Tuesday, June 19, 2012

माझी प्रियेसी मला दुख देवून निघून गेली होती

माझी प्रियेसी मला दुख देवून निघून गेली होती
दुखी मनाला सावरायला कोणीतरी आली होती
कळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो.............

ठरवलं होत आता प्रेम वैगरे काही करायचं नाही

कुणालाही आपल्या जवळ येवू दयायचं नाही
कळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो..............

शब्दाने शब्द वाढत गेला श्वाशात श्वास गुंतत गेला
भावनांचा खेळ चालू झाला माझा मलाच विसर पडला
कळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो..............

एक दिवस मला ती भेटायला आली होती
डोळ्यात पाहत माझ्या काहीतरी बोलत होती
कळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो..............

बंद करून डोळे सर्व काही पाहत होतो
उघडताच डोळे खाटेवरून खाली पडलो होतो
कळलंच नाही मी केंव्हा प्रेमात पडलो.............

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
एकमेकांना दिलेल्या दुःखांवर
एकमेकांन सोबत घालवलेल्या अनेक
आनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी..
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
अनेक जुन्या आठवणींनी आणलेले
एकमेकांच्या डोळ्यातील
आनंदाश्रु पुसण्यासाठी.... .
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
आयुष्यात पुढे येणारया अनेक
दुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्या
हातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात
एक मेकांचा हात धरण्यासाठी,
एकमेकांना सावरण्यासाठी... .

जवळ येताच, लाजुन जरा

जवळ येताच, लाजुन जरा
लाजवशील का मला...
हळुच लाजुन्, डोळ्यात पाहुन
आपल म्हणशील का मला...

फ़ुलासारखे डवरताना
सुगंध घेऊ देशिल का मला...
आपले म्हणुन, घट्ट् पकडुन्
गुदगुल्या करशील का मला...

कधितरी हसुन, गोड बोलुन
"जानु" म्हणशील का मला...
आयुष्याच्या वाटेवर पुढे जाताना
मागे वळुन बघशील का मला....

आयुष्याच्या वाटेवर पुढे जाताना
मागे वळुन बघशील का मला....
आयुष्याच्या वाटेवर पुढे जाताना
मागे वळुन बघशील का मला....

प्रेम हे काय असत

 प्रेम हे काय असत
एका साठी फक्त आठवण तर
एका साठी काहीच नसत !
प्रेम हे काय असत
एका साठी फक्त विचार तर
एकाच्या ध्यानी-मनीच नसत !
प्रेम हे काय असत
एका साठी वेड लावणार तर
एकाला कोण हा वेडा हेच माहित नसत!
प्रेम हे काय असत
एकाच्या डोळी ओलावा तर
एकाच्या मुखी हास्य असत !
प्रेम हे काय असत
एकाला दूर जाऊनही जवळच वाटत तर
एकाला जवळ दूरचा प्रश्नच नसत !
प्रेम हे काय असत
एकाला आठवणीत रडणं असत तर
एकाला मस्त हास्यात जगन असत !
प्रेम हे असच असत
एकाला नेहमी दुख:च तर
एकाला त्याची जाणीव पण नसत !