" दिसते कश्यातही तिचंच रूप,
तरी फक्त तिच्याच कडे बघायला आवडतं,
तीच आठवते पहिल्या पावसाच्या सुगंधात,
काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"
" ती असता दूर, कुठे मन लागत नाही,
आणि ती येता जवळ, काही शब्दच सुचत नाही,
होतो तिचाच आभास इंद्रधनुच्या रंगात,
काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"
" असता तिच्या बरोबर वेळ जातो सर सर,
स्वप्नात तरी थांबते म्हणून कधी वाटतं स्वप्नच बरं,
तीच तीच भासते गार रान वाऱ्यात,
काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"
" माझी नजर शोधते गर्दीत तिला,
तिच्यासाठी विदुषक व्हायला आवडते मला,
तीच तीच स्मरते कवितेतल्या प्रत्तेक शब्दात,
काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"
" तीच आठवते एकटे पणी,
पण तीच राहते मनात बरोबर असतानाही कुणी,
तीच जाईत, तीच जुईत, तीच आठवते निशिगन्धात,
काय यालाच प्रेम असं म्हणतात…?"



