Saturday, May 19, 2012

जीवनाच्या वाटेवर चालावे लागते एकट्याला

 जीवनाच्या वाटेवर चालावे लागते एकट्याला,
थोड्या काळासाठीच संगती असतात सोबतीला.
जीवनाच्या वाटेवर चालावे लागते काट्या मधुन,
फ़ुले सुध्दा असतात कधी कधी अधुन मधुन.
जीवनाच्या वाटेवर मिळवण्यासाठी यश,
पहिल्यांदा पचवावे लागते अपयश.
यश नक्कीच मिळत प्रयत्नातुन,
पण प्रयत्न करावे लागतात मनातुन.
जीवनाच्या वाटेवर चालने नाही सोपे,
वाटेवरुन जाताना बसतात जबर धक्के,
लागतात साथीदार त्यासाठी पक्के.
जीवनाच्या अवघड वाटेवर साथ असते मनाची,
आपली साथ आपणच करायची.
जीवनाच्या वाटेवर असतात खाच खळगे,
या वाटेवर रुनझुनताना आयुष्य जाते सगळे.
तरीही या वाटेवर सगळे चालतच राहतात,
सुखाच्या एक झुळकेने दुःख सगळे विसरुन जातात.

सागरात या आयुष्याच्या काठ शोधू चला

 सागरात या आयुष्याच्या काठ शोधू चला,
प्रपंचात या ओळख आपुली स्वतंत्र निर्मू चला,
हसू ठेवून चेहऱ्यावरती आसू सारे विसरू चला,
जीवनाच्या वाटेवर या दिलखुलास आता जगू चला....

स्वप्ने बघता उद्याची आज सतविते कालचे भय,
काचेच्या स्वप्नांची काळोखात विस्कटत जाते लय,
तेजोमय घर बांधून तिमीर हा भेदू चला,
जीवनाच्या वाटेवर या दिलखुलास आता जगू चला....

खडतर हे अंतराळ कापत जाऊ सलग,
हातामधला हात तरी ना होऊ देऊ विलग,
काटेरी मुलखात या गंधित फुले शोधू चला,
जीवनाच्या वाटेवर या दिलखुलास आता जगू चला....

झाड बनून एका जागी निस्तब्ध या बसू,
सावल्या अंथरू घनदाट धरेवर अन् गालातच हसू,
दु:ख ऊन,वारा,पावसाचे वरवर या झेलू चला,
जीवनाच्या वाटेवर या दिलखुलास आता जगू चला....

नको नको म्हणताना ही हळवे काही बोलू चला,
हृदय कठोर आहे ज्यांचे त्यास मृदू बनवू चला,
कटूतेस इथल्या मिळून सारे गोडवा जरा देऊ चला,
जीवनाच्या वाटेवर या दिलखुलास आता जगू चला..

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती
काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते
असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे
माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही
– कुसुमाग्रज

आभाळ भरून आल्यानंतर

आभाळ भरून आल्यानंतर
एकमेकांना भेटण्याचा संकेत अगदी अलीकडचा.
सर्व ऋतू खुडून तिच्या तळहातावर मी.
नजरेतील व्याकूळ प्रार्थना ती मला नजराणा देते.
संध्याकाळ मंद मंद चुळबुळत राहते
आकाशाभोवती.
बागेतल्या बुटक्या गवतावरून
सरपटत राहतो
मनातला हिरवा साप.
नुसत्या आभाळाकडे पाहून
पावसाचे अनुमान करता येत नाही.
म्हणून तिच्या तळहातावरची आरास
मी विस्कटून टाकतो.
ती आक्रोश करत राहते, मौनातून मौनात.
इथल्या तांबूस संबंधातला पालापाचोळा
झटकत ती उठते आणि
शब्दांचा नजर बंद करून
चालू लागते प्रार्थनेकडे.
आता
चर्चबेल अधिक जोरात
घणघणत राहते
माझ्या निरभ्र मेंदूत.