जमले ढग सुटला वारा
घेउन आला अंगावर शहारा,
अचानक कडाडली ति वीज पसरला चहुकडे अंधार,
ग्रीष्मातल्या उन्ह्लाला शीतल स्पर्शाने मोहून गेली पहिल्या पावसाची पहिली सर,
धुंद बेधुंद मनात गुंजले प्रीतीचे ते गुज
अबोल त्या प्रीतीला मग आला भावनांचा पूर,
थरथरत्या ओठांवर आले परत प्रेम्गीतातले हरवलेले सूर,
ओल्यामातीचा गंध पसरवत होता तो पाऊस,
नकळत हरवत होते श्वासात श्वास,
भिजत होते मन त्याचे तिच्या ओल्या केसांत,
होते प्रेमाचे गीत दोघांच्याही ओठांत,
काही होते क्षण खरे काही फक्त स्वप्नील भास,
इंद्रधनुच्या रंगन्सोबत खेळताना बघायची होती चांदण्यांची ति आरास,
नाजूक हळव्या क्षणांचा तो जणू एक आभास,
म्हुनंनच आज ही आहे तो पहिला पाऊस माझ्यासाठी खूप खास.....