Saturday, June 2, 2012

असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ...

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये॥
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ धृ ॥
नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार॥
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ १
असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे॥
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ २
शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार॥
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ३
कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव॥
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ४ ॥
आधी उत्सुक्‍तांचा जीव, त्याला बांधून घ्यावी शीव॥
घर दार उबवत रहावे फक्‍त, डबके सोडून हिंडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ५ ॥
स्वतःलाच घालत धाक, कुरकूर रेटत ठवलं चाक॥
खेचत ठेवले अजून गाडे, आता फार ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ६ ॥
कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ॥
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥

--- संदीप खरे

No comments:

Post a Comment