वर्गात
माझ्या समोरच्याच बेंचवर बसायची ती. का कोण जाने मला तिला डोकाऊन बघण्याची सवयच
लागली होती. कोणत ना-कोणत करणावरून तिच्याकडे लक्ष्य जायचाच. आता ती माझ्या मनात
भरली होती.तिला बघितल्या शिवाय एकही दिवस माझा जात नसे. त्यादिवशी मी पहिल्यांदा
तिच्याशी बोलण्याच धाडस केल मी.
“कॉलेज
मध्ये एन.सी.सी. चा कॅम्प लागला होता. त्यानिमित्ताने आमच्या वर्गातील दहाजन
आठवडाभर गैरहजर होतो. कॅम्पच्या शेवटच्या दिवशीच सर्वांनी ठरवून टाकल होत की,
चुकलेला सिल्याबल्स कसा पूर्ण कारचा. कोण कुणाची वही घेणार हे अगोदरच ठरव्ल होत. यावेळी
प्रत्येक जन आपल्या मनातलं सत्य वदवून दाखवत असे. मी मात्र माझ्या मनातील हे अंकुर
बीज मनात तसेच दाबून ठेवायचो. आणि प्रतिसाद म्हणून फक्त वरून हसायचो पण मन मात्र
आतून रडायच.
कॅम्प
संपून कॉलेजमध्ये आल्यावर तिच्याकडे वही मागण्याची हिम्मतचं होईना. कशाला उगाचच
म्हणून मी तो विषय तेवढ्यापूर्ता विसरून गेलो. मधल्या सुट्टी नंतर मी मित्रांसोबत
कॅंटीन मधून येत होतो तोच ती समोर एकटीच उभी असलेली दिसली. मनात नसतानाही माझी
पाऊले तिच्या दिशेने वळली. तिच्या समोर कासातरी दमभरत उभा राहिलो. मी म्हटलं “ अग
तुझी इकनॉमिक्स ची वही मिळेल काय आजचा दिवस? मानेन होकार देत तीन होय
म्हटलं. तिला माझ्या समोर एवढ्या जवळ पाहून माझ्या मनात भीती दाटून येत होती. ती
आपल्या बॅग मधील वही काढण्यात मग्न होती मी तिच्याकडे पाहत डोळे मिटून एक दीर्घ
श्वास घेतला. तिच्याकडील वही घेत मी एकदाचा तेथून सटकलो.
“तिला
नेहमी बघणारा मी, पण ती आज माझ्या समोर उभी
होती आणि माझ मन भितिने भरून येत होत. माझ मन कशाला तरी घाबरत होत.”
म्हणूनच
अशा गोष्टी कधीच मनात कोंडून ठेऊ नयेत. मग अश्याच एखाद्या कातरवेळी त्या आठवणी
जाग्या होतात आणि डोळे भरून आणतात.मग शेवठी एकटाच विरहात जाळून तरी काय उपयोग. उगाचच
आपल्या जीवाला घोर लागून गातो. जीव कसा घाबरा होवून जातो आणि मनात एकाच गोष्ट सलत
राहते ती म्हणजे “का? का म्हणून मी तिच्यात गुंतवून
घेतलं स्वताला.”
मला
अजूनही कळत नाही की, मनात नसताना सुद्धा मी तिच्या
कडे एवढा आकर्षित का झालो. प्रत्येक वेळी तिच्याकडे वळून पाहण्याची सवयच जणू लागली
होती मला. पण पुढे-पुढे हे सर्व विसरण्याचा प्रयत्न केला. कारण आम्ही मूल नकळत
असल्या नकोत्या भ्रमात स्वताला अडकवून घेत असतो.
आता
पुढे परीक्षा जवळ येत होती. नकोत्या गोष्टीत मला माझ मन अडकावायच नव्हतं. आपल मन
कोणत्या गोष्टीत गुंफवायच हे आपल्याच हातात असत. जस आपण गुंतवू तस ते गुंतत जात.
संध्याकाळचे
सात वाजले असतील. तोच भिंतीवरच्या घड्याळाचे सात टोल पडले आणि आतून आईचा आवाज ऐकू
आला –अरे वैभव......... काय करतोय अजून बाहेर ? कातरवेल झाली. देवाकडे दिवा
पेटव अगोदर ........
आईचे
बोल कानावर पडताच क्षणात त्या आठवणींच्या स्वप्नातून मी बाहेर पडलो. हातपाय धुवून
देवासमोर समई पेटून शुभंकरोती म्हटलं आणि मी देवाला एकाच प्रश्न विचारलला की ही
कातरवेळ जीवाला लागणार्या, मनाला रडवणार्याच आठवणी का
देते.
Vaibhav V. Kudtarkar
F.Y.B.A. 2012-13
F.Y.B.A. 2012-13
SRM College,Kudal
No comments:
Post a Comment