Sunday, June 17, 2012

पाऊस आला की हे असं होतं

 
 
पाऊस आला की हे असं होतं
मनात दडून बसलेल्या
कोंडून ठेवलेल्या भावनांमध्ये
कुजबुज सुरु होते
कुजबुज वाढत जाते
आणि त्याचा गलका होतो
आणि मग मी
मनाची कवाड उधडतो
शब्द बाहेर येतात
कागदावर उतरतात
आणि त्याची कविता होते
“पावसाची कविता”
मी त्याला नाव देतो ..!!
 
 

पाऊस असा कोसळतो



पाऊस असा कोसळतो
एकांती जीव जळतो
रंग धुंद धुंद
गंध कुंद कुंद
एकांती जीव तडफडतो
तळमळतो , जळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

घन गडाड गड
वीज कडाड कड
गंधार नभी घुमतो
अंधार चिंब डसतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

तन चूर चूर
मन पूर पूर
विरह उरी चुभतो
शृंगार उगी पाहतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

वाट पाही पाही
साथ नाही नाही
सरण हे रचतो
मरण रे मागतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..


Saturday, June 16, 2012

वेदनांचे मनात फ़ुटले झरे...



वेदनांचे मनात फ़ुटले झरे...
तरी ही पापणास ओल नाही....

शब्द ओठांवर गेले सांडून..

तरी ही भावनास बोल नाही...

करतलास पाड्ल्या अशा भेगा...

तरी ही भविष्याला मोल नाही....

मोजून दिली सारी आसवे..

तरी ही तुझ मन समतोल नाही.......



पदरावरुन ओघळणा-या


 

पदरावरुन ओघळणा-या
सरी घेई मजला लपेटून....
की थेंब थेंब काढले पिळून..
पदराची ओल काही जाईना..

अन तुला सांगून समजेना....


मलाच तुझसी बिलगू दे ना

हाच अट्टाहास तुझा संपेना.....
मी ही अशी साधी भोळी बावरी..

आज काय करावे ते कळॆना.....


अन तुला सांगून समजेना....


लपू कुठे..? आडॊसा शोधू कुठे..?

आडॊसा काही केल्यास मिळॆना....
सख्या आज ही भिजून जाईल ...
माझे गोरे गोरे नितळ अंग...
मला भिजवण्याचा ..तुझा हा
कसला रे नेहमीचाच छंद....?
हा पाठलाग तू माझा सोडेना

 अन तुला सांगून समजेना........


 

Sunday, June 17, 2012

पाऊस आला की हे असं होतं

 
 
पाऊस आला की हे असं होतं
मनात दडून बसलेल्या
कोंडून ठेवलेल्या भावनांमध्ये
कुजबुज सुरु होते
कुजबुज वाढत जाते
आणि त्याचा गलका होतो
आणि मग मी
मनाची कवाड उधडतो
शब्द बाहेर येतात
कागदावर उतरतात
आणि त्याची कविता होते
“पावसाची कविता”
मी त्याला नाव देतो ..!!
 
 

पाऊस असा कोसळतो



पाऊस असा कोसळतो
एकांती जीव जळतो
रंग धुंद धुंद
गंध कुंद कुंद
एकांती जीव तडफडतो
तळमळतो , जळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

घन गडाड गड
वीज कडाड कड
गंधार नभी घुमतो
अंधार चिंब डसतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

तन चूर चूर
मन पूर पूर
विरह उरी चुभतो
शृंगार उगी पाहतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

वाट पाही पाही
साथ नाही नाही
सरण हे रचतो
मरण रे मागतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..


Saturday, June 16, 2012

वेदनांचे मनात फ़ुटले झरे...



वेदनांचे मनात फ़ुटले झरे...
तरी ही पापणास ओल नाही....

शब्द ओठांवर गेले सांडून..

तरी ही भावनास बोल नाही...

करतलास पाड्ल्या अशा भेगा...

तरी ही भविष्याला मोल नाही....

मोजून दिली सारी आसवे..

तरी ही तुझ मन समतोल नाही.......



पदरावरुन ओघळणा-या


 

पदरावरुन ओघळणा-या
सरी घेई मजला लपेटून....
की थेंब थेंब काढले पिळून..
पदराची ओल काही जाईना..

अन तुला सांगून समजेना....


मलाच तुझसी बिलगू दे ना

हाच अट्टाहास तुझा संपेना.....
मी ही अशी साधी भोळी बावरी..

आज काय करावे ते कळॆना.....


अन तुला सांगून समजेना....


लपू कुठे..? आडॊसा शोधू कुठे..?

आडॊसा काही केल्यास मिळॆना....
सख्या आज ही भिजून जाईल ...
माझे गोरे गोरे नितळ अंग...
मला भिजवण्याचा ..तुझा हा
कसला रे नेहमीचाच छंद....?
हा पाठलाग तू माझा सोडेना

 अन तुला सांगून समजेना........