Tuesday, June 12, 2012

मी तीच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती,


 
 
मी तीच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती,
तीची नव्हती कधी पण माझी साथ
होती..
मी आजवर कदीलांच्या उजेडात
जगलो,
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती..
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा,
माझी ती बिचारी लहान पायवाट
होती..
तीच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले
नेहमी,
माझी कधीही सुटणारी निसरती गाठ
होती..
तीचं सुःखांशी नेहमी अजोड नातं गुंफलेलं,
माझ्या वाट्याला दुःखचं भरमसाठ
होती..
नेहमी साखर झोपेची तीची पहाट रोजची,
मी डोळे मिटले
नाही माझी सदा पहाट होती..
तीच्या ओठी नेहमी हसु उमलायचं सुःखाचं,
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ
होती..
तीने कधी हात जोडले नाहीत
कशासाठी देवापुढे,
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीचं
वरात होती..
आज म्हणतेय मी चुकली पण काय
फायदा,
खरचं फार उशीरा तीची ही साद होती..
मी स्मशांनाच्या वाटेवर
असताना तीला कळलं,
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.. 
 
 

जमले ढग सुटला वारा

 
 
जमले ढग सुटला वारा
घेउन आला अंगावर शहारा,
अचानक कडाडली ति वीज पसरला चहुकडे अंधार,
ग्रीष्मातल्या उन्ह्लाला शीतल स्पर्शाने मोहून गेली पहिल्या पावसाची पहिली  सर,
धुंद बेधुंद मनात गुंजले प्रीतीचे ते गुज
अबोल त्या प्रीतीला मग आला भावनांचा पूर,
थरथरत्या ओठांवर आले परत प्रेम्गीतातले हरवलेले सूर,

 ओल्यामातीचा गंध पसरवत होता तो पाऊस,
नकळत हरवत होते श्वासात  श्वास,
भिजत होते मन त्याचे तिच्या ओल्या केसांत,
होते प्रेमाचे गीत दोघांच्याही ओठांत,
काही होते क्षण खरे काही फक्त स्वप्नील भास,
इंद्रधनुच्या रंगन्सोबत खेळताना  बघायची होती चांदण्यांची ति आरास,
नाजूक हळव्या क्षणांचा तो जणू एक आभास,
म्हुनंनच आज ही आहे तो पहिला पाऊस माझ्यासाठी खूप खास.....

पहिला पाऊस.......



शाळेतला पहिला पाऊस
गारा वेचत अंगणात बागडणारा
संध्याकाळी धुमाकूळ घालणारा
डबक्यांतल्या होड्यांमध्ये ऐटीत फिरणारा
पावसाच्या गाण्यांवर फेर धरून नाचणारा
कॉलेजातला पहिला पाऊस
सिंहगडाचे वेध लावणारा
बाइकवर चिंब भिजणारा
चहा-भज्यांची चव चाखणारा
उगीचच नवी हुरहूर लावणारा

तारुण्यातला पहिला पाऊस
प्रियेवीण झूरणारा
मनाचे कवडसे अलगद खोलणारा
मातीचा मुग्ध सुगंध मनामध्ये साठवणारा
त्या पहिल्या भेटीच्या आठवणीत हळूवार बरसणारा
कामावरचा पहिला पाऊस
छत्री-रेनकोट मध्ये लपणारा
स्कूटरवर शिव्या पण गाडीत शीळ वाजवणारा
घरातल्या चहासाठी तरसणारा
मनातल्या मनातच लहान होऊन नाचणारा
पुन्हा येतो मग बालपणाचा पहिला पाऊस
भूतकाळ जिवंत करणारा
समाधानाने मन भरवणारा
किती हे पावसाळे पाहिले, याची गणती करणारा
आणि पिकांसाठी, रस्त्यांसाठी, रेल्वेसाठी आणि माणसासाठी प्रार्थना करणारा!


HTML Comment Box is loading comments...


Sunday, June 10, 2012

चिंब चिंब कोसळण्याऱ्या सरी.



चिंब चिंब कोसळण्याऱ्या सरी
अन् सोसाट्यची थंडी
थर् थर् वारा कापत होता
सामसुम् त्या मंदिरामध्ये फक्त
आपल्याच टाळ्यांचा गजर होत होता
काहिहि नसताना काहितरी ऋनानुबंध होता
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........
असे किती वेळा
तु माझ्यावर् अन् मी तुझावर् राग् धरला होता
किती जरी अबोला धराला तरी...
शब्द ओठांवरचा बोलकाच् होता...
असा कोणताच् क्शण् वगळता येणारा नव्हता ...
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........



Tuesday, June 12, 2012

मी तीच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती,


 
 
मी तीच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती,
तीची नव्हती कधी पण माझी साथ
होती..
मी आजवर कदीलांच्या उजेडात
जगलो,
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती..
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा,
माझी ती बिचारी लहान पायवाट
होती..
तीच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले
नेहमी,
माझी कधीही सुटणारी निसरती गाठ
होती..
तीचं सुःखांशी नेहमी अजोड नातं गुंफलेलं,
माझ्या वाट्याला दुःखचं भरमसाठ
होती..
नेहमी साखर झोपेची तीची पहाट रोजची,
मी डोळे मिटले
नाही माझी सदा पहाट होती..
तीच्या ओठी नेहमी हसु उमलायचं सुःखाचं,
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ
होती..
तीने कधी हात जोडले नाहीत
कशासाठी देवापुढे,
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीचं
वरात होती..
आज म्हणतेय मी चुकली पण काय
फायदा,
खरचं फार उशीरा तीची ही साद होती..
मी स्मशांनाच्या वाटेवर
असताना तीला कळलं,
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.. 
 
 

जमले ढग सुटला वारा

 
 
जमले ढग सुटला वारा
घेउन आला अंगावर शहारा,
अचानक कडाडली ति वीज पसरला चहुकडे अंधार,
ग्रीष्मातल्या उन्ह्लाला शीतल स्पर्शाने मोहून गेली पहिल्या पावसाची पहिली  सर,
धुंद बेधुंद मनात गुंजले प्रीतीचे ते गुज
अबोल त्या प्रीतीला मग आला भावनांचा पूर,
थरथरत्या ओठांवर आले परत प्रेम्गीतातले हरवलेले सूर,

 ओल्यामातीचा गंध पसरवत होता तो पाऊस,
नकळत हरवत होते श्वासात  श्वास,
भिजत होते मन त्याचे तिच्या ओल्या केसांत,
होते प्रेमाचे गीत दोघांच्याही ओठांत,
काही होते क्षण खरे काही फक्त स्वप्नील भास,
इंद्रधनुच्या रंगन्सोबत खेळताना  बघायची होती चांदण्यांची ति आरास,
नाजूक हळव्या क्षणांचा तो जणू एक आभास,
म्हुनंनच आज ही आहे तो पहिला पाऊस माझ्यासाठी खूप खास.....

पहिला पाऊस.......



शाळेतला पहिला पाऊस
गारा वेचत अंगणात बागडणारा
संध्याकाळी धुमाकूळ घालणारा
डबक्यांतल्या होड्यांमध्ये ऐटीत फिरणारा
पावसाच्या गाण्यांवर फेर धरून नाचणारा
कॉलेजातला पहिला पाऊस
सिंहगडाचे वेध लावणारा
बाइकवर चिंब भिजणारा
चहा-भज्यांची चव चाखणारा
उगीचच नवी हुरहूर लावणारा

तारुण्यातला पहिला पाऊस
प्रियेवीण झूरणारा
मनाचे कवडसे अलगद खोलणारा
मातीचा मुग्ध सुगंध मनामध्ये साठवणारा
त्या पहिल्या भेटीच्या आठवणीत हळूवार बरसणारा
कामावरचा पहिला पाऊस
छत्री-रेनकोट मध्ये लपणारा
स्कूटरवर शिव्या पण गाडीत शीळ वाजवणारा
घरातल्या चहासाठी तरसणारा
मनातल्या मनातच लहान होऊन नाचणारा
पुन्हा येतो मग बालपणाचा पहिला पाऊस
भूतकाळ जिवंत करणारा
समाधानाने मन भरवणारा
किती हे पावसाळे पाहिले, याची गणती करणारा
आणि पिकांसाठी, रस्त्यांसाठी, रेल्वेसाठी आणि माणसासाठी प्रार्थना करणारा!


HTML Comment Box is loading comments...


Sunday, June 10, 2012

चिंब चिंब कोसळण्याऱ्या सरी.



चिंब चिंब कोसळण्याऱ्या सरी
अन् सोसाट्यची थंडी
थर् थर् वारा कापत होता
सामसुम् त्या मंदिरामध्ये फक्त
आपल्याच टाळ्यांचा गजर होत होता
काहिहि नसताना काहितरी ऋनानुबंध होता
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........
असे किती वेळा
तु माझ्यावर् अन् मी तुझावर् राग् धरला होता
किती जरी अबोला धराला तरी...
शब्द ओठांवरचा बोलकाच् होता...
असा कोणताच् क्शण् वगळता येणारा नव्हता ...
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........