Saturday, June 16, 2012

साजिर्‍याशा एका संध्याकाळी........


 

साजिर्‍याशा एका संध्याकाळी
कोठून जाणे कसे वादळी वारे आले
अन् बघता बघता सारे उद्ध्वस्त झाले
माझी स्वप्ने, माझ्या महत्वाकांक्षा
सारे सारे वाहून गेले

मी शोधू पाहतोय माझी
कवितांची वही,
माझ्या गाण्यांचे रेकॉर्ड्स
पण स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे
काहीच आठवत नाही...

आणि त्यानंतर सुन्न मनाने
डोळे मिटून घेतो
तेव्हा घुमत राहतात
त्याच वादळी वार्‍याचे आवाज
कानामध्ये, मनामध्ये...



पाऊस पाहत राह्ण्याची मजा...



पाऊस पाहत राह्ण्याची मजा
पावसात भिजणार्‍यांना कधी कळणारच नाही
घट्ट मिटलेल्या डोळ्यांत जपलेला अश्रू
गालांवर कधी ओघळणारच नाही

काल घडलेल्या सार्‍या गोष्टी
आज उगीच आठवत राह्तात
डोळयांनी वाट करून दिली तरी
उगीच पाणी साठवत राहतात

पुसून टाकावी, वाटतं, करावी
पुन्हा कोरी करकरीत पाटी
पण मनाची खळगी पोकळ
अन् आठवणींची पेंसिलही खोटी

आता मनाला सवय झली आहे
रोज ग म भ न गिरवायची
स्वत:ची फोल फुशारकी
स्वतःसमोरच मिरवायची

यंदाच्या पावसाळ्यात, वाटलं होतं
पाटीवरची अक्षरे पुसली जातील
पण बहुदा पावसाला वाटलं असेल
पाटीमुळे आपले शुभ्र थेंब काळे होतील



Friday, June 15, 2012

नुसताच बसलो होतो मी



नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला
तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...
मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो
हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!



आजकाल मनात ती फारच डोकावत राहते



आजकाल मनात ती फारच डोकावत राहते
तिच्याबद्दल काहीतरी लिहित राहावं असं सतत वाटत राहतं
बरेचदा लिखाणात नात्यांबद्दल तिच्या मतांबद्दल लिहिणं होतं.
.न बोललेल्या ,गाभ्यातच राहिलेल्या गोष्टी..
न कळलेले अर्थ,हळुवार संवाद ,बालीशपणा,भांडणं,शाब्दिक चकमकी .. 
 असं आणि बरचं  काही..
खूप काही घडून गेलय...   ..
जे जे अनुभवलं ते ते आता आपल्या शब्दात उतरत आहे ..
आणि सोबतीने अव्यक्त भावही ...
लिहिता लिहिता असं जाणवत गेलं की प्रत्येक 
प्रसंगातून एक गोष्ट गुंफली जावू शकते..
मग त्याप्रकारे लिहणं सुरु झालाय ..
ते क्षण जगता यावे हि एक धडपड आहे ह्या लिहिण्यामागे 
...त्यांचा अर्थ लावता यावा आणि तीच भावविश्व
 जाणून घेता यावं हा प्रयत्न आहे ...
ती फक्त एक कोणी नाही  ती हि त्याच्या मनात 
असलेली एक प्रतिमा आहे...अनेक "ती"च्या  मनातून भेटलेली
अनेक अनुभवांतून उमटलेली .उमजलेली 
.. ती हि त्याची हळुवार बाजू आहे
 आजकल त्याच्या मनात ती फारच डोकावत राहते 
..म्हणून तो ,ती लिहायला लागलाय ....

Saturday, June 16, 2012

साजिर्‍याशा एका संध्याकाळी........


 

साजिर्‍याशा एका संध्याकाळी
कोठून जाणे कसे वादळी वारे आले
अन् बघता बघता सारे उद्ध्वस्त झाले
माझी स्वप्ने, माझ्या महत्वाकांक्षा
सारे सारे वाहून गेले

मी शोधू पाहतोय माझी
कवितांची वही,
माझ्या गाण्यांचे रेकॉर्ड्स
पण स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे
काहीच आठवत नाही...

आणि त्यानंतर सुन्न मनाने
डोळे मिटून घेतो
तेव्हा घुमत राहतात
त्याच वादळी वार्‍याचे आवाज
कानामध्ये, मनामध्ये...



पाऊस पाहत राह्ण्याची मजा...



पाऊस पाहत राह्ण्याची मजा
पावसात भिजणार्‍यांना कधी कळणारच नाही
घट्ट मिटलेल्या डोळ्यांत जपलेला अश्रू
गालांवर कधी ओघळणारच नाही

काल घडलेल्या सार्‍या गोष्टी
आज उगीच आठवत राह्तात
डोळयांनी वाट करून दिली तरी
उगीच पाणी साठवत राहतात

पुसून टाकावी, वाटतं, करावी
पुन्हा कोरी करकरीत पाटी
पण मनाची खळगी पोकळ
अन् आठवणींची पेंसिलही खोटी

आता मनाला सवय झली आहे
रोज ग म भ न गिरवायची
स्वत:ची फोल फुशारकी
स्वतःसमोरच मिरवायची

यंदाच्या पावसाळ्यात, वाटलं होतं
पाटीवरची अक्षरे पुसली जातील
पण बहुदा पावसाला वाटलं असेल
पाटीमुळे आपले शुभ्र थेंब काळे होतील



Friday, June 15, 2012

नुसताच बसलो होतो मी



नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला
तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...
मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो
हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!



आजकाल मनात ती फारच डोकावत राहते



आजकाल मनात ती फारच डोकावत राहते
तिच्याबद्दल काहीतरी लिहित राहावं असं सतत वाटत राहतं
बरेचदा लिखाणात नात्यांबद्दल तिच्या मतांबद्दल लिहिणं होतं.
.न बोललेल्या ,गाभ्यातच राहिलेल्या गोष्टी..
न कळलेले अर्थ,हळुवार संवाद ,बालीशपणा,भांडणं,शाब्दिक चकमकी .. 
 असं आणि बरचं  काही..
खूप काही घडून गेलय...   ..
जे जे अनुभवलं ते ते आता आपल्या शब्दात उतरत आहे ..
आणि सोबतीने अव्यक्त भावही ...
लिहिता लिहिता असं जाणवत गेलं की प्रत्येक 
प्रसंगातून एक गोष्ट गुंफली जावू शकते..
मग त्याप्रकारे लिहणं सुरु झालाय ..
ते क्षण जगता यावे हि एक धडपड आहे ह्या लिहिण्यामागे 
...त्यांचा अर्थ लावता यावा आणि तीच भावविश्व
 जाणून घेता यावं हा प्रयत्न आहे ...
ती फक्त एक कोणी नाही  ती हि त्याच्या मनात 
असलेली एक प्रतिमा आहे...अनेक "ती"च्या  मनातून भेटलेली
अनेक अनुभवांतून उमटलेली .उमजलेली 
.. ती हि त्याची हळुवार बाजू आहे
 आजकल त्याच्या मनात ती फारच डोकावत राहते 
..म्हणून तो ,ती लिहायला लागलाय ....