Friday, February 3, 2012

हे तुझे अशा वेळी लाजणे

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे मागचे जुने देणे टाळणे बरे नाही ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ? आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ ! जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता… हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ? हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…

चेह~याची गर्दी

आगगाडीच्या फलाटावर शेकडो पायांची , बिन चेह~याची गर्दी; गलका असंबद्ध आवाजांचा धावपळ, रेटारेटी संवेदना शुन्य……. आणि ते लहान मुल केविलवाणे, त्याची आई हरवलेली आंधळ्या गर्दीत, ओक्साबोक्शी रडणारे, असंबद्ध आवाजांच्या पुरात बुडणारे….. हळवा होतो माझा जीव, मी जातो त्याच्या जवळ, मला दिसतो त्याचा चेहरा; आणि मला आश्चर्याचा धक्काच बसतो: तो चेहरा माझाच असतो!

उभे भवती प्रासाद गगनभेदी पथी लोकांची होय दाट गर्दी

उभे भवती प्रासाद गगनभेदी पथी लोकांची होय दाट गर्दी प्रभादिपांची फ़ुले अंतराळी दौलतीची नित चालते दिवाळी कोप-याशी गुणगुणत अन् अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार जो निमाला ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला जीभ झालेली ओरडूनी शोश चार दिवसांचा त्यात ही उपास नयन थिजले थरथरती हात पाय रुप दैन्याचे उभे मुर्त काय ? कीव यावी पण तयाची कुणाला जात उपहासुनी पसरल्या कराला तोची येइ कुणी परतूनी मजुर बघूनी दीना त्या उभारुनी ऊर म्हणे राहीन दीन एक मी उपाशी परि लाभु दे दोन घास त्यासी खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत चालू लागे तो दिनबंधू वाट आणी धनिकांची वाहने पथात जात होती ती आपुल्या मदात

हजार जिव्हा तुझ्या गर्जु द

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा? कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!”