Pages

Tuesday, January 29, 2013

लिहील एक प्रेम पत्र

लिहील एक प्रेम पत्र,
फक्त तुझ्याच साठी,
नव्हते त्यात शब्द,
अन नव्हत्या मोठ्या बाती...
होता तो फक्त एकच फोटो...
तुझा नि माझा...
अन बाकी काहीच नव्हत माझ्याकडे,
तुला....
माझ हे प्रेम सांगण्यासाठी... .
बाकी काहीच नव्हत माझ्याकडे,
तुला....
माझ हे प्रेम...
....खरच सांगण्यासाठी... .

कितीही जगले कोणी

कितीही जगले कोणी
कोणासाठी..

कोणीच कोणासाठी मरत
नाही...

अनुभव येत असतात प्रत्येक
क्षणाला,

पण नशिबाचे चक्र थांबत
नाही...

आयुष्यात कितीही कराल
प्रेम कोणावर..

त्याचे मोल सहज कोणाला
कळत नाही..!!

हळुवार बघ सये

हळुवार बघ सये
तुझ्या गालावर झुले,

माझे हसू आणि आसु
जशी मोग~याची फुले...♥

वीतभर राहिलेला
दोन ओठांचा दुरावा

आणि नभावर झुले
आठवांचे थेंब ओले...♥

का तिच्या आठवणीचा दरवळतो सुवास

का तिच्या आठवणीचा दरवळतो सुवास
आहे?
जवळ ती आहेच इथे का होतो आभास
आहे?
ती तिच्या विश्वात आणि माझे
विश्व वेगळे आहे।
कळे जरी मला हे, का अश्रू साकळत
आहे?
ती येनार नाही आता, कळून चुकले
आहे।
का तिच्या मिलनास जीव
होतो आतुर आहे।
कोण हे सान्गेल, का तिलाच
पुजतो आहे?
नित्य
तिच्या स्वप्नाची करतो आस आहे।
दुर ती नव्हतीच कधी, कळनार
मनाला केव्हा?
अंतरी या नेहमी वसते तिचेच श्वास
आहे।

नात असतं मनातलं..

नात असतं मनातलं... नात असतं आठवणीतलं ..
नात असत मैत्रीच... नात असत बंधाच...
नात असत हिरव्या हिरव्या पानांतल ..
हळुवार जपलेल्या स्वप्नातलं..
नात असत ऋणाणुबंधाच..
आकाशातल्या इंद्रधनूच..
कधी रड्लेल तर कधी हसलेलं..
कधी गोड कडू भांडनातल..
असच तुज नि माझ नात...

माझ्यासाठी

माझ्यासाठी
प्राणाहून प्रिय तू
शब्दान पलीकडली आहेस तू
संगीताची धून तू
गाण्यातले सूर तू
कवितेतले शब्द तू
माझ्यावर रुसणारी पण तरी माझीच आहेस तू
उश्माघातातली गार वार्याची लहर तू
पहिल्या पावसाची पहिली सर तू
इंद्रधनुष्याच्य ा सप्तरंगातील रंग तू
श्रावणातल्या धुंद मनाची पहिली पालवी आहेस
तू
माझ्यावर रुसणारी पण तरी माझीच आहेस तू
माझ्या श्वासातला हुंकार तू
तापलेल्या भावनांची फुंकर तू
तोल गेलेल्या मनाचा आधार तू
हृदयाच्या स्पंदनाचा आभास तू
माझ्यावर रुसणारी पण तरी माझीच आहेस तू