Wednesday, February 15, 2012

नामंजूर!













जपत किनारा शीड सोडणे — नामंजूर!
 अन वार्याची वाट पहाणे — नामंजूर!
 मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
 येईल त्या लाटेवर डुलणे — नामंजूर!

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
 मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
 मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
 वेळ पाहुनि खेळ मांडणे — नामंजूर!

माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
 मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
 सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
 मज अब्रूचे थिटे बहाणे — नामंजूर!

रुसवे — फ़ुगवे … भांडणतंटे … लाख कळा
 आपला — तुपला हिशेब आहे हा सगळा
 रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
 गगनाशी नेणे गार्हाणे — नामंजूर!

नीती, तत्वे … फ़सवी गणिते! दूर बरी!
 रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
 जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
 पण रक्ताचा गर्व वाहणे — नामंजूर!


संदीप खरे व सलील कुलकर्णी

No comments:

Post a Comment

Wednesday, February 15, 2012

नामंजूर!













जपत किनारा शीड सोडणे — नामंजूर!
 अन वार्याची वाट पहाणे — नामंजूर!
 मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
 येईल त्या लाटेवर डुलणे — नामंजूर!

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
 मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
 मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
 वेळ पाहुनि खेळ मांडणे — नामंजूर!

माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
 मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
 सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
 मज अब्रूचे थिटे बहाणे — नामंजूर!

रुसवे — फ़ुगवे … भांडणतंटे … लाख कळा
 आपला — तुपला हिशेब आहे हा सगळा
 रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
 गगनाशी नेणे गार्हाणे — नामंजूर!

नीती, तत्वे … फ़सवी गणिते! दूर बरी!
 रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
 जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
 पण रक्ताचा गर्व वाहणे — नामंजूर!


संदीप खरे व सलील कुलकर्णी

No comments:

Post a Comment