Pages

Friday, June 29, 2012

मनाला एकदा असेच विचारले



मनाला एकदा असेच विचारले

का इतका तिच्यात गुंततो ?

नाही ना ती आपल्यासाठी

मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत  नाही तुला

त्रास मला भोगावा लागतो

अश्रूं मधे भिजून भिजून

रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला

का स्वप्नात रमतो ?

तिच्या सुखा साठी तू

का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले

प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा

आपण स्वता: ला विसरतो

सार काही तिच्यासाठी

ईतकेच मनाला समजावतो.