Monday, June 18, 2012

आला काळोख दाटूनी



आला काळोख दाटूनी
काहूर विचारांचे घेऊनी
दिस नकळत सरला
रातीला एकटेपणा उरला

मन एकाकी एकाकी
गाठ पडे प्रश्नांची
या भयाण काळोखी
घालमेल होई जीवाची

मन गुंतती गुंतती
गुंतल्यात आठवणी
तारे ते बघूनी
डोळा येते मग पाणी

गेला तारा बनण्या
डाव अर्ध्यावर सोडून
थकले मी आता
रथ तुझ्याविना ओढून

लाखो ता‍र्‍यांत त्या
तुला शोधायचे कुठे?
हितगुज तुझ्याशी
आता साधायचे कसे?

नको वाटते आता
रात एकाकी भकास
तुझ्याविना माझा
इथेच थांबावा प्रवास... 


आला बेभान हा वारा



आला बेभान हा वारा
चाहूल पावसाची घेऊनी
धरती ही सुखावली
शाल लाजेची ओढूनी

विजेची ही तार आली
त्याचा सांगावा घेऊनी
उठा उठा धरणी माते
राजे येताहेत मागुनी

प्रेयसिच्या ओढीने
वरुणराज हा धावत आला
सरसावली मग ही धरा
त्याला आलिंगन देण्या

विरहाने रुसलेल्या धरेला
आणली भेट हिरव्या चोळीची
दिली भरुन ओंजळ तिला
राजाने गार टपोर्‍या मोत्यांची

धरेने शिंपडला स्वागता
सुगंधी असा सडा अत्तराचा
सामावला कणाकणात
परीपूर्ण गंध या पावसाचा

मिठीत पावसाच्या
गेली धरा रंगून
स्वार होऊन सरीवर
आली बघा बहरुन 


Sunday, June 17, 2012

पाऊस आला की हे असं होतं

 
 
पाऊस आला की हे असं होतं
मनात दडून बसलेल्या
कोंडून ठेवलेल्या भावनांमध्ये
कुजबुज सुरु होते
कुजबुज वाढत जाते
आणि त्याचा गलका होतो
आणि मग मी
मनाची कवाड उधडतो
शब्द बाहेर येतात
कागदावर उतरतात
आणि त्याची कविता होते
“पावसाची कविता”
मी त्याला नाव देतो ..!!
 
 

पाऊस असा कोसळतो



पाऊस असा कोसळतो
एकांती जीव जळतो
रंग धुंद धुंद
गंध कुंद कुंद
एकांती जीव तडफडतो
तळमळतो , जळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

घन गडाड गड
वीज कडाड कड
गंधार नभी घुमतो
अंधार चिंब डसतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

तन चूर चूर
मन पूर पूर
विरह उरी चुभतो
शृंगार उगी पाहतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

वाट पाही पाही
साथ नाही नाही
सरण हे रचतो
मरण रे मागतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..


Monday, June 18, 2012

आला काळोख दाटूनी



आला काळोख दाटूनी
काहूर विचारांचे घेऊनी
दिस नकळत सरला
रातीला एकटेपणा उरला

मन एकाकी एकाकी
गाठ पडे प्रश्नांची
या भयाण काळोखी
घालमेल होई जीवाची

मन गुंतती गुंतती
गुंतल्यात आठवणी
तारे ते बघूनी
डोळा येते मग पाणी

गेला तारा बनण्या
डाव अर्ध्यावर सोडून
थकले मी आता
रथ तुझ्याविना ओढून

लाखो ता‍र्‍यांत त्या
तुला शोधायचे कुठे?
हितगुज तुझ्याशी
आता साधायचे कसे?

नको वाटते आता
रात एकाकी भकास
तुझ्याविना माझा
इथेच थांबावा प्रवास... 


आला बेभान हा वारा



आला बेभान हा वारा
चाहूल पावसाची घेऊनी
धरती ही सुखावली
शाल लाजेची ओढूनी

विजेची ही तार आली
त्याचा सांगावा घेऊनी
उठा उठा धरणी माते
राजे येताहेत मागुनी

प्रेयसिच्या ओढीने
वरुणराज हा धावत आला
सरसावली मग ही धरा
त्याला आलिंगन देण्या

विरहाने रुसलेल्या धरेला
आणली भेट हिरव्या चोळीची
दिली भरुन ओंजळ तिला
राजाने गार टपोर्‍या मोत्यांची

धरेने शिंपडला स्वागता
सुगंधी असा सडा अत्तराचा
सामावला कणाकणात
परीपूर्ण गंध या पावसाचा

मिठीत पावसाच्या
गेली धरा रंगून
स्वार होऊन सरीवर
आली बघा बहरुन 


Sunday, June 17, 2012

पाऊस आला की हे असं होतं

 
 
पाऊस आला की हे असं होतं
मनात दडून बसलेल्या
कोंडून ठेवलेल्या भावनांमध्ये
कुजबुज सुरु होते
कुजबुज वाढत जाते
आणि त्याचा गलका होतो
आणि मग मी
मनाची कवाड उधडतो
शब्द बाहेर येतात
कागदावर उतरतात
आणि त्याची कविता होते
“पावसाची कविता”
मी त्याला नाव देतो ..!!
 
 

पाऊस असा कोसळतो



पाऊस असा कोसळतो
एकांती जीव जळतो
रंग धुंद धुंद
गंध कुंद कुंद
एकांती जीव तडफडतो
तळमळतो , जळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

घन गडाड गड
वीज कडाड कड
गंधार नभी घुमतो
अंधार चिंब डसतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

तन चूर चूर
मन पूर पूर
विरह उरी चुभतो
शृंगार उगी पाहतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

वाट पाही पाही
साथ नाही नाही
सरण हे रचतो
मरण रे मागतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..