Wednesday, January 25, 2012

तुझी आठवण

तुझी आठवण,तुझी आठवण,तुझी आठवण
प्राजक्तांच्या बकुळ फुलांची हृदयामाद्ध्ये जशी साठवण तुझी आठवण
तुझी आठवण पावसातही पाउस पडल्यानंतर
तुझी आठवण अन्तरातहि अन्तर पडल्यानंतर

तुझी आठवण येते आनिक कळच मारून जाते
तुझी आठवण डोळ्यान्मध्ये पानी ठेवून जाते
तुझी आठवण गहिरी करते हृदयातली पोकळी
तुझी आठवण उघडी करते भावनांची मुठी झाकल;ी

तुझी आठवण येण्याआधी तूच का येत नाहीस
तुझ्या वेड्या प्रेमिकास या मिठीत का घेत नाहीस
मी प्रेम तुझ्यावर केले याची शिक्षा काय मला
तू नाही येणार म्हणतात सारे पण नजर शोधते तुला
....वेडी नजर शोधते तुला

Sunday, January 22, 2012

श्री मनाचे श्लोक - २१ ते ४०

श्री मनाचे श्लोक - २१ ते ४०

मना वासना चूकवीं येरझारा।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥
मना यातना थोर हे गर्भवासीं।
मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥

मना सज्जना हीत माझें करावें।
रघुनायका दृढ चित्ती धरावें॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥

न बोलें मना राघवेवीण कांहीं।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥

रघुनायकावीण वांया शिणावे।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।
अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥
सुखाची घडी लोटतां सूख आहे।
पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥

देहेरक्षणाकारणें यत्न केला।
परी शेवटीं काळ घेउन गेला॥
करीं रे मना भक्ति या राघवाची।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी।
धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरीं।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥

दिनानात हा राम कोदंडधारी।
पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे।
वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥
पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥

समर्थाचिया सेचका वक्र पाहे।
असा सर्व भुमंडळी कोण आहे॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥

महासंकटी सोडिले देव जेणें।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥

अहल्या शिळा राघवें मुक्त केली।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥
जया वर्णितां शीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥
चिरंजीव केले जनी दास दोन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥

उपेक्षी कदा रामरुपी असेना।
जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥
शिरी भार वाहेन बोले पुराणीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥

असे हो जया अंतरी भाव जैसा।
वसे हो तया अंतरी देव तैसा॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे।
कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥

मना प्रार्थना तूजला एक आहे।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।
जयाचेनि योगें समाधान बाणे॥
तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे।
अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥
विविकें कुडी कल्पना पालटिजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥

श्री मनाचे श्लोक

श्री मनाचे श्लोक - १ ते २०

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥

मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥

मना राघवेंवीण आशा नको रे।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
नको रे मना यातना तेचि मोठी॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥

श्री मनाचे श्लोक

श्री मनाचे श्लोक - १ ते २०

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥

मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥

मना राघवेंवीण आशा नको रे।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
नको रे मना यातना तेचि मोठी॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥

श्री गणेशाय नमः ||

श्री गणेशाय नमः ||
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ |
निर्विघ्नम् कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ||

|| श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्रम् ||

|| ॐ ||
|| श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्रम् ||

श्रीपाद वल्लभ गुरोः वदनारविन्दं
वैराग्य दीप्ति परमोज्वलमद्वितीयम् |
मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्र नेत्रं
संसार - ताप - हरणं सततं स्मरामि ||

श्रीपाद वल्लभ गुरोः करकल्पवृक्षं
भक्तेष्ट - दान - निरतं रिपुसंक्षयं वै |
संस्मरणमात्र चिति - जागरणं सुभद्रं
संसार - भीति - शमनं सततं भजामि ||

श्रीपाद वल्लभ गुरोः परमेश्वरस्य
योगीश्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य |
श्री पर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं
त्रैलोक्य - पावन - पदाब्जमहं नमामि ||

|| श्रीपादराजमं शरणं प्रपद्ये ||

मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें | सौख्यकारी दुखःहारी, दूत वैष्णवगायका ||२||
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना पारितोषिका ||४||
ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, वंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुलना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा | वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा ||१३||
धन धान्य, पशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेत समंधादी, रोगव्याधी समस्तहीं | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती ||१७||
॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

श्री गणपती स्तोत्र मराठी अर्थ:

