Pages

Wednesday, July 4, 2012

पहिला पाऊस पाहताच


पहिला पाऊस पाहताच
मनी येई तुझी आठवण
अन् तुझसाठी रचलेल्या कवितांची साठवण..
पहिली सर तळहातावर झेलणारी तू
अन् त्या
सरीसारखं होऊ पाहणारा मी..
डहाळीवरचे थेंब चेह-यावर
खेळावणारी तू
अन् त्यातला तुझा ओठावर पडू पाहणारा थेंब मी..
कधी
तू त्रासावे पावसाला अन् चिडून आडोशाला थांबलेली तू
तुझा मर्जीसाठी
तुला पदराखाली घेणार झाड मी..
जरी झालिस तू मुक्त चातकासारखी
तरी
तुझी तहान भागवणारा थेंब होईन मी..
फक्त तुझासाठी...