Pages

Saturday, January 26, 2013

येते तुझी आठवण

]

येते तुझी आठवण,
जेव्हा मी आयुष्याच्या वाटेवर चालताना पडतो,
आणि मला उचलणार कोणीच नसत. येते तुझी आठवण,
जेव्हा मी पाऊसात एकटा भीजतो,
आणि मला छत्रीत घेणार कोणीच नसत. येते तुझी आठवण,
जेव्हा मी सिगरेट पितो,
आणि मला ओरडनार कोणीच नसत. येते तुझी आठवण,
जेव्हा मी रडत असतो,
आणि माझे डोळे पूसणार कोणी नसता. येईल तुझी आठवण,
जेव्हा मी मरत असेल,
आणि मला मिठीत घेणार कोणीच नसेल...





Vaibhav.........

स्वत:हून जास्त प्रेम तुझ्यावर केले होते मी….

स्वत:हून जास्त प्रेम तुझ्यावर केले होते मी….
माझे सर्वस्व अर्पण केलेहोते मी….
तुझा भास..तुझा सहवास…..
तुझ्याच प्रेमात पडले होते मी….
नाही कधी मिळाले मज काही...
ना मिळाले काही मज आज...
स्वप्न रंगवत होते आपली….
पण स्वप्नांतील रंगच नाहीसे झालेआज…
खूप ठरवले होते मी स्वत:शीच....
नाही पाहणार तुझ्याकडे कधीच...
पण प्रेम होते तुझ्यावर आधीच....
संपणार नव्हते ते आज व कधीच....
आज तो मला सोडून गेला होता....
काळीज मज काढून निघून गेला....
मरण सुद्धा मज नशीबात का नव्हते….
आयुष्याचे चित्र रंगहीन करून गेला..
तू मला सोडून निघून गेलास....
अश्रूंच्या ओंझळीत मला सोडून गेलास...
मला विसरून जा म्हणालास ...
मग का माझ्यासाठीच का रडलास….???? 


तू मला का आवडतोस?




तू मला का आवडतोस?
मला नाही माहित,
पण खूप आवडतोस,
इतकच मला माहित.......

ना तू राजकुमार,
ना तू खूप सुंदर,
तरीही तू खूप छळतोस मला,
किती लाजल्यासारखं होतं माहितीय??

हळूच तिरक्या नजरेने जेव्हा बघतोस मला.
मिठीत तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?

देठावर कळीने अलगत उमलावं तसं, स्पर्शाने तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?
मयूरपंखाने अंगावरून सरकावं तसं...

मी काहीही केले तरी तुला ते सुंदरच वाटते, तुज्यासोबत मी न जाने कितीदा संसार थाटते.

तू नेहमी विचारतोस ना मी इतकी सुंदर कशी?
सुंदर नाही रे मी....
प्रेमात मला पाहताना तुझी नजरच तशी.

आवडतं मला तुझं.....
माझ्या स्वप्नात येणं,
माझा हात चालता चालता तुझ्या हातात घेणं हे सगळं असंच मला आयुष्यभर देशील का?

स्वर्ग नकोय मला...
असंच नेहमी तुझ्या मिठीत घेशील का?

अक्षरश: वेडी आहे मी तुझ्यासाठी,
फक्त एक कर माझ्यासाठी..

बाकी काही नाही दिलेस तरी चालेल,
फक्त खूप आठवणी दे मला....

मरताना हसण्यासाठी.... ♥




माझं प्रेम तुला कधी समजणार?'

माझं प्रेम तुला कधी समजणार?'
हा प्रश्न कधीही विचारणार नाही.
जेव्हा समजेल तेव्हादेखील
माझं प्रेम कमी होणार नाही.

... 'मी तुला विसरेन' असं कोणी म्हटल्यास,
... तर ते कधी खरं होणार नाही.
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे,
हे तुझ्यावर कधी लादणार नाही.

तु माझ्यापासुन दूर जा म्हणाला स,
तर तुला दुःख होऊ देणार नाही.
तुझ्या मुखावर उदासीची एक रेषही,
मला सहन होणार नाही.

'तु सुखी राहावास' ही एकच आशा,
मनातुन कधी कमी होणार नाही.
तुझ्या सुखासाठी तुझा त्याग करायला
देखील मागेपुढे पाहणार नाही.

