Thursday, June 28, 2012

मनाला माझ्या उसवून गेलीस



मनाला माझ्या उसवून गेलीस
आठवणी काळजात बांधून गेलीस ___
जाळ विरहाचा जाळलास असा
अश्रूंची कवाडं उघडून गेलीस ____

ऋतूचक्र प्रेमाचं शिकवून गेलीस

कधी थंडी कधी ग्रीष्मात पोळून गेलीस ___
फुलवलास वसंत कधी तू प्रीतीचा
अन ओलीव मनाची शेवटी भेगाळून गेलीस ___

वाटा नशीबाच्या तुच ठरवून गेलीस
माझ्या जिंदगीची पान काही लिहून गेलीस ____
जपलेली पाने मी ... दुमडून काही
पण जाताना संपूर्ण वहीच तू फाडून गेलीस ___

काही क्षण दिवाने रंगवून गेलीस
नशा तशीच मदिरेतहि सांगून गेलीस ___
तुझ्या आठवणींची धुंदीच इतकी
मादिरेवर सुद्धा शेवटी तू हासून गेलीस ___

'काळजी घे स्वताची' जाताना बोलून गेलीस
अन काळजात एक जागा राखून गेलीस
तूला बेवफा ठरवून तरी ठरवू कसा मी ???
वळून पाहिलंस जाताना .......अन भिजलेली पापणी तू दाखवून गेलीस ...



 

Thursday, June 28, 2012

मनाला माझ्या उसवून गेलीस



मनाला माझ्या उसवून गेलीस
आठवणी काळजात बांधून गेलीस ___
जाळ विरहाचा जाळलास असा
अश्रूंची कवाडं उघडून गेलीस ____

ऋतूचक्र प्रेमाचं शिकवून गेलीस

कधी थंडी कधी ग्रीष्मात पोळून गेलीस ___
फुलवलास वसंत कधी तू प्रीतीचा
अन ओलीव मनाची शेवटी भेगाळून गेलीस ___

वाटा नशीबाच्या तुच ठरवून गेलीस
माझ्या जिंदगीची पान काही लिहून गेलीस ____
जपलेली पाने मी ... दुमडून काही
पण जाताना संपूर्ण वहीच तू फाडून गेलीस ___

काही क्षण दिवाने रंगवून गेलीस
नशा तशीच मदिरेतहि सांगून गेलीस ___
तुझ्या आठवणींची धुंदीच इतकी
मादिरेवर सुद्धा शेवटी तू हासून गेलीस ___

'काळजी घे स्वताची' जाताना बोलून गेलीस
अन काळजात एक जागा राखून गेलीस
तूला बेवफा ठरवून तरी ठरवू कसा मी ???
वळून पाहिलंस जाताना .......अन भिजलेली पापणी तू दाखवून गेलीस ...