तिची ती नजर माझ्या शांत मनाला घायाळ करून गेली
क्षणभर माझ्या शांत मनाला वणवा लाऊन गेली
क्षणात नभ फाटून जशी वीज पडावी
तसा एकच कल्लोळ
माझ्या मनात ओढवून गेली........!!!
तिची ती मोहक नजर मला बरच काही सांगून गेली
क्षणभर माझ्या शांत मनाला हुरहूर लाऊन गेली
प्रेमाची एक मंद वात आठवणींच्या रूपात मनात
पेटवून गेली
तसाच तो
अठवणींचा दिवा माझ्या आयुष्ययात पेटतच ठेऊन गेली........!!!
तिची ती नाजुक अदा माझ्यातील माझेपण हरवून गेली
क्षणभर माझ्या मनाला विरंगुळा देऊन गेली
नकळत मला त्या आठवणींच्या झुल्यावर बसवून गेली
तसाच तो
आठवणीचा झूला माझ्या आयुष्यात झुलतच ठेऊन गेली........!!!
वैभव .............