'माझं प्रेम तुला कधी समजणार?'
हा प्रश्न कधीही विचारणार नाह...♥♥♥


मनाच्या एकांतात तुझी खुप आठवण येते

मनाच्या एकांतात तुझी खुप आठवण येते,

मला रोज खुप खुप सतावते..

नकळत माझ्या डोळ्यात अश्रूं देऊन जाते,

तुला विसरण्याच्या प्रयत्नात मी स्वःतालाचं विसरुन जाते..

खुप प्रेम करते रे तुझ्यावर,

हे तुला नेहमी सांगायचे राहून जाते..

बस एकदाचं येऊन भेट रे मला,

बघ तर मी तुझ्याविणा जगतेय की मरतेय..

अजुन किती रे तरसवशील तु मला,

तु नसलास की मन माझे एकटेपणात जाते..




वेडे गं मन माझे

वेडे गं मन माझे,
तुला समजावु किती .....
सोडुन गेलीस मला,
मी झुरावं किती .....
येशील ना गं भेटायला,
वाट पाहावी किती .....
नाव रुप नसणारी असतात,
काही खोटी नाती .....
मग ती नाती टिकवताना,
समाजाची का भिती .....
समजुन का घेत नाहीस मला तु,
मी झुरावं किती .....
आज येईल ऊद्या येईल,
गेली सुट्टी सरुन .....
कधी येशील जेव्हा,
मी जाईन मरुन .....
प्रेम नाहीस करत माझ्यावर,
माहीत आहे मला .....
जाण ठेवावी काही,
गोष्टींची भान आहे तुला .....
झालीस तु दुस-याची,
मी झुरावं किती .....
एक
वेडा बसला लावुनी तुझी आस,
तीचं आस बनु नये
त्याच्या जिवनाचा फास .....
तुचं सांग ना मी,
विश्वास कुणावर ठेवु .....
प्रत्येक क्षण दिवस,
मी झुरावं किती .....
दोन घटकेच्या आयुष्यात,
मी मरावं किती .....
मी मरावं किती .....
♥ :'( ♥ :'( ♥ :'( ♥ :'( ♥


तू निघून गेल्याचं दु:ख नाही

तू निघून गेल्याचं दु:ख नाही.,
तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!
तुझ्याविना जगणं असह्य आहे.,
पण इतरांसाठी जगणं कर्तव्य
आहे.!!
खुप काहि सांगायचं होतं तुला
पण मनातलं मनातच राहून गेलं..
सुखाचं घरटं बांधण्या आधीच
पाखरु रानातलं उडून गेलं !!




अशी ये....

अशी ये....
वा-याच्या वेगानी ये, धुंदीत मस्तीत ये
केस मोकळे सोडून सुस्नात होऊन ये
श्वासात अत्तराचा दरवळ घेऊन ये
ओठात बत्तासा, स्पर्शात साय घेऊन ये
सळसळत्या जिभेवर मधाची धार घेऊन ये
आसुसल्या ओठात थरथर घेऊन ये
अंगावर शहारा आणि फुललेला काटा घेऊन ये
थोडी लाजाळूच्या पानाची लाज घेऊन ये
मखमली शालूत निळं मोरपिस घेऊन ये
अंगभर रातराणीचा सुगंध शिंपडून ये
विचारात विजेची चपळाई घेऊन ये
बोटात कलाकाराची सहजता घेऊन ये
कित्त्येक दिवसात माझ्या जवळ तू आलीच
नाहीस
'कविते' यायचंच असेल तर निदान
माझ्या मनाप्रमाणे तरी ये :)

बोलण्यासारखे खुप आहे

बोलण्यासारखे खुप आहे,
सांगण्यासारखे काहीच नाही;
करण्यासारखे खुप आहे,
होण्यासारखे काहीच नाही….....

कधी माझ्या डोळ्यात,
खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे,
दुखण्यासारखे काहीच नाही…..

उभा रहा आरशासमोर,
न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसले नाही तुला तर,
बघण्यासारखे काहीच नाही…..

तुला नेहमीच वाटत असेल,
मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे,
कळण्यास अवघड काहीच नाही…..

माझ्या नेत्रांतील आसवांची,
तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत,
नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत.

