घरात येणाऱ्या प्रत्येक सुर्य किरणांत....

सकाळच्या त्या धुंद वातावरणात..

पक्षांच्या त्या किलबिलाटात.......

घड्याळात वाजणाऱ्या प्रत्येक सेकंदात......

पडणाऱ्या पावसाच्या थेंबात.........

दरवळणाऱ्या मातीच्या सुगंधात......

आठवणीतल्या प्रत्येक दिवसात....

सहज मिळालेल्या रिकम्या वेळात...

अडखळुन पडल्यावर
झालेल्या प्रत्येक जखमेत....

मनात योजलेल्या हर एक कल्पनेत
"जीवन" शोधतो मी..............

जीवन शोधता शोधता
आज स्व:ताला शोधतो मी.............

असं का होतय ?

असं का होतय ?

झोप येत असुनही
जागरण करावेसे वाटते

भुक असुनही
काहीच खावेसे वाटत नाही

"नाही" बोलायचे असतानाही
"हो" का बोलतो मी ?

मनात प्रचंड राग असताना
ओठांवर हसू का येते ?

अपुऱ्या ईछा पुर्ण करुनही
कसलीतरी उणीव का जाणवतेय ?

सगळे जवळ असतानाही
एकटे एकटे का वाटतय ?

Engg पर्यंत कविता काय असते
हे पण माहीत नव्हते
पण अत्ता ही चौथी कविता लिहितोय

कोणी सांगेल का मला
असं का होतय ?

जिथे नाही माणूसकीला किंमत

जिथे नाही माणूसकीला किंमत
जिथे प्रत्येक गोष्ट मोजली जाते पैशात

माणूसच माणसाचा बनलाय शत्रू
त्याला बाकीचे प्राणी तरी काय करणार ?

वेळेशी बांधील आपले आयुष्य
नियती करी त्यावर स्मितहास्य

इथे स्वत:साठी वेळ नाही कुणाला
दुसऱ्याकडे कोण बघणार ?

जिथे संकटातच फ़क्त उदगार निघतात
"आम्ही सारे एक आहोत.........."

बाकीच्या वेळी तेच शब्द असतात
"आपण कोण आहात ?..................."

हे सर्व वर्णन करताना
कधी कधी शब्दही अपुरे पडतात

स्वत:साठी सगळेच जगतात
दुसऱ्यांसाठी जगतो तोच खरा माणूस......

बघता बघता कॉलेज कधी

बघता बघता कॉलेज कधी
संपले काही कळलेच नाही......
नंतर ऑफ़िस लाईफ़ही सुरु झाले

पॉकेटमनी चे रुपांतर पगारात झाले
पण कॉलेजसाठी मिळणाऱ्या त्या ३००
रुपयांची मजा काही वेगळीच होती

ऑफ़ीसमधे जरी स्वत:चे separate
workstation असले तरी
कॉलेजमधल्या bench ची
मजा काही वेगळीच होती

रोजच ऑफ़ीसच्या canteen मधे जातो
पण कॉलेजच्या canteen ची
मजा काही वेगळीच होती

रोजच ऑफ़ीसमधे कॉफ़ी पीतो
पण college canteen मधल्या
त्या cutting ची मजा
काही वेगळीच होती

रोजच ऑफ़ीसमधे येउन login
करतो, पण कॉलेजमधल्या
proxy ची मजा