आई
जेव्हा तुला वाटायचं
मला समजत नाही …
तू ते मी काढलेलं पहिलं चित्र …
Showcase च्या त्या काचेत ठेवलंस …
ते पाहून मला अजून एक चित्र काढावसं वाटलं ….
जेव्हा तुला वाटायचं
मला समजत नाही …
तू त्या मागच्या खिडकीतल्या मांजरीला ….
भरलेल्या वाटीतून दुध प्यायला द्यायचीस …
तेव्हा मला समजलं .. कि प्राण्यांवर दया करावी …
जेव्हा तुला वाटायचं
मला समजत नाही …
तू फक्त माझ्या वाढदिवसासाठी …
ती खीर बनवायाचीस ….
आणि मला समजलं की ….
आयुष्यात या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा…
किती महत्वाच्या असतात ना ….
जेव्हा तुला वाटायचं
मला समजत नाही …
तू त्या देव्ह्यार्यापाशी प्रार्थाना म्हणायचीस ….
तेव्हा मला वाटायचं …. की …
तिथे देव आहे … आणि तो तुझ्याशी बोलतो ….
जेव्हा तुला वाटायचं
मला समजत नाही …
तू माझ्या केसांतून प्रेमाने हात फिरावायाचीस …
तेव्हा मला प्रेमाचा अर्थ समजला …
जेव्हा तुला वाटायचं
मला समजत नाही …
मी तुझ्या डोळ्यांत अश्रू पाहिले …
तेव्हा मला समजलं की …
कधी कधी काही गोष्टीं मुळे दुख होतं …
तेव्हा रडलं तरी चालतं …
जेव्हा तुला वाटायचं
मला समजत नाही …
तू हसायचीस ….
तेव्हा मला वाटायचं …
मीही नेहमी हसत राहावं …
आणि तुझ्या सारखं छान दिसावं …
जेव्हा तुला वाटायचं
मला समजत नाही …
मी आजारी असताना तू कितीतरी रात्री …
माझ्या काळजीत जागून घालवल्यास …
तेव्हा मला समजलं …
Doctor नुसती औषधे देतो … बरं नाही करत …
जेव्हा तुला वाटायचं
मला समजत नाही …
तू माझी काळजी घेतलीस …
तेव्हा मला समजलं …
मी तुझ्या साठी …. काहीही केलं तरी …
तुझे उपकारांची मी परतफेड करू शकत नाही ….
जेव्हा तुला वाटायचं
मला समजत नाही …
पण …. मी पाहिलं ….
आणि मला बरंच समजलं …
तुझ्या शिवाय मी नसतोच …..
आणि माझ्या आयुष्यात तूच देव आहेस ….
….. Thank you आई …… Thank you ….