श्री गणपती स्तोत्र मराठी अर्थ:
भक्तांना सुख देणाऱ्या हे देवेश्वरा, आपण भक्तीप्रिय आणि गणांचे अधिपती आहात. हे गणनाथ मी आपल्याला नमस्कार करतो. आपण स्वानंद लोकाचे वासी आहात आणि आपण सिद्धीबुद्धीचे प्राणनाथ आहात. आपल्या नाभिमध्ये शेषनाग भूषण रूपाने विराजमान आहेत. हे ढुण्ढिराजा देवा आपल्याला मी नमस्कार करतो. आपल्या हातामध्ये वरद आणि अभय मुद्रा आहेत. आपण परशु धारण करणारे आहात. आपल्या हातामध्ये अंकुश शोभत आहे. आपल्या नाभिमध्ये नागराज विराजमान आहेत. आपल्याला मी नमस्कार करतो. आपण रोगरहित, सर्वस्वरूप आणि सर्वाना पूजनीय आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. आपणच सगुण व निर्गुण ब्रह्म आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. आपण ब्राह्मणांना ब्रह्मज्ञान देणारे आहात. हे गजानना मी आपल्याला नमस्कार करतो. आपण प्रथम पूजनीय, ज्येष्ठ आणि जेष्ठराज आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. सर्वांचे माता-पिता असलेल्या हे हेरंबा मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो. हे विघ्नेश्वर, आपण अनादी आहात आणि विघ्नांचे निर्माते आहात. आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो. हे लंबोदर! आपण भक्तांच्या विघ्नांचे हरण करणारे आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. योगीश्वर आपली भक्ती करून शांती मिळवितात. म्हणून आपण आम्हाला सुखशांती द्यावी. इथे हे गणपती स्तोत्र संपूर्ण झाले.

श्री गणपति स्तोत्र

श्री गणपति स्तोत्र
नमस्ते गणनाथाय गणानां पतये नमः I
भक्तिप्रियाय देवेश भक्तेभ्यः सुखदायक II १ II
स्वानन्दवासिने तुभ्यं सिद्धिबुद्धिवराय च I
नाभिशेषाय देवाय ढुण्ढिराजाय ते नमः II २ II
वरदाभयहस्ताय नमः परशुधारिणे I
नमस्ते सृणिहस्ताय नाभिशेषाय ते नमः II ३ II
अनामयाय सर्वाय सर्व पूज्याय ते नमः I
सगुणाय नमस्तुभ्यं ब्रह्मणे निर्गुणाय च II ४ II 
ब्रह्मभ्यो ब्रह्मदात्रे च गजानन नमोsस्तु ते I 
आदिपूज्याय ज्येष्ठाय ज्येष्ठराजाय ते नमः II ५ II
मात्रे पित्रे च सर्वेषां हेरम्बाय नमो नमः I
अनादये च विघ्नेश विघ्नकर्त्रे नमो नमः II ६ II 
विघ्नहर्त्रे स्वभक्तानां लम्बोदर नमोsस्तु ते I 
त्वदीयभक्तियोगेन योगीशाः शान्तिमागताः II ७ II
II इति श्री गणपति स्तोत्रं संपूर्णं II

Tuesday, January 17, 2012

स्वयंभू शिवथरघळ......

