Thursday, June 28, 2012

विसरू कसा तुला मी



विसरू कसा तुला मी
हृदयातील प्रत्येक धडकेत
धडकातेस तू ...............

विसरू कसा तुला मी
माझ्या हृदयात
बनून श्वाश दरवळतेस तू .......

विसरू कसा तुला मी
रोम रोमात माझ्या
बनून रज वाहतेस तू ......

तुझ्याच प्रेमासाठी व्याकुळले हृदय माझे
भास तुझेच आहेत स्वाश माझे
थांबवून तरी त्यांना थांबवू कसा मी
विसरून तुला सांग जगू कसा मी ???






मला वेडू म्हणू नका



मला वेडू म्हणू नका
जरी तुम्हाला तसे वाटले ...
चित्त नाही थार्यावर
माझे मन कुणी तरी चोरले ...
काय बोलेन पुढल्या क्षणी
काही सांगता येत नाही
भास तिचे होताच
मी बरगळतो भलतेच काही ...
असूनही सभोवती सगळे
माझ्यातच एकाकी असतो ...
नसता कुणी सोबत
तिच्या आठवनीन बरोबर हसतो ...
रात्र आहे कि दिवस
काही ध्यान नाही ...
तहान भूक हरपली
कशाचीच स्मृती नाही ...
प्रेमवीरांना मी पहिला
म्हणायचो ठार वेडे ...
मलाच पडलेय आता
माझ्याच प्रेमाचे कोडे...........



 

सुगंधी मोगरा होवून



सुगंधी मोगरा होवून
मला फुलायचे आहे ____
आयुष्य गुंफून गजर्यात
केसांवर तुझ्या झुलायचे आहे ____

तुझ्या फ़क़्त चाहुलीवर

कळीतून मनमुराद फुलायचे आहे ____
तुझ्या स्पर्शाचा घेवून सुगंध
नभात पंखलावून दरवळायचे आहे ____

गंधाळायचे
हळुवार सुगंधी
श्वासात तुझ्या भिनायचे आहे ____
श्वाश बनून तुझा
हृदयात कायमचे राहायचे आहे ____

क्षणभंगुर जरी जीवन माझे
बेधुंद जगायचे आहे ____
मनात तुझ्या ओतून सुगंध
सर्वस्व तुझ्यावर लुटायचे आहे ___

तुझ्या केसांत गजरा बनून
तुझ्या सोबत डूलायाचे आहे ___
एक एक पाकळी सांडून मग
ओठांवर तुझ्या मरायचे आहे ___

प्रेम कसे करावे
जगाला दाखवायचे आहे ____
तुझ्या साठीच जगायचे आहे
अन केसांत तुझ्या विझायचे आहे 



मन माझं लबाड ...



मन माझं लबाड ...
हल्ली फारच वेड्यागत वागतं ___
माझ्या प्रोफाईल पेक्षा
तुझ्याच प्रोफाईल वर....... ठेवून लक्ष असतं___

तुझ्या स्टेटसखाली पाहून गर्दी

मन गोठून कुडकुडतं ___
पोस्ट नसली कळाली तरी
कमेंट करायला लुडबुडतं ___

लाईक तुझी मिळावी म्हणून
कधी कधी समाजकारण करतं ___
'सपोर्ट अण्णा हजारे' ची पोस्टिंग करून
वेगळंच राजकारण खेळतं ___

लाईक
तुझी मिळेपर्यंत
स्टेटसबार आमरण अनशन धरतो ___
"नाईस पोस्ट" अशी कमेंट मिळाल्यावरच
उपोषणाचा रुसवा सोडतो ___

तुझ्या प्रोफाईलची वारी मी
दर सेकंदाला करत असतो ___
उपडेत तुझ्या घेण्यासाठी
मावूस माझा झिजवत असतो ___

तुझ्या वर कविता करण्यासाठी
माउस आणि किबोर्डला मी गुंतवलय ___
पेडींग मेल्सचा वाढलाय ढीग
तरी पीसी प्रोब्लेम सांगून , बोसला सुद्धा कटवलय

प्रोफाईल ची माझ्या प्रत्येक धडकन
तूझ्या प्रोफाईल ला लाईक करते ___
पण तू करतेस कि नाही
या कमेंटवर गोंधळून धडपडते ___

दिवसातून एकदा तरी भक्ताच्या
प्रोफाईल ला विसिट करून जा ___
प्रोफाईल अपडेट होतं फ़क़्त तुझ्याचसाठी
त्याला किमान एकदा नुसत ...... लाईक तरी करून जा 



Thursday, June 28, 2012

विसरू कसा तुला मी



विसरू कसा तुला मी
हृदयातील प्रत्येक धडकेत
धडकातेस तू ...............

विसरू कसा तुला मी
माझ्या हृदयात
बनून श्वाश दरवळतेस तू .......

विसरू कसा तुला मी
रोम रोमात माझ्या
बनून रज वाहतेस तू ......

तुझ्याच प्रेमासाठी व्याकुळले हृदय माझे
भास तुझेच आहेत स्वाश माझे
थांबवून तरी त्यांना थांबवू कसा मी
विसरून तुला सांग जगू कसा मी ???






मला वेडू म्हणू नका



मला वेडू म्हणू नका
जरी तुम्हाला तसे वाटले ...
चित्त नाही थार्यावर
माझे मन कुणी तरी चोरले ...
काय बोलेन पुढल्या क्षणी
काही सांगता येत नाही
भास तिचे होताच
मी बरगळतो भलतेच काही ...
असूनही सभोवती सगळे
माझ्यातच एकाकी असतो ...
नसता कुणी सोबत
तिच्या आठवनीन बरोबर हसतो ...
रात्र आहे कि दिवस
काही ध्यान नाही ...
तहान भूक हरपली
कशाचीच स्मृती नाही ...
प्रेमवीरांना मी पहिला
म्हणायचो ठार वेडे ...
मलाच पडलेय आता
माझ्याच प्रेमाचे कोडे...........



 

सुगंधी मोगरा होवून



सुगंधी मोगरा होवून
मला फुलायचे आहे ____
आयुष्य गुंफून गजर्यात
केसांवर तुझ्या झुलायचे आहे ____

तुझ्या फ़क़्त चाहुलीवर

कळीतून मनमुराद फुलायचे आहे ____
तुझ्या स्पर्शाचा घेवून सुगंध
नभात पंखलावून दरवळायचे आहे ____

गंधाळायचे
हळुवार सुगंधी
श्वासात तुझ्या भिनायचे आहे ____
श्वाश बनून तुझा
हृदयात कायमचे राहायचे आहे ____

क्षणभंगुर जरी जीवन माझे
बेधुंद जगायचे आहे ____
मनात तुझ्या ओतून सुगंध
सर्वस्व तुझ्यावर लुटायचे आहे ___

तुझ्या केसांत गजरा बनून
तुझ्या सोबत डूलायाचे आहे ___
एक एक पाकळी सांडून मग
ओठांवर तुझ्या मरायचे आहे ___

प्रेम कसे करावे
जगाला दाखवायचे आहे ____
तुझ्या साठीच जगायचे आहे
अन केसांत तुझ्या विझायचे आहे 



मन माझं लबाड ...



मन माझं लबाड ...
हल्ली फारच वेड्यागत वागतं ___
माझ्या प्रोफाईल पेक्षा
तुझ्याच प्रोफाईल वर....... ठेवून लक्ष असतं___

तुझ्या स्टेटसखाली पाहून गर्दी

मन गोठून कुडकुडतं ___
पोस्ट नसली कळाली तरी
कमेंट करायला लुडबुडतं ___

लाईक तुझी मिळावी म्हणून
कधी कधी समाजकारण करतं ___
'सपोर्ट अण्णा हजारे' ची पोस्टिंग करून
वेगळंच राजकारण खेळतं ___

लाईक
तुझी मिळेपर्यंत
स्टेटसबार आमरण अनशन धरतो ___
"नाईस पोस्ट" अशी कमेंट मिळाल्यावरच
उपोषणाचा रुसवा सोडतो ___

तुझ्या प्रोफाईलची वारी मी
दर सेकंदाला करत असतो ___
उपडेत तुझ्या घेण्यासाठी
मावूस माझा झिजवत असतो ___

तुझ्या वर कविता करण्यासाठी
माउस आणि किबोर्डला मी गुंतवलय ___
पेडींग मेल्सचा वाढलाय ढीग
तरी पीसी प्रोब्लेम सांगून , बोसला सुद्धा कटवलय

प्रोफाईल ची माझ्या प्रत्येक धडकन
तूझ्या प्रोफाईल ला लाईक करते ___
पण तू करतेस कि नाही
या कमेंटवर गोंधळून धडपडते ___

दिवसातून एकदा तरी भक्ताच्या
प्रोफाईल ला विसिट करून जा ___
प्रोफाईल अपडेट होतं फ़क़्त तुझ्याचसाठी
त्याला किमान एकदा नुसत ...... लाईक तरी करून जा