Thursday, June 28, 2012

फेसबुक वर झाली आमची ओळख



फेसबुक वर झाली आमची ओळख
करायचो तिला  मी रोज हाय
बोलायचं असायचं खूप काही
पण व्हायची ऑफलाईन , करून लगेच बाय ...

रोज छान स्टेटस अपडेट करायची

कधी कविता चारोळी स्वत लिहायची
सगळ्या फ्रेण्डलीस्ट च्या दिलांची धडकन
माझ्या हि हृदयात  धडकायची

खूप लिहिल्या कविता तिच्यावर

पण तिला त्या कधी कळल्याच नाहीत
माझ्या स्टेटस वर फ़क़्त मीच वाचत बसलो
कमेंट तिने त्या कधी केल्याच नाहीत

मलाही हि तिने नोटीस कराव

एवढीच इच्चा असायची
कमेंट नको निदान लाईक
एवढीच कवितेची मागणी असायची

ओंलैन आली जरी थोडक्यासाठी

चाटीन्ग्वर हि बोलायला जमलेच नाही
माझ्या कविता मीच गिरवीत बसलो
तिने कधी त्या वाचल्याच नाहीत

एक दिवशी गोष्ट घडली मात्र अजब

माझ्याच वाल वर पोस्ट तिने टाकली गजब
खूप छान लिहितोस रे तू कविता
लिहून स्वीट शी स्माईल तिने टाकली
विश्वास नवता बसत म्हणून
हजारदा त्यादिवशी होती वाचली

वाचून ती पोस्ट सगळे फ्रेंड हि झाले शौक

माझाही काळीज झाला होता पुरता खल्लास
पडले होते सगळेच असे धारातीर्थी
कारण झाला होता पप्पू प्रेमाच्या परीक्षेत  पास

११.११.११ च्या दिवशी तर मात्र

माझं नसीब दणकावून फळफळलं
होतो मीच  तिला विचारणार
त्या आधी तिनेच प्रोपोस होतं केलं

च्या sss ला आज च्या  ११.११.११ मुहूर्तावर

माझी रडकी लाईफ झाली बघा कशी चेंज
आज पासून मी तिचा boyfriend
आणि मला मिळाली girlfriend






रात्रंदिवस तिलाच स्मरतोय मी



रात्रंदिवस तिलाच स्मरतोय मी
तिला बरोब्बर समजायचं ...
माझ्या मनातल्या गोष्टी
मन तिचं लबाड...... हळूच चोरून ऐकायचं
कधीच काही लपलं नाही
तिच्या पासून मनातलं माझ्या
मी हि ओळखून होतो
छुप्या गोष्टी काही , मनातल्या तिच्या
दिसली मला कि अगदी
मी बेधुंद होवून जायचो
साठवून तिला हृदयात
आठवणींचे मोती बनवून
जपायचो
बोलायला लागली कि
शब्दांत तिच्या भिजून जायचो
ती नसताना मग त्यांच्याशी
खूप खूप गप्पा रंगवायचो
आरश्यासमोर राहिलो उभा कि
प्रतिबिंब समोर तीचेच दिसायचे
उन्हात हि सावूलीत माझ्या
मला तिचेच भास छळायचे
मित्रांच्या गराड्यात नेहमी
ती केंद्र बिंदू असायची
तरीही नजरेचा कटाक्ष देवून मला
खट्याळ स्पर्श देवून जायची
तिच्या डोळ्यांत पाहिल्यावर
माझे  नेहमीच असे व्हायचे
हृदयातून शब्दांचे झेरेच फाटून
कवितांचे सागर उधळायचे
तिला प्रेमाबद्दल विचारावे कि नाही
विचाराने मनात काहूर माजायचे
नकार देइल ती या भीतीने
प्रेमाचे गुलमोहर काळजातच कोमेजायचे
कधीच नाही दाखवू शकलो तीला
डोळ्यांतली  स्वप्ने माझी
अन ओठातच दबून राहिली
तिच्या माझ्या प्रीतीची गाणी
उडायचेच राहिले आकाशी
पतंग तिच्या माझ्या निखळ प्रेमाचे
दोर काटला शेवटी
माझ्याच धीर एकवटू न शकलेल्या अबोल्याने
थांबून थोडा वेळ माझ्य्साठी
ती त्या वळणावरून आता परतून गेली
आणि माझ्या पहिल्या  प्रेमाची  वाळू
माझ्याच अबोल मुठीतून निसटून गेली .........






मला मनातून वाटतंय..