सकळ देवांचिये साक्षी।गुप्त उदंड भूवने।
                                                   सौख्यासि पावणे जाणे। आनंदवनभुवनी॥'
समर्थ रामदास स्वामींची असंख्य गुप्त भुवने असताना त्यांनी श्रीसमर्थ दासबोधादी ग्रंथांची निर्मिती केली ती शिवथरप्रांतातील घळ सध्या अस्तित्वात असलेली आहे अथवा कोणती? याबाबत संशोधन करणारे सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी
'वेदशास्त्र धर्मचर्चा। पुराणे माहात्मे किती।
कवित्व नूतने जीर्णे। आनंदवनभुवनी॥'
या समर्थ रामदासस्वामी लिखित 'आनंदवनभुवनी' कवनामध्ये दिलेल्या वर्णनांनुसार दासबोधादी ग्रंथांच्या निर्मितीचे ठिकाण शोधून काढले असून महाड-भोर रस्त्यापासून जवळच रामदासपठारजवळ सुंदरमठ आणि वरंध कुंभारकोंड येथे स्वयंभू शिवथर घळ शोधून काढली आहे. हे दोन्ही शोध दि.०१/०१/२०११ रोजी आध्यात्मिक जगतातील तमाम रामदासींसाठी सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी नववर्षभेट असल्याचे सांगितले आहे.
स्वयंभू शिवथरघळ
तब्बल शंभर वर्षांपूर्वी सन १९१० मध्ये समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक आणि संशोधक शंकर श्रीकृष्ण देव आणि इतिहाससंशोधक सेतू माधव पगडी यांच्यामते सध्या अस्तित्वात व सर्वशृत असलेली शिवथर घळ शोधून काढण्यात आली. मात्र, दासबोधादी ग्रंथांच्या निर्मितीचे हेच ते ठिकाण अथवा अन्य कोणते याबाबत शंकर देव यांच्या लिखाणामध्ये साशंकता वेळोवेळी दिसून येत असल्याने त्यांच्या शिवथरघळशोध समर्थसाहित्यासह समर्थ रामदास स्वामींच्याही साहित्याचे पारायण करणारे सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना ११ एप्रिल २००९ रोजी रामदासपठार येथील समर्थमठामागील बाजूस असलेल्या वरंध कुंभारकोंड गावाच्या हद्दीतील उभ्या डोंगरामध्ये एक घळ असल्याचे आढळून आले. भर वैशाख वणवा असलेल्या हवामानातही या घळीच्या डाव्या बाजूला असलेला धबधबा सहा इंच धारेने वाहत असल्याचे दिसून आले. मात्र, या धबधब्याचे पाणी त्या कातळाबाहेर पसरत नसल्याचेही आश्चर्य वाटत होते. घळीच्या प्रवेशद्वाराची भिंत मोजून दोन हात रूंदीची आणि प्रवेशद्वार तीन हात रूंदीचे असल्याने स्थापत्यशैलीचा प्रत्यय येत आहे. या भिंतीच्या बाहेर दोन खण असून दोन खिडक्यांसदृश्य हवा खेळती राहण्यासाठी पोकळयाही आहेत. घळीमध्ये प्रवेश केल्यावर समोरच समर्थ रामदास स्वामींची बसण्याची जागा दिसून येते. या बैठकीवर आसनस्थ झाल्यावर समोर साधारणत: अर्ध्या कि.मी. अंतरावर गोविंदमाची दिसते. तेथून बोलणा-याचे बोलणे थेट घळीमध्ये è0;कू येते. घळीच्या आतमध्ये सव्वासहा फूटापर्यंत तासलेली धनुष्याकृती गुहा आहे. किमान ५० ते ६० माणसे येथे बसू शकतात. या गुहेच्या आतील भागात एक खूपच दूर अशी शेवटाकडे निमूळती होत जाणारी पोकळी आहे. घळीच्या तासलेल्या वरच्या पाषाणाच्या भागात प्रकाशाचे परिवर्तन होऊ शकेल, असे तासलेले दिसून येते. त्यामुळे जशी ही गुहा हवेशीर वाटते तशी पुरेशा प्रकाशानेही परिपूर्ण आहे. घळीच्या आतील भागात असलेली भिंत एक हात रूंदीची असून त्यामागील बाजूला देवघर असावे असा उंचवटा दिसून येतो. तेथे भिंतीमध्ये काही खणही दिसून येतात. आतील हवामान प्रसन्न आहे. समोर पारमाची आणि गोविंदमाचीचे पठार देवगिरी टेकडी, तीन प्रवाह मिळतात असे गुप्तगंगेचे ठिकाण, घळीच्या समोरच संपणारी भटाच्या माळाची हद्द आणि सुरू होणारी मठाच्या माळाची जमीन असे वर्णन महसूल विभागाच्या सातबारा उता-यामध्येही वरंध सजेच्या हद्दीतील कुंभारकोंड गावामध्ये दिसून येते. येथे असलेल्या गुप्तगंगेचा उल्लेखही
'ग्रंथी जी वर्णिली मागे। गुप्तगंगा माहानदी।
जळात रोकडे प्राणी। आनंदवनभुवनी॥'
समर्थकृत आनंदवनभुवनी कवनामध्ये दिसून येते. समर्थांनी उल्लेखिलेले आनंदवनभुवनी हे स्थान सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना आढळून आलेले स्वयंभू शिवथरघळ असल्याचा दावा करताना प्रचलित आणि सर्वश्रृत शिवथरघळच आहे आणि येथेच समर्थांनी श्रीदासबोधाची व अन्य ग्रंथ व काव्यांची रचना केली असल्याचे सांगितले आहे. यासाठी त्यांनी असंख्य पुरावेदेखील प्रस्तुत प्रतिनिधीकडे सादर केले. या दाखले अन् पुराव्यांचे सार्थपण ज्या परिसरात हे आनंदवनभुवन आहे, तेथे चपखल बसत असल्याचे प्रत्यक्ष परिसरामध्ये प्रतिनिधीसोबत जाऊन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी दाखविले असल्याने आता या रामदासी सांप्रदायाला केवळ श्रीधरस्वामींना झालेल्या साक्षात्काराऐवजी प्रत्यक्षात समर्थांनी वर्णिलेल्या या आनंदवनभुवनाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 'आनंदवनभुवनी' या कवनामध्ये समर्थांनी
स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा माहानदी।
