Pages
(Move to ...)
Home
▼
Friday, February 3, 2012
हिमलाट पहांटे पहा जगावर आली !
हिमलाट पहांटे पहा जगावर आली !
मुखिं पिळून मद्यास्तव द्राक्षांचे घोस
पाडीत मळे मोत्यांचे चरणीं ओस
उद्दाम धावते करित दुभङ्ग धरेस करकरां पांखरें रगडी दाताखालीं हिमलाट पहांटे पहा जगावर आली ! श्रीमन्त महालीं तिथें हिला न थारा मखमाली दुलया देती मधुर उबारा डोकावुन पळते कापत हीच थरारा हो काय दरारा कनकाचा भयशाली हिमलाट पहांटे पहा जगावर आली !
पाहून परन्तू कुठें कुडाचीं खोपीं कंगाल कांबळीं टाकुन गेले झोंपी शेंकडों कवाडे !
वाट जावया सोपी कडकडून पडते तेथें लांब भुकेली हिमलाट पहांटे पहा जगावर आली
योतींतुनि धावत या तेजःकण सारे या यज्ञांतिल अन्सरणांतील निखारे रे ढाळ नभा, तव ते ज्वालामय तारे पेटवुं द्या वणवा कणाकणांत मशाली हिमलाट पहांटे पहा जगावर आली !
-कुसुमाग्रज
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment