कधी खिडकीच्या झरोक्यात अन कधी पावसाच्या धारात..मज आठवते ती…
कधी नदी किनारी, कोवळ्या लहरीत... मज आठवते ती….
कधी सांज ढलतांना अन क्षितिजाकडे पाहतांना ... मज आठवते ती….
कधी हिरव्या रानात, लाल पिवळ्या फुलात... मज आठवती ती…
प्रेमळ रागात अन पाण्याच्या टपोऱ्या थेंबात... मज आठवते ती…
गालावरच्या देखण्या खळीत अन कधी उमलत्या कोमल कळीत... मज आठवते ती…
कधी असता दूर देशी, कधी एकांत वासी... मज आठवते ती….
निखळ हास्यात अन कधी जाईच्या गंधात... मज आठवते ती….
चांदण्या राती अन कधी एकटे चालता पायवाटी... मज आठवते ती….
अवखळ झऱ्यात अन गार गार वाऱ्यात... मज आठवते ती…
धूसर धुक्यात अन संथ अश्या ओढ्यात... मज आठवते ती…
निवांत असता झाडाखाली अन कधी हर्षित मनी... मज आठवते ती…
रंग बिरंगी रंगात अन कधी तळ्यातल्या तरंगात... मज आठवते ती….
वाऱ्याने डोलणाऱ्या पिकात अन कधी पाण्यावर वाहत जाणाऱ्या पिंपळ पानात... मज आठवते ती…
जुन्या खाणा खुणीत अन क्षणाच्या प्रत्येक क्षणी ... मज आठवते ती…."



