Saturday, June 16, 2012

पाऊस आठवणींचा.....




पाऊस आठवणींचा.....
एक सांगू का तूला...
तूला वेळ असेन तर सांगते..
पण आज काल तू नेहमीच व्यस्त असतोस...
कशी आहेस असे म्हणतोस...
अन नंतर बोलेन असे म्हणुन ....
परत कामात व्यस्त....फ़क्त थोडॆसे ऎक ना...
..काय झाले....काल ना....मी
अशी एकांती होती ...तेव्हा...
माझ्या मनात...
आपल्या आठवणींचा पाऊस....
धो धो पडायला लागला...
...मनातले आभाळ दाटून आले...
झालेला स्पर्श विज होऊन झंकारायला लागला....
भावनां गारा होऊन पडत होत्या...
जणू आज आठवणींचा प्रत्येक थेंब ....
माझ्या मनाला न्हाऊ घालत होता...
अन माझ्या डोळ्याना आठवण...
पाऊस पाडून ओली करत होती...
अन तुझा शब्द न शब्द ...
या गारठलेल्या मनास उब देत होता...
तो आठवणींच्या पावसाचा थेंब....
ओंजळीत घेत...
माझ्या दोन्ही हातांनी....
अश्रुत मिसळत जात होता....
माझ्या प्रत्येक अश्रुचा थेंब ....
तू जपून ठेव....
जो शेवट्पर्यंत राहील....
तो थेंब मीच असेन.........
........असाच पाऊस आठवणींचा पड्त राहू दे....
तू नाही जवळ....पण तूझी आठवण मात्र
आठवणींच्या पावसात अशीच चिंब भिजू दे.........



Saturday, June 16, 2012

पाऊस आठवणींचा.....




पाऊस आठवणींचा.....
एक सांगू का तूला...
तूला वेळ असेन तर सांगते..
पण आज काल तू नेहमीच व्यस्त असतोस...
कशी आहेस असे म्हणतोस...
अन नंतर बोलेन असे म्हणुन ....
परत कामात व्यस्त....फ़क्त थोडॆसे ऎक ना...
..काय झाले....काल ना....मी
अशी एकांती होती ...तेव्हा...
माझ्या मनात...
आपल्या आठवणींचा पाऊस....
धो धो पडायला लागला...
...मनातले आभाळ दाटून आले...
झालेला स्पर्श विज होऊन झंकारायला लागला....
भावनां गारा होऊन पडत होत्या...
जणू आज आठवणींचा प्रत्येक थेंब ....
माझ्या मनाला न्हाऊ घालत होता...
अन माझ्या डोळ्याना आठवण...
पाऊस पाडून ओली करत होती...
अन तुझा शब्द न शब्द ...
या गारठलेल्या मनास उब देत होता...
तो आठवणींच्या पावसाचा थेंब....
ओंजळीत घेत...
माझ्या दोन्ही हातांनी....
अश्रुत मिसळत जात होता....
माझ्या प्रत्येक अश्रुचा थेंब ....
तू जपून ठेव....
जो शेवट्पर्यंत राहील....
तो थेंब मीच असेन.........
........असाच पाऊस आठवणींचा पड्त राहू दे....
तू नाही जवळ....पण तूझी आठवण मात्र
आठवणींच्या पावसात अशीच चिंब भिजू दे.........