Tuesday, March 18, 2014

कॉलेज कट्टा ......

कॉलेज जीवनाला आयुष्यातील सोनेरी दिवस म्हंटले जाते. इथेचे तुम्ही लाईफ खरी एन्जोय करता. शाळेतले नियम इथे शिथिल झालेले असतात, नवीन नवीन फॅशनच्या कपड्यांनी शाळेच्या गणवेशाची जागा घेतलेली असते, दिवसाचा बराचसा वेळ क्लासरूम पेक्षा कॅन्टीनमध्ये नाहीतर लाईब्ररीत जात असतो, अनेकवेळा इथेच सर्वांना जीवनातले लॉंग-टर्मचे मित्र मिळतात, काहीना त्यांचं प्रेम इथेच मिळतं वगेर वगेरे. पण इथूनच तुमच्या प्रोफेशनल लाईफचा पाया रचला जातो. त्यामुळे जितकी हि लाईफ एन्जोय करायची असते तेवढीच भविष्याच्या दृष्टीने महत्वाची असते आणि याच व्दिविदा मनस्तीतीत बरीचशी मुले असतात. की, कॉलेज लाईफ एन्जोय करू कि फक्त आभ्यास करू. कारण दोन्ही गोष्टी बॅलन्स करण थोडंस अवघडच असत. फारच थोड्यांनाच ते जमत. मी माझ्या कॉलेजच्या जीवनात अणूभवलेल्या काही मजेशीर गोष्टी म्हणजे मित्राला त्याच्या आवडत्या मुलीने नुसते त्याच्याकडे पाहून हसलेल्याबद्दलची पार्टी घेणे, लेक्चरला एका वेळेस दोन-चार मित्रांची हजेरी लावने, क्लास मधल्या मुलींची वही पाहून काहीही न समजले तरी असायमेंट पूर्ण करणे. लेक्चर चालू असताना फ़क़्त तिच्याकडेच पाहणे, तिच्याकडून घेतल्येल्या वहीत तिच्या वहीतील सुंदर अक्षर पाहून हे इतकं सुंदर अक्षर तुझ्यासाठीच काढलंय रेअसा समज करून घेणे, तिच्या डोळ्यातील भाव वाचायचा प्रयत्न करणे, तिने घातलेला ड्रेस हा फ़क़्त मला तो रंग आवडतो म्हणूनच असा समजून घेण, तिने तिच्यात जाणीवपूर्वक केलेले बदल समजावून घेणे, उगाचच काही नसताना दोघात काहीतरी चाललेय अशी अफवा उठवयाची, आदल्या दिवशी बघितलेल्या क्रिकेट मॅचवर वर्गात सगळे मिळून गप्पा मारणे, मित्रांबरोबर कट्ट्यावर बसून वेळ घालवणे, चॉकलेट डे ला सगळ्यांना चॉकलेट देणे, फ्रेंडशिप डे ला कुठल्याही मुलीकडे बिनधास्त फ्रेंडशिप मागायची, वेलनटाइन डे ला एकट्यातच का होईना तिला प्रपोज करणे, आपल्या वर्गाने कॉलेजची मॅच जिंकल्यावर, ग्यादरिंगला बेधुंद होऊन नाचणे, traditional डे ला मावळ्यांचा, पेशव्यांचा वगेरे ड्रेस घालून नवीन इतिहास घडवणे, मित्रांच्या वाढदिवसाला रात्री बाराला उठून SMS पाठवणे, पुरं सेमिस्टर झोपा काढून ऐन exam च्या वेळेस रात्रभर जागून अभ्यास करणे, पेपर लिहिताना सुद्धा तिला मागे वळून पाहणे, तिच्या तोंडावरचे भाव आपल्यात सामावून घेणे, शेवटचा पपेर झाल्यावर कॉलेजभर दंगा धुडगूस घालणे, एवढं करूनही फर्स्टक्लास मध्ये पास होणे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही पण अनुभवलेल्या असतीलच. कॉलेज, म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कॉलेजची