तीर्थासी तुळणा नाही। आनंदवनभुवनी॥'
या कवनानुसार समस्त रामदासी परिवाराने आणि समर्थ वाङमयाच्या वाचकांनी या 'तीर्थासी तुळणा नाही।' अशा स्वयंभू शिवथरघळीचे दर्शन घेण्याची आवश्यकता आहे. समर्थांनी 'आनंदवनभुवनी॥' कवनाच्या ५९ व्या कडव्यानंतर सांगता करताना 'इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम॥' असे लिहिले असल्याने सर्व समर्थ अनुग्रहींना या स्वयंभू शिवथरघळीला सर्वप्रथम नाव आणि मान देण्याची आज्ञाच जणू झाली आहे.आतापर्यंत ज्ञात असलेल्या शिवथर घळीबाबत केवळ श्रीधर स्वामींना झालेला दृष्टांत हाच फक्त विश्वसनिय मानण्यापेक्षा असंख्य पुराव 81;यांसह सदगुरु स्वामी अरविंदनाथ महाराज यांनी नव वर्षाची भेट दिलेल्या स्वयंभू शिवथरघळीचे जगभरातील समस्त रामदासी परिवाराने दर्शन घेवून जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ती `इति श्री वन भुवनी नाम मान प्रथम' या समर्थांच्याच आज्ञेसह अनुभवावी अशीच आहे.
सुंदरमठ रामदासपठार या गावामध्ये ही जागा साधारणत: तीन गुंठे आकाराच्या पायाच्या बांधकामासह अस्तित्वात आहे. या जागेस ब्रिटीश काळापासून 'टॅक्स फ्री' स्वरूप आहे म्हणजेच कायमस्वरूपी धारामाफी देण्यात आली आहे. महसूल विभागाच्या सातबारा उता-यात मठाचा माळ उल्लेख असलेला हा सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या समर्थमठाचा परिसर असून येथे 'सिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोड तेथे जाभलीच्या चउथरीयावर संतोषरूप बसले होते' म्हणजेच एका जांभळीच्या झाडाखालील चौथ-यावर समर्थ रामदास स्वामी बसले असताना कल्याणस्वामी शिवछत्रपतींचा निरोप घेऊन आल्याचा समर्थ हृदय ग्रंथाच्या ५०३ पानावर उल्लेख आहे. सप्तकाण्डात्मक श्रीदासायन ग्रंथाच्या पृष्ठ क्र. २०५ ते २०७ वरील उल्लेख पाहता 'सुंदरमठ म्हणजेच शिवथरची घळ हे श्री.सां.का.ले.२६ वरून निश्चित;कारण त्यात दुसरे दिवशी सुंदरमठी (शिवसमर्थांची) भेटी जाली' असे स्पष्ट म्हटले आहे. याप्रमाणे आपणास आतापर्यंत माहित असलेल्या शिवथरघळीच्या परिसरात सुंदरमठ दिसून येतो तो गेल्या अर्धशतकात बांधलेला आहे. कारण या शिवथरघळीचा शोधच मुळी १९१० साली समर्थ वाङमयाचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव आणि इतिहासतज्ज्ञ सेतू माधव पगडी यांच्यासह सामूहीक प्रयत्नांतून लागला आहे. या सर्वश्रृत शिवथरघळीची जागा धबधब्यालगत असली तरी तो धबधबा जेथे कोसळतो त्यालगत आहे. म्हणजे या जागेचे वर्णन रामदासस्वामींना अभिप्रेत 'स्वर्गाहून सुंदर' म्हणायला ती घळ तेवढया उंचीवर नाही. येथे असलेल्या सुंदरमठाचे बांधकाम हे ऐतिहासिक जागेत नाही. मात्र, सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या समर्थमठाचा परिसर असलेल्या या जागेत सुंदरमठाचा इतिहास हा महाराष्ट्रातील समर्थ भक्तजनांना ख-या दासबोधादी ग्रंथांच्या जन्मस्थानापर्यंत पोहोचविण्यास कारणीभूत ठरतो. कारण सर्वशृत शिवथरघळीपासून सुंदरमठापर्यंत दररोज ये-जा करणे समर्थांना केवळ अशक्य असल्याचे वारकरी संप्रदायाच्या चालण्याच्या वेगाचा ताळमेळ घालता दिसून येते. त्यावरून या सुंदरमठाजवळच हे दासबोधाचे जन्मस्थान असावे, या निष्कर्षाप्रत आल्यावर आढळून आलेल्या स्वयंभू आनंदवनभुवनी शिवथरघळीचे महत्व समर्थ रामदासस्वामींसाठी 'आनंदवनभुवनी॥' या उल्लेखाच्या सार्थ भावाप्रत असल्याचे आढळून येते. अफझलखानाने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ 81;नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता. याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आनी भाद्रपदमासी,
'समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला।
सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥'
हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते. यंदा या सुंदरमठात शनिवारी, ११ सप्टेंबर २०१० रोजी ३६५ वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रामदासपठार गावातील १० गणेशमूर्ती आणि अकरावा सुंदरमठातील गणपती असे दिसून आले. यामुळे समर्थांनी 'आनंदवनभुवनी॥' कवनात लिहिलेल्या १७ व्या कडव्यातील
'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचि ना।
गुप्त ते, गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी॥'
या विचित्रयोगाचा महिमा समर्थांप्रमाणे प्रस्तुत प्रतिनिधीसदेखील चक्रावणारा आहे. कारण ज्या दिवशी सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना स्वयंभू शिवथरघळ आढळून आली ती दिनांक ११/०३/२००९ म्हणजे २ + ९ =११ आणि समर्थांचे आनंदवनभुवन आणि सुंदरमठ सर्वसमर्थप्रेमींना नववर्षाची भेट म्हणून जाहिर करावयाचे आहे, तो दिवसही शनिवार अन् दिनांक आहे 0१/0१/११ म्हणजे हे अकरा अकराच आहे.

