Pages

Monday, July 30, 2012

स्वप्नांवर माणूस जगतो का?



मला वाटत बरीच माणसे आपल्या मनातील भावना न दाखवता आपल्या अंतरमनात साठऊन तसेच जीवन जगत असतात .त्या आठवणीच्या स्वप्नातच आपण सारे जगत असतो. आणि एखाद्या आठवणींच्या स्वप्नावरच आपण झोपत असतो.आणि त्यात रमतो सुद्धा, पण जाग येईपर्यंतच.

जागेपणीही स्वप्ने उराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर.
मला वाटत आपण सारे स्वप्नावरच जगत असतो.`कारण जशी एखादी सुगंधीत अगरबत्ती स्वत: जळून दुसर्‍यासाठी सुगंध दरवळत असते.मला वाटत चांगली  सुगंधीत अगरबत्ती आणि स्वप्न यांचा अगदी जवळचा संबंध आहे,कारण शेवठी दोघांची ही रखाच होते. 

हो आणि ते आपल्या माणण्यावर -सुद्धा आहे. काहीजण ही अशी मजेशीर,आपल्याला शिकवण देणारी स्वप्ने घाबरून किवा त्यांचा तिरस्कार वाटून ती धुडकाऊन लावत असतात .
जेव्हा कधी माझे मन बैचेन होते त्या-त्या वेळी मी स्वप्नांचा आधार घेतल्याशिवाय राहत नाही.आणि हीच स्वप्ने आपल्याला जीवन जगण्याची दिशा ऊमेदिने दाखवत आसतात. आपल्याला फक्त ती ओळखता आली पाहिजेत.स्वप्न म्हणजेच मानसच्या मनातील स्फूर्ति होय. जी मोठ्या मनाची माणसे असतात त्यांनाच त्या स्वप्नांचा अर्थ समजतो.स्वप्न नसेल तर आपल मन एखाद्या ओसाड माळरानाप्रमाणे होऊन जात. 

मी मात्र स्वप्नात जेवढा रमतो , तेवढा कशातच रमत नाही .काही माणसे स्वप्नांची आठवण झाली की तळमळत असतात.मी त्या स्वप्नांनमध्येच सुखावतो.कारण-
 स्वप्न मात्र माझ्या मालकीची आहेत.जीवन माझ्या मालकीच नाही.त्यामुळे स्वप्नांत मला हव्या-त्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. पाहिजे त्या व्यक्ति भेटू शकतात. पुन्हा त्यात कुणाचीही भीती नाही. ना घरातल्यांची नाही,
 ना बाहेरच्यांची.

आणि स्टेटस- स्टेटस काय ते अगदी अबाधित राहत

.
वैभव ..............


ते दिवस म्हणजे ..


ते दिवस म्हणजे तारुण्यातील बेरीज-वजाबाकीचा आलेखच ......
तारुण्यआयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ.
प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा,प्रेमासाठी वाट्टेलते करण्याचा.
स्वताची झालेली फटफजिती कबुल करण्याचा,दुसर्याची गंमत मजेतच दुरून बघण्याचा एक वेगळा आनंद .
पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते.
विसरू म्हणता विसरता येत नाही .नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही.वास्तवाला सामोरे जायचे धैर्य
कधी-कधी दाखवावे लागते.प्रेमात पडल्यावर दुखरा कोपरा मनात तसाच ठेऊन काहीजण जगत असतात.
काही त्यातून बाहेरच येत नाहीत .
मागचे भोग विसरून वाटेला आलेल्या मार्गाने नेटकेपणाने चालणारे मोजकेच असतात .
तर काहीजण जीवनात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन फसवे सुख मिळवतात .
प्रेमातील निरनिराळ्या छटा,त्यातील आत्मीयता, जोम,वेळेनुसार असफल झालेल्या प्रेमातील वेदना,कारुण्य,
तडजोड,सच्चेपणा,
या सर्व आठवणी कधी-कधी विनोदाने मनाला खुद्कन हसवणार्या,तर कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्या असता

वैभव......

Monday, July 16, 2012

माझ्या स्मरणातील एक आठवण ...............