๑♥๑ वैभव ๑♥๑

आयुष्यात खूप माणसे भेटतात

आयुष्यात खूप माणसे भेटतात,
वा-याच्या झुळुके प्रमाणे येतात

आणि जातात.
पण काही अशी असतात,
जी मनात जागा घेतात.

हीच गोड माणसे
जीवनाचा अर्थ सांगतात.
ओठांवर हसू खुलवतात

आणि अश्रुही पुसतात.
कधी हक्काने चेष्टा-
मस्करी करतात,

तर कधी मध्येच
भावनिक होतात.

पण तीच माणसे
अशी असतात,

जी या जगात
आपली असतात.


डोळ्यातील अश्रू पडतात...


डोळ्यातील अश्रू पडतात...
.
डोळ्यातील अश्रू पडतात...
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि..
.
याचा अर्थ असा नाहि की..
...तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि..
.
शब्दांनाहि कोड पडावं..
अशीही काही माणस असतात..
.
किती आपलं भाग्य असत..
जेव्हा ती आपली असतात..
.
कुणीच आपल नसतं.
मग आपण कुणासाठी असतो.
.
आपलं हे क्षणिक समाधान.
इथ प्रत्येक जण एकटा असतो...
.
डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब..
उगाचच का अडकून बसतात..
.
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून..
किती निष्ठूरपणे सोडून जातात...
.
नजरेत जे सामर्थ्य आहे..
ते शब्दांना कसे मिळणार..
.
पण प्रेमात पडल्याशिवाय..
ते तुम्हाला कस कळणार..




एक तरी सखी असावी

एक तरी सखी असावी,
जीवनी जिने साथ द्यावी..

रूपाने नसली सुंदर,
तरी मनाने मात्र असावी..

एक तरी सखी असावी,
सोबत तिची कायम असावी,

अबोल असेल तरी,
गाली लाली मात्र असावी..

एक तरी सखी असावी,
दुखःत सुखात साथ करावी..

असतील वेदना, जखमा,
हळुवार फुंकर घालावी..

एक तरी सखी असावी,
आयुष्याची भ्रांत नसावी..

निजता तिच्या मांडीवर,
सुखाची झोप लागावी,

प्रत्येकाला अशी,
एक तरी सखी असावी...




एक क्षण आनंदाचा

एक क्षण आनंदाचा
माझ्यासाठी सोडून जा
सखे तू जाता जाता
खोटं-खोटं प्रेम करुन जा..
.

आयुष्यभर पुरेल तुला
इतके सुखं घेउन जा
सखे तू जाता जाता
निदान दुखं तरी देऊन जा..
.

कसा जगू इथे एकटा
तुझा विरह पाहून जा
सखे तू जाता जाता
तुझ्या आठवणी देऊन जा..
.

असेच कधीतरी अचानक
पुन्हा एकदा भेटून जा
सखे तू जाता जाता
शेवटचे फूल वाहून जा..


मीच का तुझी रे

मीच का तुझी रे
 सख्याच सांगना
मीच का तुझी रे
होईन मीच का?
सजनी तुझी रे
स्वप्नात पाहिले ते होईल का खरे
डोळायात तुझ्या रूप
माझेच दिसेल का रे
मनातले ओठावरी
येईल का रे
स्वप्नात पाहिले ते होईल का खरे
आयुष्याची जीवनसंगिनी
होईन मीच का रे
सांग मला सख्या शब्दांनी हे
नकळत कधी कळले ना मला ते
स्वप्नात पाहिले ते होईल का खरे.......


जेंव्हा आठवेल

जेंव्हा आठवेल
तुला तो दिवस ..
गुलाबाचे फुल देऊन
मी केलेला प्रोपोस ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील
ना ? ..
जेंव्हा आठवतील
तुला ती सोबत
घालवलेली संध्याकाळ ..
समुद्राच्या किनार्यावर
मिठीत
घालवलेला तो काळ ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
जेंव्हा आठवेल तुला सोबत
घालवलेला प्रत्येक क्षण..
प्रेमात तुझ्या होणारे वेडे
माझे मन ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील
ना ?
जेंव्हा कोणीच नसेल
तुझी साथ देणारा..
मनापासून तुझ्यावर प्रेम
करणारा ..
तेंव्हातरी आठवण काढशील
ना ..
तेंव्हातरी प्रिये रडशील
ना ?


