Thursday, June 7, 2012

सांग साद मला तु देशील ना ?

 
सांग साद मला तु देशील ना ?
मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?

तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
कधी एकटेपणाचा होईल भास मला
सांग साथ मला तु देशील ना ?

कधी रागवेन मी तुझ्यावरती
कधी भांडेन मी तुझ्या संगती
कधी येईल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तु घेशील ना ?

मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ? 
 
 

Tuesday, June 5, 2012

तो पाऊस तुझा माझा होता.........

 
 
 
धो धो पडण्याऱ्या पावसाचा थेंब..
मनाला ओला करत होता...
कुढेतरी नकळत मनात तो
आठवणींच्या गाठी बांधत होता...
नव्याने तो नवं नातं जोडत होता
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........
काळोख्याच्या रस्त्यावरती तेव्हा.
दोन जिवांचा प्रवास चालु होता.
तु मला नि मी तुला आधार देत
मार्ग मात्र निघत होता...
आयुष्यालाच नवा मार्ग मिळत होता
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........
चिंब चिंब कोसळण्याऱ्या सरी
अन् सोसाट्याची थंडी
थर थर वारा कापत होता
सामसुम त्या मंदिरामध्ये फक्त
आपल्याच टाळ्यांचा गजर होत होता
काहिहि नसताना काहितरी ऋणानुबंध होता
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........
असे किती वेळा
तु माझ्यावर अन मी तुझावर राग धरला होता
किती जरी अबोला धराला तरी...
शब्द ओठांवरचा बोलकाच होता...
असा कोणताच क्षण वगळता येणारा नव्हता ...
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........



Saturday, June 2, 2012

मैत्री म्हणजे सुंदर पहाट......


मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ.. 
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा 
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला... 
ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी... 
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी 
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ..... 
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे  ....................


पहाटेला प्राजक्ताचा गंध उरला नाही..


पहाटेला प्राजक्ताचा गंध उरला नाही..
ह्रुदयाला धड़कण्याचा स्पंद उरला नाही..
तुला न्याहाळण्याचा छंद उरला नाही..
तुझा स्पर्शही आता बेबंद उरला नाही..
जीवाला जीवाची ओढ़ उरली नाही..
जगणारी नाती आता गोड उरली नाही..
निसटत्या क्षणात तुझी साथ उरली नाही..
श्वासाला श्वासाची जोड़ उरली नाही..

आल्या गेल्या श्वासाला मोल उरले नाही..
जगण्याला आता खरच काहीच अर्थ उरला नाही......  

Thursday, June 7, 2012

सांग साद मला तु देशील ना ?

 
सांग साद मला तु देशील ना ?
मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?

तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
कधी एकटेपणाचा होईल भास मला
सांग साथ मला तु देशील ना ?

कधी रागवेन मी तुझ्यावरती
कधी भांडेन मी तुझ्या संगती
कधी येईल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तु घेशील ना ?

मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ? 
 
 

Tuesday, June 5, 2012

तो पाऊस तुझा माझा होता.........

 
 
 
धो धो पडण्याऱ्या पावसाचा थेंब..
मनाला ओला करत होता...
कुढेतरी नकळत मनात तो
आठवणींच्या गाठी बांधत होता...
नव्याने तो नवं नातं जोडत होता
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........
काळोख्याच्या रस्त्यावरती तेव्हा.
दोन जिवांचा प्रवास चालु होता.
तु मला नि मी तुला आधार देत
मार्ग मात्र निघत होता...
आयुष्यालाच नवा मार्ग मिळत होता
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........
चिंब चिंब कोसळण्याऱ्या सरी
अन् सोसाट्याची थंडी
थर थर वारा कापत होता
सामसुम त्या मंदिरामध्ये फक्त
आपल्याच टाळ्यांचा गजर होत होता
काहिहि नसताना काहितरी ऋणानुबंध होता
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........
असे किती वेळा
तु माझ्यावर अन मी तुझावर राग धरला होता
किती जरी अबोला धराला तरी...
शब्द ओठांवरचा बोलकाच होता...
असा कोणताच क्षण वगळता येणारा नव्हता ...
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........



Saturday, June 2, 2012

मैत्री म्हणजे सुंदर पहाट......


मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ.. 
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा 
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला... 
ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी... 
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी 
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ..... 
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे  ....................


पहाटेला प्राजक्ताचा गंध उरला नाही..


पहाटेला प्राजक्ताचा गंध उरला नाही..
ह्रुदयाला धड़कण्याचा स्पंद उरला नाही..
तुला न्याहाळण्याचा छंद उरला नाही..
तुझा स्पर्शही आता बेबंद उरला नाही..
जीवाला जीवाची ओढ़ उरली नाही..
जगणारी नाती आता गोड उरली नाही..
निसटत्या क्षणात तुझी साथ उरली नाही..
श्वासाला श्वासाची जोड़ उरली नाही..

आल्या गेल्या श्वासाला मोल उरले नाही..
जगण्याला आता खरच काहीच अर्थ उरला नाही......