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदासांचे कल्पित चित्र
मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर
जन्म एप्रिल, इ.स. १६०८
जांब, जालना, महाराष्ट्र
समाधी / मृत्यू इ.स. १६८२
सज्जनगड, सातारा, महाराष्ट्र
पंथ / मत समर्थ संप्रदाय
साहित्यरचना दासबोध , मनाचे श्लोक, करुणाष्टके , आत्माराम, अनेक स्फुट रचना
भाषा मराठी
कार्य भक्ती-शक्तीचा प्रसार, जनजागृती , समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना
वडील सूर्याजी ठोसर
आई राणूबाई
प्रसिद्ध वचन जय जय रघुवीर समर्थ
तीर्थक्षेत्रे सज्जनगड, शिवथर घळ

॥ श्री राम समर्थ ॥

॥ श्री राम समर्थ ॥
समर्थ म्हणतात -
१. आधी संसार करावा नेटका | मग घ्यावें परमार्थ-विवेका ||
२. मराठा तितुका मेळवावा | आपुला महारष्ट्रधर्म वाढवावा ||
३. जो दुस-यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला ||
४. आहे तितुकें जतन करावे | पुढें आणिक मिळवावें ||
५. धटासी आणावा धट | उत्धटासी पाहिजे उत्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" ||
६. धर्मासाठी मरावें | मरोनी अवघ्यांसी मारावें | मारितां मारितां घ्यांवें | राज्य आपुलें ||
७. केल्याने होते आहे रे आधी केलेंचि पाहिजें ||
८. आधी केलें | मग सांगितलें ||
९. सामर्थ्य आहे चळवळेचें | जो जो करील तयाचें | परंतु तेथे भगवंताचें | आधिष्ठान पाहिजे || १०. देव मस्तकीं धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवा कां बडवावा | धर्मसंस्थापनेसाठी || कोणतेही कार्य करताना उपासना होणे महत्वाचे आहे.
चला, तुम्हीपण सोबत व्हा. सदगुरु, राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी विचार प्रचार (प्रसार) यात सामील व्हा आणी आनंदसागराचा अनुभव घ्या.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

-समर्थ रामदास स्वामिनी शिवरायांना लिहिलेले पत्र

-समर्थ रामदास स्वामिनी शिवरायांना लिहिलेले पत्र

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांस अधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी || 1 ||

परोपकाराचिया राशी, उदंड घडती जयाशी |
जयाचे गुणमहत्वाशी, तुलना कैशी || 2 ||

नरपति हयपति, गजपति गडपति |
पुरंधर आणि शक्ति, पृष्ठभागी || 3 ||

यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा || 4 ||

आचारशील विचारशील, दानशील धर्मशील |
सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठायी || 5 ||

धीर उदार सुंदर, शुरक्रियेसी तत्पर |
सावधपणेसी नृपवर, तुच्छ केले || 6 ||

तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राम्हणस्थाने बिघडली |
सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला || 7 ||

देवधर्म गोब्राम्हण, करावयासी रक्षण |
हृदायस्त झाला नारायण, प्रेरणा केली || ८ ||

उदंड पंडित पुराणिक, कविश्वर यज्ञिक वैदिक |
धूर्त तार्किक सभानायक, तुमचे ठायी || ९ ||

या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हा करीता || १० ||

आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होउनी कित्येक असती |
धन्य धन्य तुमची कीर्ति, विस्तारली || ११ ||

कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले |
कित्येकांसी आश्रय झाले, शिवकल्याण राजा || १२ ||

तुमचे देशी वास्तव्य केले, परन्तु वर्त्तमान नाही घेतले |
ऋणानुबन्धे विस्मरण जाहले, बा काय नेणु || १३ ||

सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति, सांगणे काय तुम्हा प्रति |
धर्मास्थापनेची कीर्ति, सांभाळली पाहिजे || १४ ||

उदंड राजकारण तटले, तेथे चित्त विभागले |
प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे || १५ ||

- समर्थ रामदास स्वामिनी शिवरायांना लिहिलेले पत्र

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात

श्रुती धन्य जाहल्या श्रवुनी आपली वार्ता,
रण सोडून सेनासागर अमुचे पळता |
अबला ही घरोघर खऱ्या लाजतील आता ,
भर दिवसा आम्हा दिसू लागली रात ||

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत 30;ालले कणखर ताठर दिल |
माघारी फिरणे नाही मराठी शील
विसरला राव मग काय लावता जात ||

जरी काल दाविली प्रभू गनिमाला पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात |
हा असा धावतो पुन्हा अरी शिबिरात
म्यानातून उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात ||

