ती माझ्या जवळ आली.......
ती माझ्या जवळ आली,
"काही तरी सांगायच्या" अस म्हणाली...
मी फक्त तिलाच पाहत राहिलो,
"हिला माझ्याशी काय बोलायच्या",
हाच विचार करू लागलो...
ती माझ्या कडे बघत होती ,
मीहि तिच्याच कडे पाहत होतो...
तिझ्या नकळत,
तिझ्याच डोळ्यात,
काही तरी मी शोधत होतो...
ती बोलणार इतक्यात,
तिझी एक मैत्रीण आली,
तिला काहीही न बोलू देता,
तिझ्या बरोबर घेऊन गेली..
जाता जाता,
हळव्या मनात माझ्या,
फुकाचे कंदील ती पेटवून गेली...
अन जाताना मागे वळून,
न जणू काय ,
तिझ्या नजरेने ती बोलून गेली...
तिझ्या नजरेने ती बोलून गेली...