Friday, February 10, 2012

संध्याकाळ ...



संध्याकाळ ...
दाटलेलं आभाळ
मोर पिसारा फुलवायला
मन भरून नाचायला
पावसात चिंब व्हायला पिसारा फुलवून तयार
... तितक्यात तिच्यावर हलकेच सूर्यकिरण ढगांमधून वाट काढून पडतात
आधीच तिचे डोळे पावसासाठी अधीर आता आणखीनच चमकतात
ढगांकडे पावसाचा आनंद व्यक्त करायला विजा आहेत गडगडाट आहे
मोराकडे त्याचं पिसारा आहे
पण तिच्याकडे...
तिच्याकडे तिच सुंदर मोहक लाजणार हसू आहे
फरक फक्त व्यक्त करण्यामध्ये आहे.


Wednesday, February 8, 2012

अशी पाखरे


अशी पाखरे येती ;आणिक स्मृति ठेवुनी जाती
 दोन दिसांची रंगतसंगत; दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा, पहिला वहिला; झाडामागे उभा राहिला
 जरा लाजुनि, जाय उजळुनी; काळोखाच्या राती

फुलून येता फुल बोलले; मी मरणावर हृदय तोलले
 नव्हते नंतर, परी निरंतर; गंधित झाली माती

हात एक तो हळु थरथरला; पाठीवर मायेने फिरला
 देवघरातिल समईमधुनी; अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी; गीत एक मोहरले ओठी
 त्या जुळल्या हृदयांची गाथा; सूर अजुनही गाती 


  - मंगेश पाडगावकर   

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी


अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती


  - मंगेश पाडगावकर   

जाहल्या काही चुका


जाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली
काजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली
मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

सौख्य माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या भावना
मोर स्वप्नांचे निळे अन्‌ विंधणाऱ्या वेदना
मी असे गीतांतुनी सर्वस्व माझे वाहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

संपता पूजा स्वरांची हात तू देशील का ?
दाटुनी काळोख येता तू घरी नेशील का ?
पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

  - मंगेश पाडगावकर   

Friday, February 10, 2012

संध्याकाळ ...



संध्याकाळ ...
दाटलेलं आभाळ
मोर पिसारा फुलवायला
मन भरून नाचायला
पावसात चिंब व्हायला पिसारा फुलवून तयार
... तितक्यात तिच्यावर हलकेच सूर्यकिरण ढगांमधून वाट काढून पडतात
आधीच तिचे डोळे पावसासाठी अधीर आता आणखीनच चमकतात
ढगांकडे पावसाचा आनंद व्यक्त करायला विजा आहेत गडगडाट आहे
मोराकडे त्याचं पिसारा आहे
पण तिच्याकडे...
तिच्याकडे तिच सुंदर मोहक लाजणार हसू आहे
फरक फक्त व्यक्त करण्यामध्ये आहे.


Wednesday, February 8, 2012

अशी पाखरे


अशी पाखरे येती ;आणिक स्मृति ठेवुनी जाती
 दोन दिसांची रंगतसंगत; दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा, पहिला वहिला; झाडामागे उभा राहिला
 जरा लाजुनि, जाय उजळुनी; काळोखाच्या राती

फुलून येता फुल बोलले; मी मरणावर हृदय तोलले
 नव्हते नंतर, परी निरंतर; गंधित झाली माती

हात एक तो हळु थरथरला; पाठीवर मायेने फिरला
 देवघरातिल समईमधुनी; अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी; गीत एक मोहरले ओठी
 त्या जुळल्या हृदयांची गाथा; सूर अजुनही गाती 


  - मंगेश पाडगावकर   

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी


अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती


  - मंगेश पाडगावकर   

जाहल्या काही चुका


जाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली
काजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली
मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

सौख्य माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या भावना
मोर स्वप्नांचे निळे अन्‌ विंधणाऱ्या वेदना
मी असे गीतांतुनी सर्वस्व माझे वाहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

संपता पूजा स्वरांची हात तू देशील का ?
दाटुनी काळोख येता तू घरी नेशील का ?
पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

  - मंगेश पाडगावकर