मला चांगलं आठवतय त्या दिवशी मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. माझ काम उरकून मी पुन्हा घरी यायला निघालो. मी माझी बाइक रस्त्यातच उभीकरून गेलो होतो .मी गाडीच्या दिशेनं येत होतो तेवड्यात मला मित्राचा फोन आला नेहमीच्या सवयी प्रमाणे मी फोन रिसिव करत-करत मी गाडीची किक मारणार एवढ्यात माझ्या समोर अचानक वीज चमकावी तसा मी बिथरलो पूर्वीच्या सर्व आठवणी अंतकरनात उफाळून येत घर करू लागल्या होत्या. मी कसाबसा हातातील मोबाईल सावरत मित्राला बर-बर म्हणत फोन ठेवला आणि मी एक क्षणभर स्तब्ध उभा राहिलो.समोर माझ्या स्मरणातील एक चेहरा समोरून येतांना मला दिसला तो दूसरा कोणी नसून तीच होती ती. मी एक मिनिट भर तिच्या डोळ्यात पाहत उभा होतो.मला असा अचानक आपल्या समोर बेधडक उभा बघूण तीही क्षणभर बावरून गेली. तिच्या सोबत तिची आई पण होती वाटत .माझ्या वरील आपली नजर चोरत ती आई च्या मागून जात  त्या दोघी समोरील दुकानाच्या दिशेने गेल्या मी माझी बाइक ढकलत जरा पुढे गेलो व तिच्या दिशेने पाहू लागलो  “त्यावेळी माझ मन मला सांगत होत की,का वेड्या मला पुन्हा-पुन्हा त्या आठवणीच्या वेदना देतोस,ती विसरली ही असेल तूला आणि तुझ्या त्या नजर भेटीला ” तरी ही मी तिच्या माठमोर्‍या चेहर्‍याकडे  पाहत उभा होतो. मला माझ्या मनाचे संकेत खरेच वाटू लागले होते. “कि ती विसरली विसरली ही असेल मला”,हा विचार मनात येतो-न-तोच तीने मागे वळून माज्यावर एक कटाक्ष्य टाकला ,मी एकदम सुखाऊन गेलो तिच्या त्या नजरेत अस काही सामर्थ्य होते कि माझ्या मनात दोन वर्षापूर्वीवीच्या त्या नजर भेटीक्या आठवणी ताज्या झाल्या . तिच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होते ,ते तेज मला रोज जीवन जगण्याची एक नवी दिशा दाखवत होते.मीपण त्यातच समाधान मानत असे .”माझ्या आयुष्यातील  ती पहिलीच मुलगी होती ती ,तिच्या डोळ्यातील तेज मला तिच्याकडे आकर्षित करत होते,मी मात्र तिच्या नजर भेटीतच माझे विश्व शोधत होतो “.

त्या दोघी परत माझ्या दिशेने येऊ लागल्या मी क्षणभर स्तब्ध राहून आजू-बाजूला नजर फिरवीत  पुन्हा तिच्या दिशेने पाहू लागलो तिच्या समवेत तिची आई असावी,तिच्या आईच्या डोळ्यात एक स्मित हास्य मला दिसत होते.”ती आपल्या मनात म्हणत असेल की काय बाई ही आज कालची मूल मुलगी दिसली कि “अचानक  काहीतरी हरवल्यागत घुटमळत राहतात “.  “ मी तिच्या आई ची नजर चुकवित पुन्हा तीच्या नजरेचा आनंद अनुभवू लागलो आणि क्षनातच माय-लेक माझ्या बाजूने पुढे-पुढे  चालत जाऊ लागल्या .............................

मी तसाच गाडीवर बसून मागे वळून तीच्या नजर कटाक्षाची वाट बघत होतो. आता मात्र तिने माघे वळून पहिले नाही हातातील पिशवी पायात रेंगाळत तशीच ती चालत राहिली आणि तीला शक्य ही झाले नसते...........................
हा आमच्या नजर भेटीचा खेळ फक्त पाच-ते –सहा मिनटेच चालला.मी ही स्वताला क्षणभर सावरत आपल्याकडे कोणी पाहत तर नाही ना याचा अंदाज  घेत पुढे निघून गेलो ........त्यावेळी जाताना माझ्या मध्ये एक वेगळीच स्फूर्ति निर्माण होत होती.मला गगन ठेंगण झाल्या सारख वाटत होत .पण मनात मात्र एक प्रकारची भीती पण वाटत होती.कारण तीच्या मनात काय चालयल हे तर मला माहीतच नव्हतं “कारण मी उगाचच तिचा विचार करून माझ्या स्थिर मनाला बैचेन करत होतो .”तीच्या मनात तसे नसेल ही काही ,पण तीच्या मुळे मला क्षनिक का होईना समाधान मिळत होते.  