मला मनातून वाटतंय,
तु मला संध्याकाळी अचानक भेटावं,
कवितेत आजवर लिहिलेलं ,
सारं तूला माझ्या ओठांनी सांगाव ,
माहित नाही तू तेव्हा काय बोलशील
रागावून पाठ फिरवशील
कि लाजून पुन्हा लाईक करशील ...
मनातल सारच तेव्हा काही
माझ्या ओठांवर नसेल
तरीही तुला सार काही
माझ्या डोळ्यातून
उमजेल
हवेत हि तेव्हा उमटेल मस्त गारठा
आपल्या पहिल्या भेटीचा प्रेमळ हिंदोळा
खुलेल सहवासाचा इंद्रधनू हि तेव्हा रुपेरी
लाजून तुला चंद्र हि लपेल ढगानआड आभाळी
कस सगळ मला अगदी स्वप्नागत भासेल
भेट पहिली तुझी अन माझी
आयुष्याची गोड साठवण असेल....
काय माहित असा अचानक
तू कधी भेटतलस कि नाय
कि रोज सारख्या टिपूस न ढळता
आभाळ भेटीचा नुसताच ढगांनी , दाटवून रवतलस कि काय ???



 

आज काम ज़रा जास्त आहे,दररोज ओफिस मधे वाटतं...





आज काम ज़रा जास्त आहे,दररोज ओफिस मधे वाटतं...
भर ऑफीसात फाइल्सचा ढीग बघून , आभाळ  मनात दाटतं...
तरी हात चालत राहतात , पण  मेन्दु चालत नाही...
कीबोर्ड शिवाय ऑफीस मधे , कुनिच बोलत नाही...
तितक्यात कुठून एक मेल पीसी मधे येतो , तितक्यात कुठून एक मेल पीसी मधे येतो .....
वाचून त्यातिल काही भाग , जीव कंठाजवळ  घेतो...
जीव उनाड़ मुलासारखा , प्रॉजेक्ट फाइल्स सैरा वैरा शोधत राहतो
ड्रॉवर्स , लॉकर्स , नि कपाटाच्या छपरावर्तीहि चढ़ुन पाहतो...
एका मागुण दूसरया मेल चा ,  सुरू होतो पुन्हा खेळ
खुर्ची मागुण चालत येतो ,  बॉस घेऊन लेटरहेड.
चक्क  डोळ्यान समोर , बॉस कूस बदलून घेतो....
प्रॉफेशन पीरियड अगोदरच , बॉस कुठून  टरमीनेशन लेटर देतो...







Thursday, June 28, 2012

फेसबुक वर झाली आमची ओळख



फेसबुक वर झाली आमची ओळख
करायचो तिला  मी रोज हाय
बोलायचं असायचं खूप काही
पण व्हायची ऑफलाईन , करून लगेच बाय ...

रोज छान स्टेटस अपडेट करायची

कधी कविता चारोळी स्वत लिहायची
सगळ्या फ्रेण्डलीस्ट च्या दिलांची धडकन
माझ्या हि हृदयात  धडकायची

खूप लिहिल्या कविता तिच्यावर

पण तिला त्या कधी कळल्याच नाहीत
माझ्या स्टेटस वर फ़क़्त मीच वाचत बसलो
कमेंट तिने त्या कधी केल्याच नाहीत

मलाही हि तिने नोटीस कराव

एवढीच इच्चा असायची
कमेंट नको निदान लाईक
एवढीच कवितेची मागणी असायची

ओंलैन आली जरी थोडक्यासाठी

चाटीन्ग्वर हि बोलायला जमलेच नाही
माझ्या कविता मीच गिरवीत बसलो
तिने कधी त्या वाचल्याच नाहीत

एक दिवशी गोष्ट घडली मात्र अजब

माझ्याच वाल वर पोस्ट तिने टाकली गजब
खूप छान लिहितोस रे तू कविता
लिहून स्वीट शी स्माईल तिने टाकली
विश्वास नवता बसत म्हणून
हजारदा त्यादिवशी होती वाचली

वाचून ती पोस्ट सगळे फ्रेंड हि झाले शौक

माझाही काळीज झाला होता पुरता खल्लास
पडले होते सगळेच असे धारातीर्थी
कारण झाला होता पप्पू प्रेमाच्या परीक्षेत  पास

११.११.११ च्या दिवशी तर मात्र

माझं नसीब दणकावून फळफळलं
होतो मीच  तिला विचारणार
त्या आधी तिनेच प्रोपोस होतं केलं

च्या sss ला आज च्या  ११.११.११ मुहूर्तावर

माझी रडकी लाईफ झाली बघा कशी चेंज
आज पासून मी तिचा boyfriend
आणि मला मिळाली girlfriend