कसे सांगू तुला

कसे सांगू तुला
माझ्या मनीची व्यथा
तु नसताना झालीय
माझी काय दशा...

कसे सांगू तुला
माझे चुकले नव्हते
नियती पण कधी कधी
सर्वांनाच झुकाविते...!

कसे सांगू तुला
ती परीक्षाच असेल
कुणाचा किती विश्वास
देव पाहत नसेल??...

कसे सांगू तुला
प्रेम मिळविणे कठीण
मिळालेच तर टिकविणे
त्याहून हि कठीण...

कसे सांगू तुला
तु किती अनमोल
हजारो जन्मात माझ्या
चुकणार नाहीत मोल..

कसे सागु तुला
मन किती उदास
तु नाहीस तरी
तुलाच पाहण्याची आस...

कसे सांगू तुला
हृदय किती रडतेय
तुझ्या हृदयाला विचार
त्याला सर्व कळतेय...

कसे सांगू तुला
श्वास आता थांबतोय
हळू हळू आता
अखेरचा होऊ पाहतोय..

कसे सांगू तुला
जीव आता जातोय
क्षणभराचा विलंब
हा देह सोडू पाहतोय..

कसे सांगू तुला
मी मी नाही राहणार
तुझ्यावाचून माझे
अस्तित्वच नाही उरणार...

कसे सांगू तुला
काहीतरी बोल
नाहीतर तु मला
कधीच नाही पहाणार.
कधीच नाही पहाणार.


एकाकी खूपच जगलो

एकाकी खूपच जगलो
आता तिच्यासोबत जगावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!१!!

प्रेम ठरवून होत नाही
तरीही ठरवावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!२!!

ती कुठेतरी दूर आहे
माझ्यावर रागावली आहे
ती बोलणार नाही
तरी तिच्याशी बोलावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!३!!

तिचे खुप मित्र आहेत
तिला माझी गरज नाही
मला पाहून ती कधी
खोटे सुद्धा हसत नाही
ती हसणार नाही तरी
तिच्याकडे पाहून हसावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!४!!

ती खूपच busy असते
तिला रिकामी वेळच नसते
जरी ती भेटणार नाही
तरी तिला भेटावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!५!!

तिचे नाव काय मला माहित नाही
कुठे राहाते त्याचा तर पत्ताच नाही
माझ्या ह्या अजाणतेपणावर
मला आता रडावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!६!!

जेव्हा जेव्हा तिला आठवतो
ती हळूच समोर येते
मग समजते हे स्वप्न आहे
आणि स्वप्न भंग होते
भंग झालेल्या स्वप्नातच
परत परत रमावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!७!!

जेव्हा ती खरच येते
वाटते तिला सर्वकाही सांगावे
बोलण्यास मात्र मन घाबरते
तरीही परत तेच तेच धाडस
करावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!८!!


आठवत तुझ ते मिश्कील हसणे, काळजाआड लपणे

आठवत तुझ ते मिश्कील हसणे, काळजाआड लपणे

हळूच डोकावून बघणे , अन लांब केसाशी खेळणे

सरळ नाक असूनही वाकडे करणे मग चिडवणे

सगळे आहे आजूबाजूला तरी काहीतरी बोचणे

काय यालाच म्हणतात miss करणे



तू नसूनही तू आहे असे वाटणे

मग सतत मागे वळून बघणे

हळूच मनाला समजावणे

अन जुन्या आठवणींत गुरफटणे

काय यालाच म्हणतात miss करणे



तुही चंद्र बघत असशील ,म्हणून चंद्र बघणे

चंद्राच्या निमित्ताने तुझा चेहरा न्याहाळणे

टपोरे तुझ्या बोलक्या डोळ्यांशी बोलणे

अन चटकन चंद्र अश्रूंमुळे पुसट होणे

काय यालाच म्हणतात miss करणे



काय यालाच म्हणतात miss करणे......



हेच असेल Miss करणे तर मी रोज करतो

माझामध्ये मी तुलाच बघतो

सातासमुद्रा पलीकडे आहे पण

रोज एक समुद्र पार करण्याचा प्रयत्न करतो

कसे सांगू मी तुला रोजच Miss करतो

तुझा मिठीत येण्याचा ध्यास करतो

कारण मी तुला रोजच Miss करतो......




