Saturday, June 16, 2012

वेदनांचे मनात फ़ुटले झरे...



वेदनांचे मनात फ़ुटले झरे...
तरी ही पापणास ओल नाही....

शब्द ओठांवर गेले सांडून..

तरी ही भावनास बोल नाही...

करतलास पाड्ल्या अशा भेगा...

तरी ही भविष्याला मोल नाही....

मोजून दिली सारी आसवे..

तरी ही तुझ मन समतोल नाही.......



पदरावरुन ओघळणा-या


 

पदरावरुन ओघळणा-या
सरी घेई मजला लपेटून....
की थेंब थेंब काढले पिळून..
पदराची ओल काही जाईना..

अन तुला सांगून समजेना....


मलाच तुझसी बिलगू दे ना

हाच अट्टाहास तुझा संपेना.....
मी ही अशी साधी भोळी बावरी..

आज काय करावे ते कळॆना.....


अन तुला सांगून समजेना....


लपू कुठे..? आडॊसा शोधू कुठे..?

आडॊसा काही केल्यास मिळॆना....
सख्या आज ही भिजून जाईल ...
माझे गोरे गोरे नितळ अंग...
मला भिजवण्याचा ..तुझा हा
कसला रे नेहमीचाच छंद....?
हा पाठलाग तू माझा सोडेना

 अन तुला सांगून समजेना........


 

शब्द येता ओठात या....



शब्द येता ओठात या....
आसू ओघळती गाली...
तुच सखा होऊन माझा..
बनला आसूंचा वाली....

उसवूनी गेले लोचणी..

आज डॊळ्यांचे इशारे...
मनास या उधाण येता...
वळले तुझ्यावर सारे...

गुदमर होता शब्दांची..

गहिवरूण क्षणात आले...
आज फ़ुटताच बांधारेन...
नकळत हे तुझेच झाले.....

पाचवीला आसू जरी...

अशीच सोबत राहू दे....
जन्मोजन्मांची ही नाती...
तुझ्याच संगे न्हाऊ दे........



भाव तुझे मनातले..



भाव तुझे मनातले..
मज वाचता न आले..
बंद ओठास माझ्या...
तुज खोलता न आले...........

सांगू कसे तुला रे...

हे गुज या तनातले..
स्पर्श तुझ्या अधराचे...
मज मोजता न आले...........

निज या लोचनातली...

तुज घेताच न आली...
भिज या पावसातली...
मज सुखवता न आली............

गंध तुझ्या श्वासांचे...

सुंगता मला न आले...
बंध या देहातले...
रोखता तुला न आले..............



Saturday, June 16, 2012

वेदनांचे मनात फ़ुटले झरे...



वेदनांचे मनात फ़ुटले झरे...
तरी ही पापणास ओल नाही....

शब्द ओठांवर गेले सांडून..

तरी ही भावनास बोल नाही...

करतलास पाड्ल्या अशा भेगा...

तरी ही भविष्याला मोल नाही....

मोजून दिली सारी आसवे..

तरी ही तुझ मन समतोल नाही.......



पदरावरुन ओघळणा-या


 

पदरावरुन ओघळणा-या
सरी घेई मजला लपेटून....
की थेंब थेंब काढले पिळून..
पदराची ओल काही जाईना..

अन तुला सांगून समजेना....


मलाच तुझसी बिलगू दे ना

हाच अट्टाहास तुझा संपेना.....
मी ही अशी साधी भोळी बावरी..

आज काय करावे ते कळॆना.....


अन तुला सांगून समजेना....


लपू कुठे..? आडॊसा शोधू कुठे..?

आडॊसा काही केल्यास मिळॆना....
सख्या आज ही भिजून जाईल ...
माझे गोरे गोरे नितळ अंग...
मला भिजवण्याचा ..तुझा हा
कसला रे नेहमीचाच छंद....?
हा पाठलाग तू माझा सोडेना

 अन तुला सांगून समजेना........


 

शब्द येता ओठात या....



शब्द येता ओठात या....
आसू ओघळती गाली...
तुच सखा होऊन माझा..
बनला आसूंचा वाली....

उसवूनी गेले लोचणी..

आज डॊळ्यांचे इशारे...
मनास या उधाण येता...
वळले तुझ्यावर सारे...

गुदमर होता शब्दांची..

गहिवरूण क्षणात आले...
आज फ़ुटताच बांधारेन...
नकळत हे तुझेच झाले.....

पाचवीला आसू जरी...

अशीच सोबत राहू दे....
जन्मोजन्मांची ही नाती...
तुझ्याच संगे न्हाऊ दे........



भाव तुझे मनातले..



भाव तुझे मनातले..
मज वाचता न आले..
बंद ओठास माझ्या...
तुज खोलता न आले...........

सांगू कसे तुला रे...

हे गुज या तनातले..
स्पर्श तुझ्या अधराचे...
मज मोजता न आले...........

निज या लोचनातली...

तुज घेताच न आली...
भिज या पावसातली...
मज सुखवता न आली............

गंध तुझ्या श्वासांचे...

सुंगता मला न आले...
बंध या देहातले...
रोखता तुला न आले..............