इमारत, आपला वर्ग, वर्गातील बेंच, ब्लॅकबोर्ड, कॉलेजचे कॅन्टीन, पार्किंग लॉट, लॅब, लाईब्ररी वगैरे वगैरे. आणि “ती. पण कॉलेजची शान म्हणजे आपल्या सर्वांच्या हक्काचा कॉलेज कट्टा. जसा बाजार भरतो तसा हा कट्टा पण भरतो. गोंगाट, गोंधळ, वादावादी, भांडणं, प्रेम, मदतीचा हात, इमोशनल ड्रामा याकरिता कॉलेजचा कट्टा भलताच प्रसिद्ध आहे. पण हा कुठे भरतो माहीत आहे? कॉलेजच्या ग्राऊंडवर, आपल्या वर्गात ऑफ लेक्चरला, वर्गाच्या बाकावर किवा कॉलेज कॅन्टीन मध्ये. बोलें तो कॉलेज कट्टा भरायला कुठलाच मुहूर्त लागत नाही. कॉलेजमधील सगळ्यात आवडती जागा कोणती, असा प्रश्न विचारला, तर कोणताही विद्यार्थी कट्टा असेच उत्तर देईल. आमचा कॉलेज कट्टा म्हणजे कॉलेजच्या गेटच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये मांडून ठेवलेले बेंच. त्या कट्ट्यामध्ये असे असतेच काय, की ज्यामुळे तो इतका लोकप्रिय व्हावा? याचे उत्तर बहुधा विद्यार्थीच देऊ शकतील. मुलांच्या जडणघडणीतला, अडीअडचणींचा, गप्पांचा, मजा-मस्तीचा महत्त्वाचा साक्षीदार कट्टाच असतो. याच कट्ट्यावर गप्पांचे फड रंगतात, भांडणंही रंगतात, मग समजुतींचा खेळही तिथेच रंगतो. कॉलेजच्या कट्ट्यांवरच पिकनिकचे प्लॅनिंग होते, पार्टीची तयारीही तिथलीच. मग हळूहळू कट्टा ही ओळख बनून जाते. कॅन्टीन मध्ये हरवण्याची मजा, लेक्चरला मारलेल्या दांड्या, गंमतीने काढलेल्या खोड्या, कारण नसताना केलेली भांडण, एकमेकांना चिडविणे, पिकनिक चे किस्से हे सर्व या कट्याने पहिलेले असते. हा कट्टा निर्जीव असला तरी त्यावर घालवलेले क्षण मात्र जिवंत असतात. कॉलेज कट्ट्यावरच्या गोष्टी पासून कुणी सुटले असे कधी झाले नाही. नव्या विद्यार्थ्याच्या चर्चे पासून ते एखाद्या प्रेमप्रकरणाचा झालेला किस्सा, राज ठाकरेंपासून ते अभ्यासाच्या चर्चा कट्ट्यावरच रंगत असतात. याच कट्यावर मला माझ्या वर्गातील मुलांची प्रेमप्रकरणे समजली. इथे प्रतेकजण कुणाच्या-ना-कुणाच्या नावाने ओळखला जाई. मी म्हणजे या सार्‍यांचा एक व्यासपीठच बनलो होतो. प्रत्येकजण आपली प्रत्येक गोष्ट माझ्याबरोबर शेअर करीत असे. त्याशिवाय आमचा एकही दिवस गेला नाही. असाच एखादा प्रसंग आला की हसता-हसता एक-मेकांना टाळी देण्यात मजा काही औरच असते. येवढं असूनही मी मात्र या सगळ्यात खूप वेगळा होतो. मित्रांबरोबर गप्पा मारता-मारता नकळत कशाची तरी जाणीव व्हायची, कोणाचीतरी चाहूल लगायची, मग मित्रांना कासातरी कटवत, “हा आलो रे जाऊनअसं म्हणत या कट्ट्यावरून मागे फिरायचो,“ ते कशामुळे? ते काय होत? मला माहीत नाही”. पण ते जेकाही होतं खूप चांगलं होत, कारण त्यामूळेच