का मैत्री केली मी तुझ्याशी

का मैत्री केली मी तुझ्याशी
का मी तुझ्या प्रेमात पडलो
.
नेहमी हसत राहणारा मी,
आज तुझ्यामुळे उगाचं का रडलो
.
तु बोलली असती तर ,
जगाशीही असतो नडलो..
.
खुप त्रास दिला गं तु मला,का गं असे केले तु माझ्यासोबत
.
आता ठरवलं पुन्हा नाही लावाचा जिव कुणावरं…
खुप दुःख होतं गं ह्रदयाला माझ्या..
हे कसं तुला नाही माहित पडलं
.
का मैत्री केली मी तुझ्याशी
का मी तुझ्या प्रेमात पडलो…


जेंव्हा आठवेल

जेंव्हा आठवेल
तुला तो दिवस ..
गुलाबाचे फुल देऊन
मी केलेला प्रोपोस ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील
ना ? ..
जेंव्हा आठवतील
तुला ती सोबत
घालवलेली संध्याकाळ ..
समुद्राच्या किनार्यावर
मिठीत
घालवलेला तो काळ ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
जेंव्हा आठवेल तुला सोबत
घालवलेला प्रत्येक क्षण..
प्रेमात तुझ्या होणारे वेडे
माझे मन ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील
ना ?
जेंव्हा कोणीच नसेल
तुझी साथ देणारा..
मनापासून तुझ्यावर प्रेम
करणारा ..
तेंव्हातरी आठवण काढशील
ना ..
तेंव्हातरी प्रिये रडशील
ना ?




बरंच काही निघून गेलयं

बरंच काही निघून गेलयं
तरीही मी उभाच आहे
अर्थ सर्वच संपून गेलाय
तरीही जीवन सुरुच आह

वेळ केव्हा निघून गेली
मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा
हाती काहीच उरले नाही
आता सर्व शांत झालयं
वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता
श्रावणानंतर होत तस

तरीही,
बरंच काही शिल्लक आहे
अजून माझ्या हाती
काही शण अजूनही आहेत
फक्त माझ्यासाठी
त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे
एकच गोष्ट फक्त मी
माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी
फक्त तुझ्यासाठी झुरलो
आजही मला एकच फक्त
सांगावेसे वाटत

आयुष्याच्या या शणीही
तुझी उणीव भासतेय
तुझी उणीव भासतेय...

व्हायचं ते होऊन गेलं

व्हायचं ते होऊन गेलं
घडायचं ते घडून गेलं,
कळत नाही कसं पण
मन प्रेमात पडून गेलं,
कळलं नाही मलाही
कधी हातून निसटून गेलं,
तू भेटलीस अन
मला सोडून गेलं,
कधी तुझ्या डोळ्यांत
मन हरवत गेलं,
कधी तुझ्या केसांत
मन गुंतत गेलं,
विचारलं तेव्हा मनाला
हे काय चाललं,
तुला काही कळत नाही
इतकचं मला म्हटलं,
माझचं मन माझ्याकडे
ढुंकूनही पहात नाही,
तू नाद लावलास त्याला
आता ते माझं राहिलं नाही..

किती क्षनाचं हे आयुष्य असत,

किती क्षनाचं हे आयुष्य असत,
आज असत तर उद्या नसतं,
म्हणुनचं ते हसत हसत जगायचं असतं,
कारण इथे कोणीच कुणाच नसत,
जाणारे दिवस जात असतात,
येणारे दिवस येत असतात,
जाणारांना जपायचं असत,
येणारांना घडवायच असत,
आणि जिवनाच गणित
सोडवायच असत,
म्हणुनच
कधी कुणासाठी तरी जगायचं
असत,
कुणासाठी तरी जगायचं असत...