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले |
रिकिबीत घातले पाय झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात गीरीजात,
वेडात मराठे वीर दौडले सात ||

आश्चर्य मुग्ध टाकुनी मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना |
छावणीत शिरले थेट भेट गनिमाला
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात,
वेडात मराठे वीर दौसले सात ||

खालून आग वर आग, आग बाजूनी
समशेर उसळली सहस्त्रभ्रूर ती मानी |
गर्दीत लोपले सात जीव अभिमानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात,
वेडात मराठे वीर दौडले सात ||

दगडांवर दिसतील अजुनी तेथल्या टापा
ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा |
क्षितिजावर दिसतो अजुनी मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात,
वेडात मराठे वीर दौडले सात ||

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच 81;या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा !!

प्रारब्धापेक्षा प्रयत्न श्रेष्ठ

प्रारब्धापेक्षा प्रयत्न श्रेष्ठ

प्रयत्नवाद म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. अनेकदा अपयशी माणसे अपयशाचे खापर प्रारब्धाच्या माथी फोडतात. समर्थांना हे मान्य नाही. ते प्रयत्नालाच परमेश्वर मानतात. उलट दैववादी माणसाची कानउघाडणी करताना ते म्हणतात –

“अचूक येत्न करवेना । म्हणौन केले ते सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । काही केल्या ॥
भाग्यासी काय उणे रे । यत्नावाचून राहिले ।
यत्न तो देव जाणावा । अंतरी धरिता बरे ॥“

दुबळी माणसे ज्योतिषाकडे जातात आणि नसलेली साडेसाती मागे लावून घेतात. जो भविष्य सांगतो, त्याच्याकडे जाण्यापेक्षा जो भविष्य घडवतो त्याची कास धरावी. अनेकदा मोठेमोठे उद्योगपती कुठल्यातरी ज्योतिष्याच्या नादी लागलेले पाहायला मिळतात. काहीजण धंद्यात यश मिळावे म्हणून एखाद्या महाराजाच्या नादी लागतात. या बाबतीत समर्थांची भूमिका अत्यंत परखड आणि सडेतोड आहे. यश मिळाल्यानंतर त्याचे श्रेय भगवंताला किंवा एखाद्या सत्पुरुषाला अर्पण करावे. परंतु यश मिळावे म्हणून कुणाला साकडे घालू नये. समर्थ म्हणतात की, कष्ट केल्याशिवाय जीवनात यश मिळणार नाही. प्रयत्नाच्या साहाय्याने माणूस हातावरल्या रेषासुध्दा बदलू शकतो. ते म्हणतात –

“रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्ययास येते ।
डोळे झांकणी करावे ते । काये निमित्त ॥
घालून अकलेचा पवाड । व्हावे ब्रह्मांडाहून जाड ।
तेथे कैचे आणले द्वाड । करंटपण ॥“

बिटको टूथ पावडरचे मालक चव्हाण तरुणपणी अत्यंत गरीब होते. दोन वेळेच्या जेवणाची मारामार होती. अंगावर पुरेसे कपडे नव्हते. त्यांनी दंतमंजन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. प्रारंभी सायकलवरुन घरोघर टूथ पावडर नेऊन विकत. आज नाशिक शहरात बिटकोंच्या नावाच्या अनेक संस्था आहेत. चव्हाण यांनी मिळालेले यश देणगीरुपाने समाजात वाटले. कै. कमलाकर वालावलकर रावसाहेब गोगटेंसारख्या अनेक उद्योगपतींची चरित्रं वाचण्यासारखी आहेत. अखंड परिश्रमातून त्यांनी यश संपादन केले. याउलट दुसर्‍या किंवा तिसर्‍या पिढीत व्यसनाधीनता वाढल्यामुळे तेच उद्योगसमूह रसातळाला गेले. म्हणून अखंड सावधानता आणि अविश्रांत परिश्रम यांची नितांत गरज आहे.

हया भगव्याचा रंगच न्यारा

हया भगव्याचा रंगच न्यारा
हया भगव्याचा ढंगच न्यारा
हया भगव्याचा हो डॊलच न्यारा
मान-प्राण-शान भगवा
राष्टांचा या प्राण भगवा
करत्युत्वाची आण भगवा
दुरतेचे निशाण भगवा
हिदुत्वाचा प्राण भगवा
सज्ज व्हारे,सज्ज व्हारे
भगव्या खाली एक व्हारे
जय भवानी जय शिवाजी
जय जय जय जय भवानी
जय जय जय जय शिवाजी
भगव्याचा हो हया भगव्याचा
भगव्याचा हो माझ्या भगव्याचा
आहे मला अभ;िमान
भगवा निशाण भगवा निशाण
भगव्याने हो हया भगव्याने
दिला मला स्वाभिमान
भगवा निशाण भगवा निशाण
भगवा निशाण भगवा निशाण