चांगलं काय? वाईट काय? याची जाणीव मात्र नेहमी व्हायची. आता तुम्ही म्हणाल कि कॉलेज कट्ट्यावर फक्त टिंगल टवाळ्याच करतोस का? तर असे नाही हा.. अभ्यास देखील करतो. वर्षभर गप्पांनी रंगलेला कट्टा परीक्षेच्या काळात नोटस, बुक्स, झेरोक्स आणि विद्यार्थी अश्यांनी कॉलेज कट्टा अभ्यासमय होऊन जातो. एखादा पक्षी ज्याप्रमाणे झाडाच्या सावलीत विसाव्यासाठी येत असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी या कट्ट्यावर एकत्र येत असतात. आपली सर्व सुख दुख इथेच एकमेकांना सांगतात. वर्षानुवर्ष एकच कट्टा असतो. मात्र त्यावर असणारे कॉलेज कट्टेकरी वर्षानुवर्ष बदलत असतात. परंतु विषय मात्र तेच असतात. हा असा कट्टा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असतो. कॉलेज आमची दुनिया, कट्टा आमचा पत्ता या पत्त्यावरती आमचा क्लास, आमचा श्वास, मैत्रीची सुरवात, दुष्मनीचा दावा कट्ट्यावरतीच. बोलतो आम्ही, भांडतो आम्ही कट्ट्यावरती, नडतो आम्ही, तोडतो आम्ही कट्ट्यावरती, प्रेमात पडतो प्रेमात वाहतो कट्ट्यावरती मस्तीत राहातो नादात जगतो कट्यावरती, जीवन फुलवतो आयुष्य सजवतो कट्ट्यावरती कॉलेज कट्टा, माझा कट्टा, आमचा कट्टा, नाद हा कट्याचा, कट्ट्यावरचा नाद आमचा. परीक्षेची नोटीस ऐकतो कट्ट्यावरतीच. लेक्चर ऑफ कळते कट्ट्यावरतीच, रिझल्ट उघडतात कट्ट्यावरती, इज्जत निघते, इज्जत मिळते कट्ट्यावरती. नापास होउन यायला इथे नसते कधी बंदी, वेगळी भाषा असते इथली वेगळे असतात कायदे, सिनीअर्स बरोबर चकाट्या पिटायचे असतात इथे फ़ायदे, अभ्यासाच्या विषयाला मात्र इथे नेहेमीच बंदी असते हिरवळीचा विषय मात्र इथे सगळ्यांच्या जीव्हाळ्याचा. प्रत्येक कॉलेजबाहेर एक कट्टा असतो कॉलेजला सुट्टी लागल्यावर मात्र हा कट्टा एकटाच पडतो. या कट्ट्याच्या जगातून बाहेर पडायची इच्छा का होत नाही? याचे उत्तर मला सापडलेले नाही. आणि सापडूही नाही शकत असचं वाटत. त्या कट्ट्याने दिलेल्या बऱ्यावाईट अनुभवांची शिदोरी घेऊन भविष्यात पाऊल ठेवायला विद्यार्थी तयार होतात. मग सुट्टीत कधीतरी त्या कट्ट्याची आठवण झाली, की मित्रांना फोनाफोनी होते आणि गप्पांच्या मैफलीत कधी त्या कट्ट्यावर जाऊन बसतो, ते कळतही नाही. म्हणून म्हणतो आयुष्यात एकदा तरी हा कॉलेज कट्टा अनुभवावाच. नाहीतर हे दिवस निघून गेल्यावर तुम्ही नक्की म्हणाल की, यार फक्त करियरचा विचार करताना कॉलेज लाइफ कुठे तरी एन्जोय करायच राहून गेल कि काय? मात्र सेमिस्टरचा रिझल्ट बघितल्यावर आमच्या मनाची अवस्था काहीशी अशी असते. ” आपला मित्र नापास झाल्यास जरा दु:ख होत आणि मित्र फर्स्ट क्लास मध्ये पास झाल्यास जरा जास्तच दु:ख होत .