झाले दोनदिवस असेच गेले  त्या दोन दिवसात माझे मन एवढे  बैचेन झाले  कि मला क्षना- क्षनाला तिचे ते बोलके  डोळे माझ्या नजरे समोर येत असत .पण मी माझ्या मानला समजावत होतो कि कशाला उगाचच नकोत्या कटकटी आपल्या मागे लाऊन घ्या.कारण आमच्या कुडाळ परिसरात माझ्या “वैभव कुडतरकर ”या नावाला किंमत –एक वट होती ,बर्‍याच मोठ मोठ्या लोकांमध्ये  वावरणारा मी ,त्यांच्या मनात  मी एक चांगला मुलगा म्हणून असलेली मूर्ति मला बेरंग कराची  नव्हती,कारण मला माहीत होत कि नाव कंमवायला संपूर्ण आयुष्य जात ,पण ते कमवलेल नाव घालवण्यासाठी एक कारण पुरेसं असतं “.मला मात्र तस काही कराच नव्हत .पण   त्यादिवशी नियतीच्या मनात काही वेगळच होत .कॉलेज मध्ये थोडा अगोदरच उशीरच झाला होता, पोटात भुकपण जोराची होती, सरल गाडी घेऊन आमच्या ऑफिस जवळ आलो व माझी बॅग ऑफिस मध्ये ठेऊन घरी जाण्यासाठी निघालो पावसाचे दिवस होते. आभाळ चारी बाजूंनी भरून आले होते . मी माझा रेनसिटर अंगात चढवत माझ्या गाडीच्या दिशेने जात होतो तोच माझ्या लाक्षात  आल कि आपल्याला कोणी तरी नेहाळतय म्हणून मी रेनसीटरची हाताची बटणे लावत-लावत समोर पहिले ,समोर एक गाडी उभी होती आणि तीच “नजर”  मला नेहाळत होती. म्हणजे माझे डोळे त्या नजरेची वाट  बघत होते . तीच होती ती . मी क्षनभर माझे डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला व संपूर्ण अंग शहारल्या गत स्तब्ध उभा राहिलो .लगेचच मी तीच्याकडे नजर फिरवली ,तिचे डोळे मला काही तरी सांगत होते. क्षनात माझ्या मनाने मला जाणीव करून दिली कि,”वैभव तू पुन्हा उगाचच अडकतो आहेस बघ .........मी स्वताला सावरत माझ्या गाडीवर बसलो ,गाडीची किक कधी सहज न बसणारी त्यावेळी अगदी सहज बसली ,मी गाडी वळवली आणि पुन्हा एक क्षन तीच्या कडे पहिले ,तिने पण माझ्या कडे पाहून न पाहिल्या सारखे करत नजर फिरवली . “त्यावेळी माझ मन मला सांगत कि “, “ती मनात म्हणत असेल कि अरे वेड्या तू माझ्यावर एवढ प्रेम करतोस ,निदान माझ नाव तरी विचार मला”. त्यावेळी तिच्या सोबत तिचा पाच-सहा वर्षाचा भाऊ पण होता .”त्याच वेळी माझ्या मनात एक विचार येऊन गेला कि मला पण एक बहीण आहे. आणि तीच्या बाबतीत असे काही ............ष्ये मी तो विचार ही करू शकत नव्हतो .मग ती पण दुसर्‍या कुणाची बहीण आहेच ना”.

