Saturday, June 23, 2012

ती रुसली तेव्हा काय घडले…

ती रुसली तेव्हा काय घडले…
मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा…
मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा…
... मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा…
मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा…
मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा…
मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा…
मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..
मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..
मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..
मी म्हणालो आता पुरे तुझे रुसवे फुगवे अन पुरे तुझा नखरा,
ती म्हणाली अरे राजा, पुन्हा असं झालं तर मला सरळं बिलगत जा

तो म्हणतो ….........

तो म्हणतो …

बदल…
विचार बदल…
आचार बदल…
बोलन बदल
वागन बदल
स्वत:लाच पूर्णपणे बदल…

अरे सगळंच बदलायचं तर माझ्यातली मी राहणार काय?
आणि इतकंच जर बदलायची गरज असेल तर प्रेमात पडताना माझ्यात तू असे पाहिलेसच काय होतेस ?
नक्की माझ्यावर प्रेम करतोस की त्यात काही व्यवहार शोधतोयस?

एखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.
नसेल स्विकारणं जमत तर कायमचंच विसरायचं असतं.

आता हे तुझं तूच ठरव…
तुला नक्की मी हवी आहे की माझ्यातील बदल..???

कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,.....

 कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,
तरी तुझ्या प्रेमात पडलो मी..
तुझ्या सोबत जगण्याचे,
सुंदर स्वप्न पाहिले मी..
या स्वप्नाला माझ्या डोळ्यांत,
सदैव साठवून ठेवले मी..
स्वप्न हे स्वप्नाचं असते,
उशिरा हे जाणले मी..
तुझ्या प्रेमात पूर्णपणे,
स्वःताला विसरून गेलो मी..
पण नशिबाला मान्य नव्हते,
तुझ्या सोबत जगावे मी..

मी उद्या मंगळसुत्र आणेल तर..........

एकदा एक तुरुणी कॉलेज राखी पौर्णिमेला राख्या घेऊन येते.

त्या दिवशी तरुणांची प्रेझेंटी तशी कमीच असते. त्यात उरलेली मुलेही पसार होतात.

परंतु, एक तरूण (स्मार्ट) बसला असतो कट्ट्यावर...

ती तरुणी त्याच्याकडे जाते आणि म्हणाली, 'हात दे...तुला राखी बांधते.'

त्यावर तो म्हणातो, 'मुळीच नाही!'

ती म्हणते, का? काय झालं?

तो म्हणतो, वा! ग वा ! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसुत्र आणेल तर तु का माझ्या हातून बांधून घेणार आहेस काय?

रोज सकाळी उठल्यावर ठरवते..

रोज सकाळी उठल्यावर ठरवते..
आज अजिबात आठवण काढायची नाही

मग दिवस सुरु होतो सरत राहतो वेळ ...
मोबाईल च्या बट नांशी उगाच होत राहतो खेळ..
MSG करावा की करावा एक फ़ोन.. काहीच सुचत नाही...
कारण बोलण्या सारखही आपल्यात आता काहीच उरले नाही...

मग उगाच log in करून तुझे जुनेच ईमेल वाचायचे..
गीते सारखी त्याची पारायने करत रहायचे
वाचून कधी येत हसू तर कधी डोळ्यात येत पाणी....
शेवटी दिवसभरच रेंगाळत राहतात मनी तुज्या आठवणी..
खर सांगू हल्ली कामात अस लक्षच लागत नाही...

झाले गेले विसरून आता मला नव्याने उभ रहायचय...
स्वतासठी नाही पण माज्या मान्सानसाठी हसायचय...
मलाही आता मन मोकल करायचय....
सगळी बंधन तोडून पुन्हा एकदा स्वछंद जगायचय...
मनासारख झाले नाही म्हणून जगन थांबत नाही....

रोज सकाळी उठल्यावर ठरवते..
आज अजिबात आठवण काढायची नाही......

हृदयाला दिल्या वेदना..............

हृदयाला दिल्या वेदना,
तेवढ्या त्या घेऊन जा..
उध्वस्त झालेल्या घरट्याला,
एकदातरी पाहून जा..
आजवर मोजल्या मी तारखा,
फक्त गगनात तुटताना..
मीही तुटलो तुझ्यासोबत,
हे तू विसरून जा..
फसलं कोण ? फसवलं कोणी ?
हे सांगायलाचं का हवं ?
फसणं माझ्यासाठी अजून फसवणं,
तुला नाही नवं..
फसवणूक केली तू,
तरी निरपराधी तूचं आहेस..
खरी प्रीत करून पुन्हा,
अपराधी मीचं आहे..

