Pages

Thursday, July 5, 2012

ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे

.
 
ती बघते तेव्हा राधा बनुनी चित्त चोरते माझे
अंतरात माझ्या श्याम बोलतो "राधे... राधे.. राधे...!" 
... 

ती बघते तेव्हा गंध प्यायले रंग उधळती वारे
मज वाटे रंगित, गंधित, धुंदित भवतालीचे सारे 


ती बघते तेव्हा असे वाटते बघून बघतच राहो 
क्षण एक आज हा इथेच ऐसा क्षणभर थांबुन राहो 


ती बघते तेव्हा विशाल अंबर पायी लोळण घेते
प्राशून सागराला मी उरतो मुठीत धरणी येते 

ती बघते तेव्हा लाजलाजरे गाल गुलाबी होती
मधुशाला सारी जणू मांडली लाल रसील्या ओठी 

ती बघते तेव्हा हृदयामधुनी तीर पार तो जातो 
मी 'हाय' बोलुनी पुन्हा पुन्हा तो छातीवरती घेतो 

ती बघते तेव्हा शब्दांचाही गोंधळ थोडा उडतो  
अर्थास शोधणे व्यर्थच होते, फक्त पसारा उरतो !
 
 

बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी 'त्या'ने

 
बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी 'त्या'ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावित 'तिज'ला नियमाने!
कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!
गुलाब कसले? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!
प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!
कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा!
या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगत करी मग मनातले बोल!
अशा तर्‍हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!
अखेर थकला! ढळली त्याचि प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या!
धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, 'देवी!
(दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.)
'बांधित आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्तांचे काज?
गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले?'
तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, 'आळ वृथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी'
असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!
म्हणे, 'पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद!
कशास डोळे असे फिरविता का आली भोंड?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड!'
क्षणैक दिसले तारांगण त्या,-परि शांत झाला!
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला!!
'प्रेमापायी भरला' बोले, 'भुर्दंड न थोडा!
प्रेमलाभ नच! गुलकंद तरी कशास हा दवडा?'
याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
ह्रदय थांबुनी कधीच नातरि तो असता 'खपला'!
तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
'प्रेमाचा गुलकंद' तयांनी चाटुनि हा बघणे!
 
 

"रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करतो,

 
"रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करतो,
न चुकता तुझ्यासाठी काहीतरी मागत असतो,
एकदा देव म्हणाला कधी तरी चुकून स्वतासाठीपण मागत जा रे,
त्याला म्हटले तिच्याशिवाय माझे आयुष्य तरी आहे का रे? 

... मला झोपायला जमीन दिलीस तरी चालेल .... पण तिला तू मखमली पलंग दे,
मला दिवसभराची भूक दिलीस तरी चालेल ... पण तिला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
मला तू भले अंधारात ठेव पण तिच्यासाठी ... न विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
माझ्या वाटेला दुखाश्रू आले तरी चालेल ... पण तिला नेहमी आनंदात ठेव,
माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल ... पण तिच्या हृदयात माझे स्थान असाच ठेव,


माझे मागणे ऐकून देवपण थक्क झाला,

कधी न रडणाऱ्या देवाचा डोळा पण तेव्हा पानावला,

का करतोस इतके प्रेम तिच्यावर जिने प्रेम तुझे स्वीकारले नाही,

का मरतोय तिच्यासाठी जिने जगणे तुझे मान्य केले नाही,


मी म्हटले सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला भेटतील ,

जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात पडशील... "
 
 

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला...

 
डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीहि विसरता विसरत नाही... 
भुरळ पडून जातेस ग तू मनाला, 
आणि सांज का हि होत नाही.... 

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीही विसरता विसरत नाही... 
डोळे मिटले असो किव्हा असो उघडे, 
तूच दिसतेस ग समोर, 
आणि दुसर कोणीच दिसत नाही.... 

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीही विसरता विसरत नाही... 
देवाला हि भुरळ पडून आलीस तू, 
मी तर फक्त एक कवी आहे, 
याच मातीने घडवलं त्याने ग मला... 

पण,
नक्की विचारेन जाऊन मी त्या देवाला,
कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?.....
कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?.
 
 

तू आणि तुझं सर्व विश्व


तू आणि तुझं सर्व विश्व
अगदी माझं बनून गेलं होतं
ज्या क्षणी तुझ्या मध्ये
मी स्वतःला सामावून घेतल होतं

तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न
अगदी माझ्या डोळ्यात जगत होती
ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात
मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास
माझ्या जगण्याची दिशा बनली होती
ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला
मी अंतर्मनाने भुलली होती ...
 
 

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण ,
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !
...
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..
 

मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही

मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा, कोणी मला खुणावलेच नाही...

...
स्वप्नंसदृश्य आयुष्य माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन कधी फुलले कळलेच नाही...

दुखाच्या क्षणात डुबत चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास माझा कळलेच नाही...

आशाच सोडली होती मी परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...

