Pages

Wednesday, July 4, 2012

पाऊस दरवर्षी येतो, आणि चिंब भिजवून जातो.....


पाऊस दरवर्षी येतो, आणि चिंब भिजवून जातो
ती दरवर्षीच भिजते आणि त्याला आवर्जून सांगते
पाऊस दरवर्षीच येतो आणि चिंब भिजवून जातो
तो दरवर्षीच गच्चीतून पाहतो, आणि तिला लगेच कळवतो

कधीच एकत्र नाही भिजलीत ती दोघं

तरी एकत्र पहिला पाऊस अनुभवला दोघांनी मिळून
कधीच नाही पाहिला पाऊस बसून जवळ
तरी एकत्र रमलेत पावसात अदभूत जादू जणू

खूप बरसतो पाऊस दर वर्षीच, मजा वाटते तिला
दरवर्षी पावसात चिंब भिजते ती साठवते मनात त्याला
मनात तिच्या नेहमीच भिनतो पाऊस लहान ती होताना
ओठांवरती हसू पसरते डोळे बंद करून भिजताना

तो हि तिच्याच सारखा बेधुंद ह्या जगात जगताना
पाऊस आला कि हसून देतो तिची आठवण काढताना
बरसणारा पाऊस त्याला कधी हसरा कधी रागात वाटतो
अशा पावसात भिजून तो स्वतः च जग अनुभवतो

एकत्र नाही ती दोघं, तरी अडकलेत एकमेंकांत
पडला नाही पाऊस अजून तरी भिजली ती त्याच्या भासत
एकत्र नाही ती दोघं, तरी अडकलेत एकमेंकांत
पडलाच नाही परत पाऊस तर राहील का तो त्याच्याच मिटलेल्या जगात

पाऊस दरवर्षी येतो, आणि चिंब भिजवून जातो
ती दरवर्षीच भिजते आणि त्याला आवर्जून सांगते
पाऊस दरवर्षीच येतो आणि चिंब भिजवून जातो
तो दरवर्षीच गच्चीतून पाहतो, आणि तिला लगेच कळवतो