शिवगान

शिवगान....
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय जहाला
शिवप्रभूची नजर ê7;िरे अन उठे मुलूख सारा
दिशादिशां भेदीत धावल्या खङगाच्या धारा
हे तूफान स्वातंत्र्याचे, ये उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला, घडाचौघडा झडे
शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे
हे रुप शक्ति-युक्तिचे
हा तेजाचा झोत उफाळून, सृष्टितून आला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
गंगा सिंधू, यमुना गोदा कलशातून आल्या
शिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या
धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातूनी उमटला हर्षे जयजयकार
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज
शिवछत्रपतींचा जय हो, श्रीजगदंबेचा जय
भरतभूमीचा जय हों
जयजयकारातूनी उजळल्या शतकांच्या माला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला.

शिवरायांचा पाळणा

शिवरायांचा पाळणा
गुणी बाळ असा जागसि का रे वांया नीज रे नीज शिवराया
अपरात्री प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाही
हा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला
निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १
ही शा;ंत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली
ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा
इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
हे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया

शिवाजी महाराज आरती

शिवाजी महाराज आरती
जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१
श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२
त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३
ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४
बोला शिवाजी महाराज की ... जय !!

निश्चयाचा महामेरु .........

निश्चयाचा महामेरु
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी
नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा
आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी
धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले
देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.

***शिवगान***

श्रीरामाला पूजती कोणी
श्रीकृष्णाला भजती कोणी
जन्मभरी ओठावर माझ्या
शिवछत्रपतींची अमर कहाणी...
रामायण अन् महाभारत हे
राहील अथवा जाईल
शिवरायांची कीर्तिगाथा
विश्वची सारे गाईल...
मर्यादा पुरुषोत्तम राम
बुद्धिमान अन् धूर्तचि श्याम
शिवप्रभूंचे घ्यावे नाम...
पित्यासाठी गडकोट सोडिती
औरंग्याशी शंभू राखितो
मावळसेना जमवून सारे
स्वराज्य हिंदवी स्वये स्थापिती
भूषण म्हणतो शिवरायांना
धर्मरक्षी मारुनी यवनांना
कडे कपारी सह्यागिरीच्या
गर्जून देती मानवंदना...
रामदास ते समर्थ योगी
म्हणती शिवबा राज्य न भोगी
जीवन त्याचे आहे त्यागी
शिवराजा जणू श्रीमंत योगी...
निश्चयासी हा गौरीशंकरु
सकल प्रजेचा तो आधारु
प्राण संकटी घालूनी सत्वरं
प्रजा रक्षितो शिवबा तत्पर...
हा वीरांचा असे वीराग्रणी
विजयी होई सदा रणांगणी
जन्मभरी ओठावर म्हणूनी
शिवछत्रपतिंची अमर कहाणी..

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.

प्रभो शिवाजी राजा (स्वातंत्र्यवीर सावरकर)
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.
 
:- स्वातंत्र्यवीर सावरकर
 
"वास्तविक संपूर्ण शिवचरित्र अद्याप इतिहासकारांना गवसलेलंच नाही.

"वास्तविक संपूर्ण शिवचरित्र अद्याप इतिहासकारांना गवसलेलंच नाही. लक्षावधि कागदपत्रे अजून अंधारातच आहेत. अज्ञानामुळे आणि अनास्थेमुळे अगणित कागदपत्रे नष्ट होत आहेत. कुणी पाणी तापविण्यासाठी त्यांचे जळण करत आहे, कुणी फटाकडे करण्यासाठी ती वापरीत आहे; कुणी ताबूताला ती अस्तर म्हणून चिकटवत आहे. वाळवीच्या किड्यांचा उदरनिर्वाह मुख्यत: या ऐतिहासिक कागदपत्रांवरच चालतो म्हणे! आळस, अज्ञान व अनास्था ह्या तिघांचं प्राबल्य आमच्या जीवनात पसरलेलं आहे. इतिहास म्हणजे अत्यंत मौल्यवान राष्ट्रीय धनदौलत आहे."
-- बाबासाहेब पुरंदरे

स्वप्नस्वरूपा, हे शिवाभूपा, वससि कुठे त्या काळी ?