रात्रंदिवस तिलाच स्मरतोय मी



रात्रंदिवस तिलाच स्मरतोय मी
तिला बरोब्बर समजायचं ...
माझ्या मनातल्या गोष्टी
मन तिचं लबाड...... हळूच चोरून ऐकायचं
कधीच काही लपलं नाही
तिच्या पासून मनातलं माझ्या
मी हि ओळखून होतो
छुप्या गोष्टी काही , मनातल्या तिच्या
दिसली मला कि अगदी
मी बेधुंद होवून जायचो
साठवून तिला हृदयात
आठवणींचे मोती बनवून
जपायचो
बोलायला लागली कि
शब्दांत तिच्या भिजून जायचो
ती नसताना मग त्यांच्याशी
खूप खूप गप्पा रंगवायचो
आरश्यासमोर राहिलो उभा कि
प्रतिबिंब समोर तीचेच दिसायचे
उन्हात हि सावूलीत माझ्या
मला तिचेच भास छळायचे
मित्रांच्या गराड्यात नेहमी
ती केंद्र बिंदू असायची
तरीही नजरेचा कटाक्ष देवून मला
खट्याळ स्पर्श देवून जायची
तिच्या डोळ्यांत पाहिल्यावर
माझे  नेहमीच असे व्हायचे
हृदयातून शब्दांचे झेरेच फाटून
कवितांचे सागर उधळायचे
तिला प्रेमाबद्दल विचारावे कि नाही
विचाराने मनात काहूर माजायचे
नकार देइल ती या भीतीने
प्रेमाचे गुलमोहर काळजातच कोमेजायचे
कधीच नाही दाखवू शकलो तीला
डोळ्यांतली  स्वप्ने माझी
अन ओठातच दबून राहिली
तिच्या माझ्या प्रीतीची गाणी
उडायचेच राहिले आकाशी
पतंग तिच्या माझ्या निखळ प्रेमाचे
दोर काटला शेवटी
माझ्याच धीर एकवटू न शकलेल्या अबोल्याने
थांबून थोडा वेळ माझ्य्साठी
ती त्या वळणावरून आता परतून गेली
आणि माझ्या पहिल्या  प्रेमाची  वाळू
माझ्याच अबोल मुठीतून निसटून गेली .........






मला मनातून वाटतंय..



मला मनातून वाटतंय,
तु मला संध्याकाळी अचानक भेटावं,
कवितेत आजवर लिहिलेलं ,
सारं तूला माझ्या ओठांनी सांगाव ,
माहित नाही तू तेव्हा काय बोलशील
रागावून पाठ फिरवशील
कि लाजून पुन्हा लाईक करशील ...
मनातल सारच तेव्हा काही
माझ्या ओठांवर नसेल
तरीही तुला सार काही
माझ्या डोळ्यातून
उमजेल
हवेत हि तेव्हा उमटेल मस्त गारठा
आपल्या पहिल्या भेटीचा प्रेमळ हिंदोळा
खुलेल सहवासाचा इंद्रधनू हि तेव्हा रुपेरी
लाजून तुला चंद्र हि लपेल ढगानआड आभाळी
कस सगळ मला अगदी स्वप्नागत भासेल
भेट पहिली तुझी अन माझी
आयुष्याची गोड साठवण असेल....
काय माहित असा अचानक
तू कधी भेटतलस कि नाय
कि रोज सारख्या टिपूस न ढळता
आभाळ भेटीचा नुसताच ढगांनी , दाटवून रवतलस कि काय ???



 

आज काम ज़रा जास्त आहे,दररोज ओफिस मधे वाटतं...





आज काम ज़रा जास्त आहे,दररोज ओफिस मधे वाटतं...
भर ऑफीसात फाइल्सचा ढीग बघून , आभाळ  मनात दाटतं...
तरी हात चालत राहतात , पण  मेन्दु चालत नाही...
कीबोर्ड शिवाय ऑफीस मधे , कुनिच बोलत नाही...
तितक्यात कुठून एक मेल पीसी मधे येतो , तितक्यात कुठून एक मेल पीसी मधे येतो .....
वाचून त्यातिल काही भाग , जीव कंठाजवळ  घेतो...
जीव उनाड़ मुलासारखा , प्रॉजेक्ट फाइल्स सैरा वैरा शोधत राहतो
ड्रॉवर्स , लॉकर्स , नि कपाटाच्या छपरावर्तीहि चढ़ुन पाहतो...
एका मागुण दूसरया मेल चा ,  सुरू होतो पुन्हा खेळ
खुर्ची मागुण चालत येतो ,  बॉस घेऊन लेटरहेड.
चक्क  डोळ्यान समोर , बॉस कूस बदलून घेतो....
प्रॉफेशन पीरियड अगोदरच , बॉस कुठून  टरमीनेशन लेटर देतो...