Friday, June 29, 2012

नयनातील माझ्या अश्रूं ही सुकले..

नयनातील माझ्या अश्रूं ही सुकले..

आठवणीचे ते काहूर मनी उठले..

कारण काय कळेना मज मना..

विरहाचे क्षण, येई दाटुनी गळा..

... सांभाळू तुला किती अन कसं रे मना..

ओलावा, जिव्हाळा हि हवा ना रे जगण्या..

आज माझ्या जीवनास मी पुःन्हा मुकलो..

जगण्याची उम्मेद पुःन्हा हरवून बसलो..


मनाला एकदा असेच विचारले



मनाला एकदा असेच विचारले

का इतका तिच्यात गुंततो ?

नाही ना ती आपल्यासाठी

मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत  नाही तुला

त्रास मला भोगावा लागतो

अश्रूं मधे भिजून भिजून

रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला

का स्वप्नात रमतो ?

तिच्या सुखा साठी तू

का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले

प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा

आपण स्वता: ला विसरतो

सार काही तिच्यासाठी

ईतकेच मनाला समजावतो.

आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले



आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तोच चंद्र जो सगळ्यांना हवासा वाटतो
तोच चंद्र जो त्याच्या कवितेत असतो
तोच चंद्र जो तिच्या पुढे सुंदर नसतो
सुंदर असते ती, जी चंद्राला प्रश्न करते
खरच, आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तिचे हसणे पण चंद्राच्या त्या निखळ चांदण्यासारखे भासले
तिचे डोळे पण चन्द्रासारखे दिसले
नाही तर तिच्या डोळ्यात तरी चंद्र दिसला
आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
ती समोर दिसावी म्हणून चंद्र समोर दिसू लागला
आणि आता ती लाजली असेल आस वाटल कारण
चंद्र ढगात लपला ... 



मन.......



मन,   कधी वाटे दवबिंदूप्रमाणे  कधी विशाल सागराप्रमाणे... 
मन,   कधी वाटे खोल दरीप्रमाणे  कधी उंच आभाळाप्रमाणे... 
मन,   कधी वाटे कर्कश ध्वनिप्रमाणे  कधी भयाण शान्ततेप्रमाणे... 
मन,   कधी वाटे लख्खे प्रकाश्म्ये  कधी  कुट्ट अंधाराप्रमाणे... 
मन हे वेडे,    कधी उडे पक्षांच्या थव्याप्रमाणे... 
                     कधी उदास होई चिमुकल्या बाळा प्रमाणे...





Friday, June 29, 2012

नयनातील माझ्या अश्रूं ही सुकले..

नयनातील माझ्या अश्रूं ही सुकले..

आठवणीचे ते काहूर मनी उठले..

कारण काय कळेना मज मना..

विरहाचे क्षण, येई दाटुनी गळा..

... सांभाळू तुला किती अन कसं रे मना..

ओलावा, जिव्हाळा हि हवा ना रे जगण्या..

आज माझ्या जीवनास मी पुःन्हा मुकलो..

जगण्याची उम्मेद पुःन्हा हरवून बसलो..


मनाला एकदा असेच विचारले



मनाला एकदा असेच विचारले

का इतका तिच्यात गुंततो ?

नाही ना ती आपल्यासाठी

मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत  नाही तुला

त्रास मला भोगावा लागतो

अश्रूं मधे भिजून भिजून

रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला

का स्वप्नात रमतो ?

तिच्या सुखा साठी तू

का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले

प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा

आपण स्वता: ला विसरतो

सार काही तिच्यासाठी

ईतकेच मनाला समजावतो.

आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले



आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तोच चंद्र जो सगळ्यांना हवासा वाटतो
तोच चंद्र जो त्याच्या कवितेत असतो
तोच चंद्र जो तिच्या पुढे सुंदर नसतो
सुंदर असते ती, जी चंद्राला प्रश्न करते
खरच, आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
तिचे हसणे पण चंद्राच्या त्या निखळ चांदण्यासारखे भासले
तिचे डोळे पण चन्द्रासारखे दिसले
नाही तर तिच्या डोळ्यात तरी चंद्र दिसला
आज पुन्हा एकदा चंद्र झाल्यासारखे वाटले
ती समोर दिसावी म्हणून चंद्र समोर दिसू लागला
आणि आता ती लाजली असेल आस वाटल कारण
चंद्र ढगात लपला ... 



मन.......



मन,   कधी वाटे दवबिंदूप्रमाणे  कधी विशाल सागराप्रमाणे... 
मन,   कधी वाटे खोल दरीप्रमाणे  कधी उंच आभाळाप्रमाणे... 
मन,   कधी वाटे कर्कश ध्वनिप्रमाणे  कधी भयाण शान्ततेप्रमाणे... 
मन,   कधी वाटे लख्खे प्रकाश्म्ये  कधी  कुट्ट अंधाराप्रमाणे... 
मन हे वेडे,    कधी उडे पक्षांच्या थव्याप्रमाणे... 
                     कधी उदास होई चिमुकल्या बाळा प्रमाणे...