कधी तू…रिमझिम झरणारी बरसात

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात

कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात

कधी तू…अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेडया जंगलात

कधी तू…हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात

कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात

जरी तू…कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणात

तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात

कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात

कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात




मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही


मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणारनाही..
तू माज्यावर प्रेम करत नाही..
म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..
तुला मी तितकासा आवडत नसलो..
म्हणून काय झाले ..
मी तुज्याशिवाय जगूशकणार नाही ..
हे तुला स्म्जावेच लागेल..
मी तुज्या येण्याचीवाट पाहून थकणार नाही..
तू येशी आणि हि आशा कधी सोडणार नाही..
तुला माज्या भावना काळात नसतील..
म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगता येत असेले
म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी..
मी तुला समजावता समजावता थकणार नाही..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही ..
मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..
पण एकदा तरी,,,
या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठीतुला सोडेन ..
पण एकदा तरी ...
या प्रेम वेड्याला मनात आणशील?


तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात


तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात
खुलताना, जग
विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

सकाळचा नाश्ता करताना असो किंवा संध्याकाळचा चहा पिताना..

drive
करत्ताना असो किंवा मी meeting
मध्ये असताना..

जग विसरते मी फक्त तुझाच विचार
करताना..

येतोस तू हळूच आणि शिरतोस
माझ्या मनात..

नाही कळत तुला आता वेळ
कुठली आणि आत्ता महत्वाचे काय..

घेरतोस मला तुझ्या धुंद मिठीत.. आणि होते
सगळे अवघड स्वताला सावरताना..

जग विसरते मी फक्त तुझाच विचार
करताना..

तू असलास कि उरत नाहीत कुठल्याच
अडचणी..

सगळी संकटे जातात पळून..
घेते मी ओढून बेभान आशेच्या पंखांना..

जग विसरते मी फक्त तुझाच विचार
करताना..

तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात
खुलताना, जग
विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

तू विसरलास रे मला,

मी मात्र तुला कधीचं
विसरले नाही .....

तू सोडून गेल्यापासून,

मी कधीचं निवांत झोपले नाही .....

खूप आठवण येते रे तुझी,

खूप त्रास होतो रे तुझ्याविना जगताना .....

तूला मात्र काहीचं वाटलं नाही,

मला एकटी सोडून जाताना .....

याचं डोळ्यांनी पाहीलयं मी,

तूला माझी फसगत करुन दुसरीचा होताना .....

तू सोडून गेलास मध्येचं,

मी मात्र रडतेय
त्या आठवणी आठवताना .....

खूप काही केले रे तुझ्यासाठी,

तू मात्र परखं केलं मला मी तुझी असताना .....

खूप त्रास होतो रे तुझ्याविना जगताना .....

खूप त्रास होतो रे तुझ्याविना जगताना .....



Vaibahv........

जन गण मन अधिनायक जय है


जन गण मन अधिनायक जय है
भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधू गुजरात मराठा
द्राविड उत्कल वंग
विंध हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधी तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तब जय गाथा
जन गण मंगल दायक जय है
भारत भाग्य विधाता
जय है,जय है,जय है ,
जय,जय,जय,जय है ..!!
भारत माता कि जय, भारत माता कि जय , भारत माता कि जय .!

ये भारत देश महान है.

ये भारत देश महान है.
ये मेरा देश महान है.
इसके लहराते खेतों का,
अन्न हम सबने खाया है.
कल कल करती नदियों से,
शीतल जल हमने पाया है.
इसके उत्पादित वस्त्र से
अपना तन भी ढक पाया है.
इसकी पावन शालाओं में
ज्ञान सदा हमने पाया है.
इसके हर इक नर -नारी से
प्यार सभी ही पाते हैं.
इसकी प्यारी मिट्टी को हम
अपना शीश झुकाते हैं.
इस पावन भूमि में हमने,
अपना जीवन सफल बनाया है.
ये स्वर्ग से भी महान है,
ये मेरा देश महान है.



vaibhav....

असेल का कुणी मला जीव


असेल का कुणी मला जीव
लावणारं
ठेच लागता मला
सावरणारं,
मी रागात असता मला
समजून घेणारं,
असेल का कुणी...
माझ्या सोबत चालणारं...
... सुखात आणि दु:खात
मला साथ देणारं..
असेल का कोणी...
जीवाला जीवाला जीव
देणारं,
मरण समोर असता,
माझ्या सोबत येणारं.
असेल का कोणी...
माझ्या सोबत जगणारं
माझ्या सोबत
मरणार..


Vaibhav.....