मी स्वताला सावरत विलंब न लावता तिथुन पुढे निघून गेलो. पुढे गाडी वळवताना माझी नजर पुन्हा गाडीच्या दिशेने वळली ,मागे पाहतो तर काय तिची नजर माझ्या नजरेची मागे वळून आतुरतेने वाट पाहत होती .....................................   
माझ मन अजूनही ती नजर विसरायला तयार नाही .माझ्या बाबतीत हा मुलीचा पहिलाच प्रसंग होता. आज-काल मी ते एक माझ्या जागेपणीतले स्वप्न होते असेच समजून विसरून जायचा प्रयत्न करतोय. याच्या अगोधर कुठल्या  मुलीच्या नजरेला –नजर भिडवण्याची माझी हिम्मतच नाही झाली .पण मात्र हिच्या बाबतीत तसे काही घडे नाही. कारण तिच्या नजरेत असे काही सामर्थ्य होते की मी तिच्या कडे आकर्षित झालो होतो. पण आपलेच नशीब अशा घटना घालून आपली परिक्षाच घेत असते  जणू.
मी एक मोठ्या मनाचा मुलगा आहे. आता मी हे सर्व विसरून माझ्या करीअर कडे लक्ष्य केन्द्रित केले आहे. कारण नुसत्या कल्पना करून पोट भरत नसत . आज काल च्या काळात पैसाच हा सर्वस्व आहे.पैसा असेलतर सर्व काही या दुनियेत शक्य आहे .मला पण मोठं बणायचे खूप नाव नाव कमवयचे . आपल आयुष्य हे आपल्यालाच  घडवायच असत. वेळ निघून गेल्यावर उगाचच नशिबाला दोष देत बसण्या पेक्षा असलेल्या वेळेचा योग्य उपयोग करून घेण हे आपल्याच हातात असत.तसे माझ्यावर माझ्या आई-वडिलांचे चांगले संस्कार पण आहेत. चांगले काय आणि वाईट काय याचा चांगला निवडा करता येत होता. मी माझ्या आईकडून एक गोष्ट शिकलो होतो ती अशी की “पुरुष हा व्रुक्षा प्रमाणे असतो आणि स्त्री ही वेली प्रमाणे असते. वेलीने फुलताना नेहमी झाडाचा आधार घ्यावा  नाहीतर ती तुडवली जाण्याची क्षक्यता असते आणि पुरुषाने आयूष्यात एका वेलीला आधार द्यायचा असतो. आणि आपल्या आयुष्यात जी कोण येईल तिच्यातच आपल सुख मानून तिला आधार द्यायचा असतो.  
        
आमचे सर आम्हाला नेहमी सांगायचे कि माणसाने प्रेमात पडून “चटके बसून सुद्धा गोड वाटणारं सुख” आयुष्यात एकदातरी अनुभवावे आणि ते क्षण प्रत्येकाच्या नशिबात नसतात . मी मात्र त्याला अपवाद होतो . मात्र त्या स्थितीत एका सुखद क्षनाची आणि आपल्या कर्तव्याची जाणीव मात्र वार्ंवार होत राहते हे खर.

                        शेवटी  पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं ......................              
                              माझ्या मते ती तशी मुलगी नसवी .तिच्या नजरेत मला दुसर्‍या बद्दल नेहमी आदराची भावना दिसे .शेवट पर्यंत तिच नाव पण माल माहीत नव्हतं आता मात्र माहीत आहे. अशी कोणतीही घटना घडली कि मला तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही .
नभ फाटून वीज पडावी आणि एकच कल्लोळ व्हावा मी तसाच अगतिक व्हायचो .माझ्या अशा वागण्यामुळे तिला कदाचित त्रास ही झाला असेल या अपराधा बद्दल तिने मला माफ काराव एवढच. 

शेवटी  नशिबात जे काही विधात्याने लिहिले असेल तेच घडते ........................  

आता माझ मन पांढर्‍याशुभ्र आकाशाप्रमाणे स्वच्छ आहे. असे मनात वादळ निर्माण करणारे संशयाचे ढग मी कायमचे घालवून टाकले आहेत. मी फक्त आता माझ्या बद्दलच विचार करतोय सर्वांबरोबर पुढे चाललोय. एकदा जीवनात सेटल झालं की ह्या सर्व गोष्टी माणसाच्या आयुष्यात येत जातात.आपण उगाचच त्यांच्या मागे-मागे धावत असतो आणि आपला मार्ग हरवून बसतो.
मित्रांनो माझी ही आठवण तुम्हाला नक्कीच आवडली असेल यातील चांगलं तेवढ घ्या येवढच मी तुम्हाला सांगू इच्छितो.                         
                                                                         
                                                                             
                                                               

                                                    वैभव .......................

                                                       ती   A.............. a





वरील फोटो तिचा नसून फक्त हि साधारण तिच्या सारखी दिसते म्हणून वापरला गेला आहे तुम्हाला आणखी संशय नको ......

Saturday, July 14, 2012

त्या प्रेमाची आठवण...!


त्या प्रेमाची आठवण...!
मी बरसलो आज शब्दांतुन ,
तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन ,
तीचा थेबंही ना गळला कधी.
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले मी कोसळलो दरड होऊन ,
तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.
तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून ,
तीने भाव माझा ना विचारला कधी.
आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन ,
तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.
सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या मी जगलो काजवा होऊन ,
तीला उजेड माझा ना दिसला कधी.
आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन ,
माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी
मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी मी जळालो पाखरु बनुन ,
तिला एकही चटका ना लागला कधी.
मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमी मला दिले आगीत झोकून ,
तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.
आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन ,
तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी।

माझं काय, तुमचं काय....


माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;

जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!

केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !
आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा

शक्य नसतं रस्त्यावर!
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!
उभे असतो आपण

आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!
अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !!

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

एकच वचन
कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात !!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते !!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

Friday, July 13, 2012

मी आहेच असा


मी आहेच असा मैत्री करणारा
मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा
प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा
आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावनारा

मी आहेच असा सतत बोलनारा
मित्राना नको ते प्रश्न विचारनारा
प्रश्न विचारुन त्याना सतवनारा
उत्तरे संग म्हणुन
तगादा लावणारा

मी आहेच असा मस्त जगनारा
सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा
आपल्यातच आपलपन जपनारा
पण इतरांच्या आनंदासाठी
स्वतालाही विसरनारा

मी आहेच असा मनासारख जगनारा
यशाचे शिखर चदताना हाथ देणारा
अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा
सुखाच्या रस्त्यावरून जाताना
आयुष्य सजवनारा

मी आहेच असा सर्वांच ऐकनारा
आई वडील याना देव माननारा
त्यांचावर जास्त विश्वास ठेवणारा
त्यांच्या कोणत्याही निर्णयावर
समाधानी असणारा

Monday, July 9, 2012

जुना फोटो शाळेतला आपला


जुना फोटो शाळेतला आपला,
बघून लाजरं हसत होतो,
मित्रमैत्रिणी सारखं चिडवतात म्हणून,
बोलायलासुद्धा घाबरत होतो.

कुंचल्यात सदा इंद्रधनु तुझे,
गुणगुणलेल्या गाण्यातून तुलाच फक्त गायचो,
दररोज छातीशी धरून नवी कविता,
शाळेबाहेरच्या बसस्टॉपवर तासन् तास रेंगाळायचो.

शाळेतलं ते फुलपंखी प्रेम(?),
थरथरणाऱ्या हातांनी तुझ्या मनगटावर बांधलं,
एकाच चॉकलेटच्या अर्ध्या-अर्ध्या गोडीसारखं,
"सी प्लस एम्" तळहातावर मेंदीसारखं रंगलं.

साडेतीन वर्षांच्या मोठ्या(?)(!) गॅपनंतर,
आज वागण्याबोलण्यातली मॅच्युरिटी क्षणोक्षण जाणवतेय,
भूतकाळातली ती अल्लड गुलाबी मजा,
आज लाजून लाजून नाही, तर खळखळून हसवतेय.

पहिल्यांदाच तुझ्याबरोबर कॉफी पिताना आज,
काय बोलू नि काय नको असं थोडसं होऊन गेलंय,
बोलते आहेस, हसते आहेस, टाळी देते आहेस तू सुद्धा,
नव्यानं बहरलेल्या मैत्रीनं आपल्या,संकोचाला कधीच पळवून नेलंय.

सोळा ते बावीसच्या या मेटामॉर्फॉसिसची कमाल,
निखळ मैत्रीची अवीट गोडी आज अनुभवतोय,
निरागस तुझं हसणं नि आपल्या गप्पा साठवत साठवत,
समोरची एस्प्रेसो उगाच(?) मिनिटामिनिटाला ढवळतोय.

अशीच तुझ्या हसण्याबोलण्याची पखरण,
गुंफूदे आठवणींच्या माळेत हरेक मोती नवा,
जगण्यासाठी प्रत्येक सेकंदाचा काटा,
अतूट आपल्या मैत्रीचा ताजा श्वास हवा. 