तुझ्याशिवाय " जगणं मला आता....

" तुझ्याशिवाय " जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे......
आयुष्य तर कधिच संपले,
आता नूसतेचं जगणार आहे.....

अंगणामधले फुल सुद्धा,
तुझ्याशिवाय कोमेजणार आहे....
देव्हार्यातील वात देखील,
तुझ्या विरहात जळणार आहे.....

येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे......
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे.....

स्वप्न तर केव्हांचेच तुटले,
आठवणी फक्त राहणार आहे......
तु जरी सोडुन गेला असलास ,
तरी तु माझ्यातच ऊरणार आहे......

तुझी येण्याची आशा कधीच सोडली,
आता मीच जग सोडणार आहे.....
तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे..... ;

कुणीतरी मला विचारले........

कुणीतरी मला विचारले,
ती कुठे आहे..?????

मी हसत उत्तर दिले:

माझ्या श्वासात,
माझ्या हृदयात,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक
ठोक्यात..
यावर
पुन्हा विचारले गेले मग,
ती कुठे
नाही..?????

मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले:
माझ्या नशिबात
आणि माझ्या आयुष्यात.. 

आयुष्याच्या ह्या वळणावर

आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं . . .

कोण असेल ती, कशी असेल ती,

शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात . . .

मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी असते समोर, भिडते नजर थेट,
मैत्रीचा प्रवास असा काही सुरु होतो,
तिच्यातच स्वप्नं सुंदरी शोधण्याचा कार्यक्रम चालू होतो . . .

काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा असतो वेगळाच गेम . . .

पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत . . .

म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . .
"अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे"
"क्या कोई मजनू भी कभी अकेला मरता हे"..

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत...

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत...
खरच तिच्यावर मी मनापासुन प्रेम केल होत..!!♥

पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत... नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत...
आयुष्यात पहिल्यांदाच प्रेमकेल होत..!♥

एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत ...
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम केलहोत..! ♥

दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत ...
मैत्रीच नात मात्र पुढे चालुठेवीन अस सांगितल होत...
आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम केल होत..! ♥

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत...
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत...
आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केल होत..! ♥

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत...
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत...
आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम केल होत..!♥

इतरांसाठी मात्र माझ प्रेम एक तफी॔ होत...
पण मी मात्र तिच्यासाठी प्रेम साठवुन ठेवल होत...
आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम केल होत.!!♥♥
आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम केल होत.!!♥♥

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही…
का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते
तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण…
मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार
करावा असेही कधी वाटत नाही… रात्री छान च असतात …
तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला…
प्रेम कधी सफल होते तर कधी नाही… ते जीवनात
कधी ही सब कूच नसत पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्यात ते नेहमीच
जपायाच असत… प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च
कुणाला उलगडणार नाही …
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही...

प्रेम म्हणजे, लवकरच भेटण्याचे दिलेले वचन

 प्रेम म्हणजे, लवकरच भेटण्याचे दिलेले वचन
५ वर्षाची मुलगी:- प्रेम म्हणजे, मीहळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेत
काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे.
... ♥ १० वर्षाची मुलगी :-प्रेम म्हणजे,एकत्र अभ्यास करताना पेन्सिलघ्यायच्य ा
बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्याहाताला केलेला स्पर्श.
♥ १५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले
गेल्यावर त्याने
स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा.
♥ १८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने
मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा
भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा.
♥ २१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या
ठिकाणीत्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक
दिलेली भेट.
♥ २६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात
गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी.
♥ ३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे,मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला
स्वयंपाक.
♥ ५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे,तो आजारी असून, बरेच दिवस
बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद.
♥ ६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे,त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या
जन्मात लवकरच
भेटण्याचे दिलेले वचन

खूप दिवसापास्न चाललय डोक्यात...

खूप दिवसापास्न चाललय डोक्यात...
कविता करू असं आलय मनात..
पण कशावर करू..काय लिहू..
काही सुचेनास झालय..!!

समोर आई बसलीये..

तिच्यावर २ ओळी लिहू म्हणून आलं मनात..
पण मग बाबांना राग नाही येणार..?
सारखं सारखं आई लाच का म्हणून देवपण देऊ..
बाबांनी काय कमी सोसलंय माझ्यासाठी?
छे यार काहीच कळेनास झालंय..!!

आज काल मित्रांची पण खूप आठवण येतेय..
त्यांच्यासोबत घालवलेला एकूण एक क्षण आठवतोय..
पण त्या क्षणांची मजा कवितेत सामावणार आहे थोडीच..?
ती एका पार्टी ची रंगत परत मिळणारे का हो मुळीच..?
आणि कविता वाचल्यावर त्यांच्या शिव्या पडणार त्या तर वेगळ्याच..!
काय लिहू आता...डोकं बंद पडलंय..!!

कधी कधी वाटत..काही तरी मोठं लिहाव..
आयुष्य वगैरे कल्पना आपणही मांडून बघावं..
देवालाही जरा आपल्या परीक्षेत नापास करावं..
पण मी म्हणालो म्हणून असं होणारे का खरंच?
आणी झालंच जरी..तर कोण बसणारे बघत..आहे का तेवढा वेळ कुणाला..
कोणासाठी कविता करू मग मी..?

खरंच..पटलय आता मनाला...
कविता काही खाऊची पेंड नाही..
ठरवून काही कविता होत नाही..
आणी सुचायला आमचे मेंदू तेवढे "काल्पनिक" नाहीत..
जाऊ दे आता...
कविता परत करायची नाही..!!!

खास मुलीच्या मनातलं..

खास मुलीच्या मनातलं..
कितीदाही भेटलो तरीही,
प्रत्येक वेळी तीचं हुरहूर असते..
तुझ्या मिठीत आल्यावर मी,
स्वःतालाही हरवून बसते..

तुझ्या स्पर्शाने अंगावर,
गुलमोहर फुलतो..
आकाशातला चंद्र,
मुखचंद्रावर येतो..
डोळ्याने तू काही सांगताचं,
शब्दही विरून जातात..

स्पर्शाच्या तुझ्या भाषेला,
मग डोळेही फितूर होतात..
दोन ह्रदयांची धडधड,
एकसारखीचं असते..
तू माझा कधी होतोस,

अन् ?????
मी तुझी झालेली असते.

तो आणि ती...

तो आणि ती...

आज परत भांडले दोघं...

ती रागवली अन रुसून बसली...
ती रागवल्यावर इतकी छान का दिसते हे त्याला न सुटणार कोडं...

तीही मग मुद्दाम रुसून बसते...
तो ही थोडावेळ चिडचिड करतो...
पण ती रुसली म्हटल्यावर त्याची नीट चिडचिडही होतं नाही...
मग तो उगाच तिला आवडेल असं काहीतरी करतो...
उलटसुलट बडबडतो... वाकडेतिकडे चेहरे करतो...
मग असंच कुठल्यातरी एका क्षणी ती खुदकन हसते...

तिच्या त्या रागवल्यानंतर जास्त छान दिसण्याच कारण

" कोणीतरी " आपलं आपल्याला मनवण्यासाठी हे सगळं
करेल हा ' विश्वास ' !!!! ती मुळात भांडतेचं त्यासाठी..

प्रेम म्हणजे....

प्रेम म्हणजे....
रोज रात्री आकाशात तारा तुटतो का हे पाहणं..
आणि तुटणाऱ्या ताऱ्याकडे तो फक्त आपलाच व्हावा हे एकच मागणं ...

प्रेम म्हणजे...

डोळे बंद केले कि त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येण...
आणि डोळे उघडले कि त्यालाच शोधण....

प्रेम म्हणजे...
एकांतात त्याची आठवण येण....
आणि चारचौघात सुद्धा फक्त त्याच्याच विचारात बुडणं..

प्रेम म्हणजे...
कधीही न आवडलेल्या गोष्टी...
फक्त त्याला आवडतात म्हणून आवडून घेण...

प्रेम म्हणजे...
त्याच्या गुणांवर भाळण...
पण त्या पेक्षाही त्याच्यात असणार्या दोषान सहित त्याला स्विकारण....

प्रेम म्हणजे...
जरी आज त्याच या जगातील अस्तित्व संपलय...तरी...
निव्वळ त्याला दिलेल्या वचनामुळे डोळ्यात अश्रू असून सुद्धा हसणं..

प्रत्येक मुलगी सुंदर असते.....

प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते.......... ....
बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते........... . ...
आंतरिक सुंदरता मनाला खूप भावते............... .
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ..
कोणी कायेने सुंदर असते...........
कोणी मनाने सुंदर असते........... .
कोणी संस्काराने सुंदरअसते...... ..... .
कोणी विचाराने सुंदर असते...........
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ..
कोणाची चाल सुंदर असते........
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते...........
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते........... ...
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते........... .
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ..
कोणाचे गाणे सुंदर असते........... .
कोणाचे लिखाण सुंदर असते......
कोणाचे कविता सुंदर असते........
कोणाचे वस्त्र सुंदर असते........... .
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ..
केवळ बाह्य रुपावरील सुंदरतेवर भुलू नका.......
मनाची सुंदरता विसरू नका............
तिच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर आणि शरीराच्या भूमितीवर करू नका........
मनाच्या भूमितीचा अभ्यास करा.आणि सुंदरता ठरवा........... ...
कारण प्रत्येक मुलगी सुंदर असते.....

गर्ल्फ़्रेंड नसल्याचा अभीमान

गर्ल्फ़्रेंड नसल्याचा अभीमान
अहो ऐकलं का ? आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आमच्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते

बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
आणि बाईक पुसण्याचे आम्ही काधिच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भर खातो
अणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
अणी रात्री बेरात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आमचे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

मित्रांच्या सगळ्या योजनांमध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या योजनांमध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

लोकांना टाळयायला आम्च्या कडे बाहाने नसतात,
आमचे तर बूवा अड्डे सग्ळ्यांनाच माहीत असतात,
अणी ठरल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले,
तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

सुट्ट्या अणी एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नस.ते,
बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बरथडेट असते,
बाकी तारखा लकश्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,
टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,
अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,
कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,
तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,
सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,
अणी अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,
कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही...!

मी कसा हा दुरावा सहन करतोह

कस सांगू राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
दिवसभर फक्त तुझ्या आटवणीनमध्येच मी रमलेला असतो.

वाट पाहत असताना,

वेळ जणू कासव होतो,
घड्याळ त्याच्या टिक टिक आवाजाने,
माझी छेड कडू पाहतो,
त्यांना ठाऊक असतेना,
मी तुझी वाट पाहत असतो.

कस सांगू राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,

दर सेकंद, मिंट, तास मोजून काडतो,
तू सोबत नसताना हि,
तू सोबत असल्यासारखे,
तुझ्याशी गप्पा मारतो.
दिवस भराच्या माझ्या गमती जमती,
तुला सांगण्यासाठी साठून ठेवतो.

कस सांगू राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,

खूपच जार आठवण आली,
तर घट डोळे मिटून,
माझ्या आठवणीतल्या तुला,
माझ्या पापण्यांचे परदे करून,
चलचित्र सारखे पाहतो.

पाहतो,
तुझे सारखे केसातून हात फिरवणे,
लाजेने डोळे खाली टाकून,
चेहेरा हाता आढ लपवणे,
आणि, हळूच मिश्कील हसणे.
असे तुझे सुंदर दृश्य पाहण्यात,
मी माझे मान रमवातोय..

कस सांगू राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,

जेव्हा तो क्षण;
तुझ्याशी बोलण्याचाजवळ येतो.
हृदय अति वेगाने धाऊ लागतय,
मान प्रसंनचीत होतो,
मी एक विलक्षण आनंद अनुभवतो,
कारण काही क्षणात,
मी तुझ्याशी बोलणार असतोह.
अश्या दुराव्याने वाढलेलं माझ प्रेम,
मी तुला देणार असतो.

कस सांगू राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
दिवसभर फक्त तुझ्या आठवणीनमधेच मी रमलेला असतो.

प्राजक्त फुलतच होते

प्राजक्त फुलतच होते,
प्रित जुळतच होती,
की,असह्य विरह वेदनेत,
ती दोघं होरपळतच होती....

प्रित आसवे गळतच होती,

पावले परतीला वळतच होती,
की,अहंकाराच्या वडवानलात,
ती दोन मने जळतच होती....

पुन्हा कधीही एकत्र न येण्याची,

सल ह्रदयी भळभळतच होती,
की,प्राक्तनातले भोग भोगण्यासाठी,
नजर देव्हार्‍यापाशी वळतच होती....

अंधारवाटेवरुन एकटाच होता चालत

अंधारवाटेवरुन एकटाच होता चालत,
तो प्रकाश किरणाच्या शोधात.....

रक्ताळलेल्या पायांनी ठेचकाळत,

वेदनेला उराशी घट्ट कवटाळत,
मिट्ट काळोखात हातांनी चाचपडत,
एक तरी आशेचा किरण दिसेल,
या भावनेने आपल्याच नादात....

मैलोगणीक चालल्यानंतर मात्र,

एक आशेचा किरण दिसला,
त्याला पाहुन तोही ओशाळवाणं हसला,
म्हणाला मीही शोधत फिरतोय,
या निराशावादी जगात एकातरी,
आशावादी माणसाला.....

मग म्हणाला अरे वेड्यांनो,

निराश होण्याचे काहीच कारण नाही,
निराशावादी जगात एक तरी,
आशेचा किरण असतो,
जो नंतर मोठा प्रकाशमान होतो,
पण निराशावादी माणुस मात्र,
त्याच त्याच निराशेच्या गर्तेत,
सतत गटांगळ्या खातो.....

अन आशावादी माणुस मात्र,

पुन्हा उठुन चालु लागतो,
काळोख्या वाटेवरुन प्रकाशाच्या शोधात,
नव्या उमेदीने अन नव्या उभारीने,
आपल्याच नादात.....

आज पुन्हा एकदा पंख लावुन

आज पुन्हा एकदा पंख लावुन,
आभाळात उंच उडावसं वाटतंय,
आज आतुन मन हसत असलं तरी,
उगीचंच कुणावर तरी चिडावसं वाटतंय.....

का होतं असं कुणी सांगेल का...?

आभाळातील ईंद्रधनु रंगेल का...?
हे कुणाला तरी विचारावसं वाटतंय,
कुणाच्या तरी गळ्यात पडून,
मनसोक्त रडावसं वाटतंय.........

आज खुप दिवसांनी बहरलेय मी,

का कुणास ठाऊक पण,
त्याच्या आठवणींनी शहारलेय मी,
हे कुणाला तरी सांगावसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा राहुन राहुन,
माझं मलाच चिडवावसं वाटतंय......

बावरलेल्या मनाने चहुकडे पाहतेय मी,

आज न राहुन स्वतःच लाजतेय मी,
हितगुज माझ्या मनाशीच करावसं वाटतंय,
आज आभाळाकडे तोंड करुन,
आनंदाने ओरडावसं वाटतंय..........

ऐन वसंतातल्या त्या बेधुंद रात्री

ऐन वसंतातल्या त्या बेधुंद रात्री,
पावसाची एक जोरदार सर आली,
ऋतुराजाच्या त्या अवचित आगमनाने,
रातराणी ही बेभान झाली.....

अवखळ वारा ही होता संगतीला,
प्राजक्ताचा गंध ही होता पंगतीला,
आसमंत ही कसा बहरून आला,
सुटला दरवळ ओल्या मातीला.....

आकाशीचा चंद्रमा ही,
हसत होता गाली,
चांदणीच्या ही मुखकमलावर,
फुटली होती लाली,
निसर्गाचा हा अनोखा खेळ पहात,
झाडावरची पाखरं ही चिडीचुप झाली.....

तशातच ती,
त्याच्या हाताला धरुन,
आडोसा शोधीत होती,
पावसाच्या अवचित कोसळण्याने,
दोघंही चिंब भिजत होती,
त्याची चोरटी नजर,
तिच्या चेहर्‍यावर खिळली,
तिच्या केसांतली एक ओली बट,
तिच्या नाजुक गालाशी झोंबत होती.....

मग तोही जरासा बावरला,
तिने ही ढळणारा पदर सावरला,
ती दोघंही मग,
प्रितीची वाट चालू लागली,
कोकिळही बेभानपणे,
मस्त शीळ घालू लागली.....

ऐन वसंतातली ती रात्र,
कशी बेधुंद झाली होती,
त्या प्रेमिकांच्या मनातली,
दरी ही अरुंद झाली होती,
अवखळ वारा आता कसा,
बेधुंद,बेलगाम झाला होता,
अन ओली माती सुगंधाने,
कशी स्वच्छंद न्हाली होती.......

मी त्याचीच होती पण....

मी त्याचीच होती पण....
मीही प्रेम केले होते त्याच्यावर,
पण त्याला ते ओळखताच आले नाही,
मी तर नेहमी त्याचीच होती,
पण त्यालाच माझे होता आले नाही......
माझ्या मनातील खरे प्रेम,
त्याला कधी पाहताच आले नाही,
डोळ्यांसमोरून दूर केला तरी,
मनातून त्याला काढताच आले नाही......
त्याचा विरहाचा दु:खातून,
अजूनही बाहेर पडता आले नाही......
खूप प्रयत्न करून देखील,
त्याला विसरताच आले नाही.......
तो सोडून गेला तरी,
मला त्याला सोडताच आले,
चार चैघात मला कधीच,
मनमोकळे हसताच आले नाही.......
सात पावलेही आज त्याला,
माझाबरोबर चालता आले नाही.....,
सात जन्माचा जोडीदार ज्याला मानले,
त्याला या एका जन्मांत सुधा माझे होता आले नाही.......

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
 प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता .....

पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते..

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते...!!

जेव्हा एखादी"ठेच"काळजाला लागते ...