Vaibhav V. Kudtarkar
S.Y.B.A.,
SRM_KDL-2014-15

Saturday, May 4, 2013

कातरवेळ

संध्याकाळची वेळ होती नेहमी प्रमाणे अंगणात बसलो होतो. कॉलेज चं पहिलं वर्ष संपून सुट्टी लागली होती. कॉलेज सुरू व्हायला पुरे दोन महीने होते. कॉलेज मध्ये असताना कधी सुट्टी पडते असे व्हायचे. पण सुट्टी पडून पंधरा दिवस झाले नाही तोवर का कोण जाने माझ मन खूप बैचेन होत. डोळे कुणालातरी पाहण्यासाठो व्याकुळ झाले होते.आकाशात काळे ढग चारी बाजूंनी भरून आले होते. काहीतरी वाचत बसावं म्हणून मी माझी कॉलेजची बॅग बाहेर घेऊन आलो आणि मागील वर्षाच्या नोट्सच्या वह्या चाळू लागलो. वह्या चाळता-चाळता अचानक माझा हात एका वहीच्या पानावर स्थिरावला आणि माझ मन अगदी भरून आल. तिचा तो नाजुक चेहरा माझ्या नजरेसमोरून वीज चमकावा तसा लक्क होऊन गेला. मी वर्गात असताना नकळत तिच्याकडे बघत तिच्या नावाच्या स्पेलिंगचं पहिलं अक्षर त्या वहीच्या पानावर कोरल होत. त्या वहीच्या पानावर हात फिरवत मी तो दिवस आठवण्यात रंगून गेलो. 
वर्गात माझ्या समोरच्याच बेंचवर बसायची ती. का कोण जाने मला तिला डोकाऊन बघण्याची सवयच लागली होती. कोणत ना-कोणत करणावरून तिच्याकडे लक्ष्य जायचाच. आता ती माझ्या मनात भरली होती.तिला बघितल्या शिवाय एकही दिवस माझा जात नसे. त्यादिवशी मी पहिल्यांदा तिच्याशी बोलण्याच धाडस केल मी.
“कॉलेज मध्ये एन.सी.सी. चा कॅम्प लागला होता. त्यानिमित्ताने आमच्या वर्गातील दहाजन आठवडाभर गैरहजर होतो. कॅम्पच्या शेवटच्या दिवशीच सर्वांनी ठरवून टाकल होत की, चुकलेला सिल्याबल्स कसा पूर्ण कारचा. कोण कुणाची वही घेणार हे अगोदरच ठरव्ल होत. यावेळी प्रत्येक जन आपल्या मनातलं सत्य वदवून दाखवत असे. मी मात्र माझ्या मनातील हे अंकुर बीज मनात तसेच दाबून ठेवायचो. आणि प्रतिसाद म्हणून फक्त वरून हसायचो पण मन मात्र आतून रडायच.
कॅम्प संपून कॉलेजमध्ये आल्यावर तिच्याकडे वही मागण्याची हिम्मतचं होईना. कशाला उगाचच म्हणून मी तो विषय तेवढ्यापूर्ता विसरून गेलो. मधल्या सुट्टी नंतर मी मित्रांसोबत कॅंटीन मधून येत होतो तोच ती समोर एकटीच उभी असलेली दिसली. मनात नसतानाही माझी पाऊले तिच्या दिशेने वळली. तिच्या समोर कासातरी दमभरत उभा राहिलो. मी म्हटलं “ अग तुझी इकनॉमिक्स ची वही मिळेल काय आजचा दिवस? मानेन होकार देत तीन होय म्हटलं. तिला माझ्या समोर एवढ्या जवळ पाहून माझ्या मनात भीती दाटून येत होती. ती आपल्या बॅग मधील वही काढण्यात मग्न होती मी तिच्याकडे पाहत डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. तिच्याकडील वही घेत मी एकदाचा तेथून सटकलो.
“तिला नेहमी बघणारा मी, पण ती आज माझ्या समोर उभी होती आणि माझ मन भितिने भरून येत होत. माझ मन कशाला तरी घाबरत होत.”
म्हणूनच अशा गोष्टी कधीच मनात कोंडून ठेऊ नयेत. मग अश्याच एखाद्या कातरवेळी त्या आठवणी जाग्या होतात आणि डोळे भरून आणतात.मग शेवठी एकटाच विरहात जाळून तरी काय उपयोग. उगाचच आपल्या जीवाला घोर लागून गातो. जीव कसा घाबरा होवून जातो आणि मनात एकाच गोष्ट सलत राहते ती म्हणजे “का? का म्हणून मी तिच्यात गुंतवून घेतलं स्वताला.”
मला अजूनही कळत नाही की, मनात नसताना सुद्धा मी तिच्या कडे एवढा आकर्षित का झालो. प्रत्येक वेळी तिच्याकडे वळून पाहण्याची सवयच जणू लागली होती मला. पण पुढे-पुढे हे सर्व विसरण्याचा प्रयत्न केला. कारण आम्ही मूल नकळत असल्या नकोत्या भ्रमात स्वताला अडकवून घेत असतो.
आता पुढे परीक्षा जवळ येत होती. नकोत्या गोष्टीत मला माझ मन अडकावायच नव्हतं. आपल मन कोणत्या गोष्टीत गुंफवायच हे आपल्याच हातात असत. जस आपण गुंतवू तस ते गुंतत जात.
संध्याकाळचे सात वाजले असतील. तोच भिंतीवरच्या घड्याळाचे सात टोल पडले आणि आतून आईचा आवाज ऐकू आला –अरे वैभव......... काय करतोय अजून बाहेर ? कातरवेल झाली. देवाकडे दिवा पेटव अगोदर ........
आईचे बोल कानावर पडताच क्षणात त्या आठवणींच्या स्वप्नातून मी बाहेर पडलो. हातपाय धुवून देवासमोर समई पेटून शुभंकरोती म्हटलं आणि मी देवाला एकाच प्रश्न विचारलला की ही कातरवेळ जीवाला लागणार्‍या, मनाला रडवणार्‍याच आठवणी का देते. 

Vaibhav V. Kudtarkar
F.Y.B.A. 2012-13
SRM College,Kudal

Tuesday, January 29, 2013

लिहील एक प्रेम पत्र

लिहील एक प्रेम पत्र,
फक्त तुझ्याच साठी,
नव्हते त्यात शब्द,
अन नव्हत्या मोठ्या बाती...
होता तो फक्त एकच फोटो...
तुझा नि माझा...
अन बाकी काहीच नव्हत माझ्याकडे,
तुला....
माझ हे प्रेम सांगण्यासाठी... .
बाकी काहीच नव्हत माझ्याकडे,
तुला....
माझ हे प्रेम...
....खरच सांगण्यासाठी... .

कितीही जगले कोणी

कितीही जगले कोणी
कोणासाठी..

कोणीच कोणासाठी मरत
नाही...

अनुभव येत असतात प्रत्येक
क्षणाला,

पण नशिबाचे चक्र थांबत
नाही...

आयुष्यात कितीही कराल
प्रेम कोणावर..

त्याचे मोल सहज कोणाला
कळत नाही..!!