केस मागे सारताना मग बांगड्याचा आवाज होईल


थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होईल
आभाळ भरुन आलंय वाद्ळी मेघांनं . . .
मग टपोरे थेंब उतरतील अलगद खाली
कुठूनतरी वीजेचा कडकडाटही ऎकू येईल
मी बसलोय त्याच खिडकीत. . . पुन्हा एकटाच
का कोणास ठाऊक मला वाटतयं
की तिच्या इथंही बरसत असेन तो
अन. . . एकटीच असेन ती घरात
वाट पाहत. . . . . . . नवरांची. . .
सगळे रस्ते एव्हाना शांत झालेत. . .
अन अंधार देखील पडेल आता
मग तिही सावकाश खिडकीत येईल
का बरं उशीर झाला असेल त्याला?
ती विचारेल दहादा त्या खट्याळ वारांला. . .
केस मागे सारताना मग बांगड्याचा आवाज होईल
कडाडणारां वीजेत त्यांची किणकिण विरघळून जाईल
अन अश्याच कातरवेळी तिला तोही पावसाळा आठवेल
माझ्या मातीचा गंध तिला तिच्या मातीत जाणवेल
सगळं तेच, तोच पाऊस, तीच वेळ. . .तीच झाडं , तोच गंध
एक सुरुवात . . .तोच शेवटं . . . एका थेंबाचा अखेरचा बंध
विसरत आलेली एवढीच आठवण
सरत आलेल्या पावसात बरसुन जाईल
चुकलेली एक गार झुळूक. . .
माझ्याही घरांत मग फिरून जाईल
भानावर येईल ती मगं. . .
जेव्हा एक जोराचा कडकडाट होईल
तितक्यात दारावर ओळखीचा. . .
आणखी एक खडखडाट होईल
तो असेल. . .चिंब भिजलेला. . .काहीसा थकलेला. . .
तरीही डाव्या हातात असेल. . . तिच्यासाठी गजरा आणलेला. . .
पाणवलेल्या नजरेचा एक थेंब, अचानक मग गालावरुन ओघळेल
माळलेल्या गजरांची एक कळी, तितक्यात मग खुद्कन उमलेल. . .


कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये


कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी
तर जोडताना असह्य यातना व्हावी ,

डायरित कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पनाना ते नाव जड व्हावे
अचानक एक दिवस त्या नावाचे
डायारीत येणे बंद व्हावे ,

स्वप्नात कुणाला असेही बघू नये
की अन्धारताही त्याचे हात असावे,
तुटलेच जर स्वप्न कडी
तर आपल्या हातात काही नसावे,

कुणालाही इतका वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा
एक दिवस आरशात आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा ,

कुणाचे इतकेही एकू नये
की आपल्या कानात त्याच्याच शबदाचा घूमजाव व्हावा
आणि एक दिवस आपल्याच तोंडातून
त्याच शबदाचा उचार व्हावा ,
पण
कुणाच्या इतकेही दूर जाऊ नये
की आपल्या सावली शिवाय आपल्या सोबत काहीच नसावे
दूरदूर आवाज दिला तरी
आपले शब्ड जागीच घुमावेत...

निसर्गासारखा नाही रे सोयरा


निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप

त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य

त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली




मैत्रि तुझी अशी असवी


मैत्रि तुझी अशी असवी,
आयुश्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा,
मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,
हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे,
मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी..... 

मैत्री म्हटली की


मैत्री म्हटली की
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे... 


बा॓लताना जरा सांभाळून.....


बा॓लताना जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,
फरक फक्त एवढाच की,
तलवारीन॓ मान तर,
शब्दांनी मन कापल॓ जात॓
जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त
आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...
य॓त असल॓ तरी,
दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓.
म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓
शब्दच माणसाला जोङतात आणि
शब्दच माणसाला तोङतात
ह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायण
तर कधी महाभारत तर कधी कवीता रचतात
तुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓
तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓
तर, तुझ्या एका शब्दावर
माझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.
म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓............ 


मैत्रीच्या पावसात


मैत्रीच्या पावसात
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.

न्हा‌ऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब

मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय

पा‌ऊस रिमझिम हसला.
ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.

जाता जाता म्हणाला,
"काळजी नको. भिजून घे खूप.
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब ...!

Thursday, July 5, 2012

ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे

.
 
ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे
अंतरात माझ्या श्याम बोलतो "राधे... राधे.. राधे...!" 
... 

ती बघते तेव्हा गंध प्यायले रंग उधळती वारे
मज वाटे रंगित, गंधित, धुंदित भवतालीचे सारे 


ती बघते तेव्हा असे वाटते बघून बघतच राहो 
क्षण एक आज हा इथेच ऐसा क्षणभर थांबुन राहो 


ती बघते तेव्हा विशाल अंबर पायी लोळण घेते
प्राशून सागराला मी उरतो मुठीत धरणी येते 

ती बघते तेव्हा लाजलाजरे गाल गुलाबी होती
मधुशाला सारी जणू मांडली लाल रसील्या ओठी 

ती बघते तेव्हा हृदयामधुनी तीर पार तो जातो 
मी 'हाय' बोलुनी पुन्हा पुन्हा तो छातीवरती घेतो 

ती बघते तेव्हा शब्दांचाही गोंधळ थोडा उडतो  
अर्थास शोधणे व्यर्थच होते, फक्त पसारा उरतो !
 