गुहागुहातून नाव गुंजले तुझे पराक्रमशाली
वीर भूषणा, भगवा ध्वज तो मळवी मेली माती
तुझा दिव्य संदेश स्मशानी आज कावळे गाती
तुझिया इतिहासाचा होई आजवरी उपहास
अभिमानाने परवशतेचा गळा बांधिला फास
तुझ्या कृतीचे हसे जाहले, हसे शेंबडे पोर
अनादराने तुला ठरवले चोर दरोडेखोर

चुकलेल्या इतिहासा, ऐसे कशास वदसी खोटे
नोंद चुकीची तुझी, मोडिसी उगाच अपुली बोटे
दाबुनिया ठेविलेस जरी तू, सत्य कधी न मरते
अमर अजर ते आजवरीही, मरणानंतर उरते
विस्मृतीच्या कवचांत कोंडले, अंतरात धगधगते
उफाळूनी येईल फोडुनी, सत्य सदा ते जगते

वैरागी राजया, कंदरी झुळझुळली शिवगंगा
किती काळ ती कृश प्रवाही लपवी चंचल अंगा
पळांत झाला प्रपात घावे प्रचंड आवेगांनी
कड्याकड्यांतुनि उड्या घेत ये जलौघ शतधारांनी
तशी विजेची तेज शलाका घुसली होऊन झोत
उजळायाला दिगंत सारे निजले अंधारात
शिवरायाची विजय पताका फडके आज नभांत
कशी राहिली ती लपलेली काळाच्या उदरात

कृतांत सिंहासनी विराजे मूर्तिमंत अमरत्व
उन्नत भाळावरी झळाळे किरीट द्युति कर्तुत्व
ओळखले प्रभू ओळखले रे आज तुला भूपाला
वंगभूमीच्या करभारांची कंठी मंगलमाला
पंचप्राणाची पंचारति, तुजला ओवाळाया
महाप्रतापी शिवराया हो प्रसन्न वंगजना या

ऐकला न तव वीर भैरवा तो त्या काळी
मंत्रघोष भारती मनाते या संकट काळी
एकत्रित कर संघ-भावना सर्व हिंदवी देश
कोटी कोटी कंठातून उमटे तोच दिव्य आदेश
भगवा ध्वज तो, व्याघ्रांवर ते संन्याशाची छाटी
एक राष्ट्र करी राज्य हिंदवी हे भारत वंद्य मराठी
देई आम्हा चैतन्य समर्था तुझा दिव्य आदेश
धर्मराज्य हे करावयाते अखंड भारत देश 

- रवीन्द्रनाथ टागोर

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला.......

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला

दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा धडाडल्या
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||

वाकुनी आदिलशाहास कुर्निसात देऊनी
प्रलयकाळ तो प्रचंड खान निघे तेथुनी
हादरली धरणी व्योम शेषहि शहारला || १ ||

खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती
उंट हत्ती पालख्या हि रांग लांब लांब ती
टोळधाड हि निघे स्वतंत्रता गिळायला || 2 ||

श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले
रक्त तापले कराल खड्ग सिद्ध जाहले
मर्दनास कालियास कृष्ण सिद्ध जाहला || ३ ||

तुळजापूरची भवानी माय महन्मंगला
राउळात अधमखान दैत्यासह पोचला
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला || ४ ||

सावधान हो शिवा वैर्याची रात्र ही
काळ येतसे समीप साध तूच वेळ ही
देऊनी बळी अजास तोषवी भवानीला || ५ ||

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार ........

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार |
त्रिवार जयजयकार त्रिवार जयजयकार ||

धर्माचा अभिमानी राजा | देशाचा संरक्षक राजा ||
चारित्र्याचा पालक राजा | घडवी देशोद्धार || १ ||

स्फुर्तीकेंद्र हे भारतीयांचे | दैवत आमुच्या नवतरूणांचे ||
आद्य प्रवर्तक संघटनेचे | सदा विजयी होणार || २ ||

पूजा बांधु सामर्थ्याची | इच्छापूर्ती शिवरायाची ||
उठता उर्मी समर्पणाची | काय उणे पडणार || ३ ||

रात्र भयानक ही वैरयाची | जाणीव होई कर्तव्याची ||
घेऊ प्रतिज्ञा एकजुटीची | नको आता माघार || ४ ||

कितीक झाले आणि होतील | राजे असंख्य जगती ||
परी न शिवबा समान होईल | या अवनीवरती, राजे छत्रपती || ५ ||

वाघाच्या जबड्यात घालूनी हात ....

वाघाच्या जबड्यात घालूनी हात
मोजितो दात, जात ही आमुची
पहा चाळून पाने आमुच्या इतिहासाची ||

पुरुष काय स्त्रिया ही लढल्या , परंपरा ही आमुची
तुम्हा काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची
दाभाड्याची उमा ती लढली, चीन्नम्मा चीत्तुराची || १ ||

जिवंत वीर तर लढले, लढले नवल काय ते घडले
धडावेगळे शीर झाल्यावर, धड ते अवघे लढले
मुरारबाजी म्हणती त्याला, अमर कथा ही त्याची || २ ||

वंशज आम्ही रामकृष्ण अन गुरु गोविन्दांचे
तसेच आमुच्या शिवबाचे अन प्रताप राणाचे
आम्हा बरोबर लढण्या नसेल व्याली माय कुणाची || ३ ||

दुष्ट हेतूने आला जरी तू गिळण्या हिंदुस्थान
तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्थान
दुष्ट शत्रूचे मढे गाडण्या जमीन पुरते आमुची || ४ ||