 

बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी 'त्या'ने

 
बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी 'त्या'ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावित 'तिज'ला नियमाने!
कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!
गुलाब कसले? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!
प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!
कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा!
या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगत करी मग मनातले बोल!
अशा तर्‍हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!
अखेर थकला! ढळली त्याचि प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या!
धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, 'देवी!
(दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.)
'बांधित आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्तांचे काज?
गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले?'
तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, 'आळ वृथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी'
असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!
म्हणे, 'पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद!
कशास डोळे असे फिरविता का आली भोंड?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड!'
क्षणैक दिसले तारांगण त्या,-परि शांत झाला!
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला!!
'प्रेमापायी भरला' बोले, 'भुर्दंड न थोडा!
प्रेमलाभ नच! गुलकंद तरी कशास हा दवडा?'
याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
ह्रदय थांबुनी कधीच नातरि तो असता 'खपला'!
तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
'प्रेमाचा गुलकंद' तयांनी चाटुनि हा बघणे!
 
 

"रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करतो,

 
"रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करतो,
न चुकता तुझ्यासाठी काहीतरी मागत असतो,
एकदा देव म्हणाला कधी तरी चुकून स्वतासाठीपण मागत जा रे,
त्याला म्हटले तिच्याशिवाय माझे आयुष्य तरी आहे का रे? 

... मला झोपायला जमीन दिलीस तरी चालेल .... पण तिला तू मखमली पलंग दे,
मला दिवसभराची भूक दिलीस तरी चालेल ... पण तिला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
मला तू भले अंधारात ठेव पण तिच्यासाठी ... न विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
माझ्या वाटेला दुखाश्रू आले तरी चालेल ... पण तिला नेहमी आनंदात ठेव,
माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल ... पण तिच्या हृदयात माझे स्थान असाच ठेव,


माझे मागणे ऐकून देवपण थक्क झाला,

कधी न रडणाऱ्या देवाचा डोळा पण तेव्हा पानावला,

का करतोस इतके प्रेम तिच्यावर जिने प्रेम तुझे स्वीकारले नाही,

का मरतोय तिच्यासाठी जिने जगणे तुझे मान्य केले नाही,


मी म्हटले सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला भेटतील ,

जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात पडशील... "
 
 

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला...

 
डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीहि विसरता विसरत नाही... 
भुरळ पडून जातेस ग तू मनाला, 
आणि सांज का हि होत नाही.... 

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीही विसरता विसरत नाही... 
डोळे मिटले असो किव्हा असो उघडे, 
तूच दिसतेस ग समोर, 
आणि दुसर कोणीच दिसत नाही.... 

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीही विसरता विसरत नाही... 
देवाला हि भुरळ पडून आलीस तू, 
मी तर फक्त एक कवी आहे, 
याच मातीने घडवलं त्याने ग मला... 

पण,
नक्की विचारेन जाऊन मी त्या देवाला,
कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?.....
कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?.
 
 

तू आणि तुझं सर्व विश्व


तू आणि तुझं सर्व विश्व
अगदी माझं बनून गेलं होतं
ज्या क्षणी तुझ्या मध्ये
मी स्वतःला सामावून घेतल होतं

तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न
अगदी माझ्या डोळ्यात जगत होती
ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात
मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास
माझ्या जगण्याची दिशा बनली होती
ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला
मी अंतर्मनाने भुलली होती ...
 
 

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण ,
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !
...
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..
 

मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही

मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा, कोणी मला खुणावलेच नाही...

...
स्वप्नंसदृश्य आयुष्य माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन कधी फुलले कळलेच नाही...

दुखाच्या क्षणात डुबत चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास माझा कळलेच नाही...

आशाच सोडली होती मी परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...

कधीच अलग होऊ नकोस प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून, तर तुझ्याविना आता जगणेच नाही..
.
 
 

ती आवडते मला, मी हि तिला आवडे

ती आवडते मला, मी हि तिला आवडे
हे बोलण्याची गरज आम्हाला कधीच ना पडे
तीझ्यासोबतच्या आठवणींचे मज हृदयात सडे
पण एक अनोळखी मर्यादा नेहमीच नडे

... ती सोबत असताना वाटे समयही स्तब्द व्हावा
तो एक क्षण कधीच पुढे न जावा
जगून घेतो आम्ही सर्व आयुष्य त्या क्षणात
कोणास ठाऊक काय घडणार आहे भविष्यात

तीझी सावली जाताच भासे उन्हाची झळ
ती म्हणजे... माझ्या आयुष्यातलं मृगजळ
काही नात्यांना नावांमध्ये नाहीच बांधता येत
काही नात्यांना नावांमध्ये खरच.... नाहीच बांधता येत..
 
 

तुझी लाट बनवून गेली किनारा तरावे कुठे मी बुडावे कुठे

 
तुझी लाट बनवून गेली किनारा तरावे कुठे मी बुडावे कुठे
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

... असावे इथे तू असे वाटताना पहावे इथे नेमके तू मला
उखाणे तुलाही उखाणे मलाही उखाणेच ते उलगडावे कुठे?

नशीबी जरी रोज असती उपेक्षा ..अपेक्षा कधी संपल्या का कुठे
शरीरास या श्वास उच्छवास सांगे तुला सोडुनी वावरावे कुठे?

दिसेना तुला मी - मला सांगते तू- क्षितीजा पुढे काय दिसते तुला?
परीघात फिरतो तुझ्या मी कधीही तुझ्यातून मी मावळावे कुठे?

तुला पाहिल्यावर तुझ्यातच हरवतो ठरवतो सदा होत जावे असे
कळावे तुझ्या मुग्ध अधरास तेव्हा असे जिंकणे नोंदवावे कुठे?

अरे जीवना काय देतोस धमक्या मला फक्त तू एवढे सांग रे
नडावे कशाला नडावे कुणाशी नडावे किती अन् नडावे कुठे?
 
 

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना
... बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं आनंदात न्हाताना
माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
 
 

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

तू नेहमी सुखांशी केला करार राणी
मी नेहमी सुखांची झालो शिकार राणी
... आहे सदैव याची जाणीव पांघरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

फिरलो किती कितीशी अज्ञात अंतराळे
जपले किती कितीसे अश्राप पावसाळे
जाते क्षणात सारे वार्‍यावरी विरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

देऊन हूल आता या ऊन सावल्यांना
जाऊ निघून राणी आपापल्या दिशांना
हृदयातले उधाण जाईल ओसरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन...

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन
 
 

वाटत कधी.. जगाव चांगल आयुष्य

वाटत कधी.. जगाव चांगल आयुष्य
हसाव खूप खळखळून
उडाव उंच भरारी घेऊन..
सुंदर कोवळ्या हिरवळीला

...
वाटत कधी.. असाव कोणी आयुष्यात..
हातात हात धरून,
बघाव स्वप्न मिळून..

वाटत कधी.. नसावी एकटी कधी आयुष्यात..
मनातल सुख दुख वाटून,
बघाव हलका होऊन..
ओठातले हे शब्द,
ऐकावे कोणी हळूच..

वाटत कधी... भेटाव माझ आयुष्य
डोळ्यातले हे अश्रू,
पुसावे कोणी प्रेमाने हळूच..
चेहर्यावरचे खरे हास्य,
द्यावे कोणी आणून..

वाटत कधी.. बघाव निरखून हे आयुष्य..
डोळ्यात कोणाच्या प्रेम
आणि मनात समाधान साठवून..
आयुष्यात त्याच्या गरज,
माझी द्यावी त्याने पटवून..!

काळजीत त्याच्या हरवून
बघाव सोबत चालून..
बघाव स्पर्श करून..

किती गोड आहे आपले हे प्रेम...........

किती गोड आहे आपले हे प्रेम...............
किती सुंदर आहे आपले हे नाते.............
एकमेकांच्या प्रेमात चिंब बुडालेले असणे..........
एकमेकांच्या आठवणीत एकटेच हसणे ...........

... नजर न लागो कोणाची आपल्या या नात्याला .........
उभी रहा अशी दृष्ट काढतो नजर न लागो आपल्या प्रेमाला......
दूर झालो एकमेकांपासून तर एकटे जगू शकणार नाही.....
दूर झालो एकमेकांपासून तर स्वताला सांभाळू शकणार नाही ..........

सवय झालीय तुज्या मोहक हास्याची............
सवय झालीय तुज्या लाडिक बोलण्याची..............
सवय झाली आहे तुज्या स्वप्नांची......
सवय झाली आहे आयुष्य तुज्याबरोबर पाहण्याची....