कधीच अलग होऊ नकोस प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून, तर तुझ्याविना आता जगणेच नाही..
.
 
 

ती आवडते मला, मी हि तिला आवडे

ती आवडते मला, मी हि तिला आवडे
हे बोलण्याची गरज आम्हाला कधीच ना पडे
तीझ्यासोबतच्या आठवणींचे मज हृदयात सडे
पण एक अनोळखी मर्यादा नेहमीच नडे

... ती सोबत असताना वाटे समयही स्तब्द व्हावा
तो एक क्षण कधीच पुढे न जावा
जगून घेतो आम्ही सर्व आयुष्य त्या क्षणात
कोणास ठाऊक काय घडणार आहे भविष्यात

तीझी सावली जाताच भासे उन्हाची झळ
ती म्हणजे... माझ्या आयुष्यातलं मृगजळ
काही नात्यांना नावांमध्ये नाहीच बांधता येत
काही नात्यांना नावांमध्ये खरच.... नाहीच बांधता येत..
 
 

तुझी लाट बनवून गेली किनारा तरावे कुठे मी बुडावे कुठे

 
तुझी लाट बनवून गेली किनारा तरावे कुठे मी बुडावे कुठे
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

... असावे इथे तू असे वाटताना पहावे इथे नेमके तू मला
उखाणे तुलाही उखाणे मलाही उखाणेच ते उलगडावे कुठे?

नशीबी जरी रोज असती उपेक्षा ..अपेक्षा कधी संपल्या का कुठे
शरीरास या श्वास उच्छवास सांगे तुला सोडुनी वावरावे कुठे?

दिसेना तुला मी - मला सांगते तू- क्षितीजा पुढे काय दिसते तुला?
परीघात फिरतो तुझ्या मी कधीही तुझ्यातून मी मावळावे कुठे?

तुला पाहिल्यावर तुझ्यातच हरवतो ठरवतो सदा होत जावे असे
कळावे तुझ्या मुग्ध अधरास तेव्हा असे जिंकणे नोंदवावे कुठे?

अरे जीवना काय देतोस धमक्या मला फक्त तू एवढे सांग रे
नडावे कशाला नडावे कुणाशी नडावे किती अन् नडावे कुठे?
 
 

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना
... बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं आनंदात न्हाताना
माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
 
 

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

तू नेहमी सुखांशी केला करार राणी
मी नेहमी सुखांची झालो शिकार राणी
... आहे सदैव याची जाणीव पांघरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

फिरलो किती कितीशी अज्ञात अंतराळे
जपले किती कितीसे अश्राप पावसाळे
जाते क्षणात सारे वार्‍यावरी विरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन

देऊन हूल आता या ऊन सावल्यांना
जाऊ निघून राणी आपापल्या दिशांना
हृदयातले उधाण जाईल ओसरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन...

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन
 
 

वाटत कधी.. जगाव चांगल आयुष्य

वाटत कधी.. जगाव चांगल आयुष्य
हसाव खूप खळखळून
उडाव उंच भरारी घेऊन..
सुंदर कोवळ्या हिरवळीला

...
वाटत कधी.. असाव कोणी आयुष्यात..
हातात हात धरून,
बघाव स्वप्न मिळून..

वाटत कधी.. नसावी एकटी कधी आयुष्यात..
मनातल सुख दुख वाटून,
बघाव हलका होऊन..
ओठातले हे शब्द,
ऐकावे कोणी हळूच..

वाटत कधी... भेटाव माझ आयुष्य
डोळ्यातले हे अश्रू,
पुसावे कोणी प्रेमाने हळूच..
चेहर्यावरचे खरे हास्य,
द्यावे कोणी आणून..

वाटत कधी.. बघाव निरखून हे आयुष्य..
डोळ्यात कोणाच्या प्रेम
आणि मनात समाधान साठवून..
आयुष्यात त्याच्या गरज,
माझी द्यावी त्याने पटवून..!

काळजीत त्याच्या हरवून
बघाव सोबत चालून..
बघाव स्पर्श करून..

किती गोड आहे आपले हे प्रेम...........

किती गोड आहे आपले हे प्रेम...............
किती सुंदर आहे आपले हे नाते.............
एकमेकांच्या प्रेमात चिंब बुडालेले असणे..........
एकमेकांच्या आठवणीत एकटेच हसणे ...........

... नजर न लागो कोणाची आपल्या या नात्याला .........
उभी रहा अशी दृष्ट काढतो नजर न लागो आपल्या प्रेमाला......
दूर झालो एकमेकांपासून तर एकटे जगू शकणार नाही.....
दूर झालो एकमेकांपासून तर स्वताला सांभाळू शकणार नाही ..........

सवय झालीय तुज्या मोहक हास्याची............
सवय झालीय तुज्या लाडिक बोलण्याची..............
सवय झाली आहे तुज्या स्वप्नांची......
सवय झाली आहे आयुष्य तुज्याबरोबर पाहण्याची....
 
 

थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम कराव

 थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम कराव
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं..
मग आपणच जाऊन Sorry म्हणावं, असं प्रेम कराव
वर वर तिच्या भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी,

... पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं, असं प्रेम कराव
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं,
पुन्हा त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं..
असं प्रेम करावं..
 
 

मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...

 मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...
जीवनात चालू आलं... माझ्या प्रियेचं पाऊलं...
रिक्त चौकट भरली... सारी सारुनिया धूळ...
गहिवरला गाभारा... असं सजलं राउळं...
... मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!

ओढ लागली जीवाला... जणू पडली भुरळ...
मोहोरला रानोमाळी... एक विरक्त बकुळ...
रोमी शहारे उठवी... तिच्या आठवांचे खूळ...
स्पर्शभासाने फुलली... गोड गुलाबांची फुलं...
मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!

को-या आकाशी दाटली... गर्द ढगांची झाकोळं...
टपोर थेंब टिपायला... मनचातक व्याकूळ...
गर्दी जाहली स्वप्नांची... आतुरलं स्वप्नांकुल...
दारी उंबराही झाला... तिच्या स्वागता काकुळं...
मन वेडुलं वेडुलं... त्याला लागली चाहूलं...!
 
 

मन् वेडं प्रत्येकाच असतं.....



मन वेडं
प्रत्येकाच असतं
कुणाच कमी,
कुणाच जास्त असत..
मन वेडं...
कधी ना कधी
नक्की फ़सतं
कुणाच रडत बसतं
कुणाच उगाचच् हसतं
मन वेडं...
हे खुप नशीबवान असतं
आपल्याच नकळत हे
तिच्यासोबत असतं
मन वेडं...
हे पाखरां सारख असतं
ते पंखाने उडत असतात
हे मात्र
पंखाविना उडत असतं
मन वेडं...
हे कधीच आपलं नसत
ते फ़क्त तिचच असत
कधी हरवल तर्
तिच्या सावली मागे सापडतं....
मन् वेडं
प्रत्येकाच असतं
कुणाच कमी
कुणाच जास्त असत.. ..
 
 

तीचं माझं नातं अस असावं

तीचं माझं नातं अस असावं
कोवल्या उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं
वाटत तीन जवळ बसावं
स्वत:शीच गालात हळुच हसावं
जमलंच तर् एखाद गाण म्हणावं
किंवा नुस्तच मुक्याने बोलत रहावं

तिच माझ नात अस असावं….
वाटत तीला जवळ घ्यावं
नुस्तच तीच्याकडे बघत रहावं
मिठीत तीच्या हरवुन जावं
हळुच तीच्या ओठातल अम्रूत प्यावं

तिचं माझ नातं असं असावं…
माझं सुख तीला सांगावं
दुख्ख तीचं जाणून घ्यावं
हळुच तीच्या कुशीत शिरावं
मोठं होउन सांत्वन करावं

तिचं माझं नातं असं असावं…
 
 

मैत्री कि प्रेम ....


 

एक मुलगी होती साधी सरळ थोडीसी खट्याळ....नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली....
आणि
एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला....
अशीच दोघांची एकदा ओळख झाली
.....आणि त्यांची छान मैत्री झाली....
त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले....
ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची....
जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा.
तिला विचारायचा
"का ग क...ाल तू फोन नाही केला,मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची ".
ती त्याला त्याला म्हणायची कि,
" नाही sorry काल नाही जमल फोन करायला".
तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा... त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा...
रोज त्यांचे फोन आणि sms चालू राहिले...त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे...
तिने किती हि ठरवलं कि आपण त्याला जास्त sms नाही करायचं...
तरी हि त्याला sms केल्याशिवाय तिला करमत नसे..ती त्याला sms करायची......
त्याचं बोलन वाढू लागल होत....ती एकटी असली कि त्याचाच विचारात गुंतायची...
किती हि ठरवलं कि नाही त्याचा विचार करायचा तर हि .... ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत जात होती....कारण ती
त्याच्या प्रेमात पडली आहे हे तीच तिलाच कळल नाही...........
त्याच्या विचारात असताना त्याचे बोलणआठवून स्वतःशीच एकटी हसायची....गाण गुणगुणत
बसायची.
" पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले "
आता तिला त्याची सवय झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं... आणि तिला
त्याच्यशी बोलल्याशिवाय राहवत नसे....त्याच्या आवाजात ती आनंदी व्हायची....
हळू हळू ती त्याच पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.
तो तिला विचारायचा..."अग ं तुला कस कळल कि माझ मूड खराब आहे ते...?."
ती त्याला म्हणायची "मैत्री केली आहे.... थोड फार तरी कळू शकत "..
अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली...त्याच्य ाशिवाय तिच्या मनात कोणी नसे..
...तिला त्याच्याबद्दल सगळ माहित आहे होत.... तो कसा आहे ? त्याचा स्वभाव कसा आहे ?
त्याच दिनक्रमच तिला माहित झाल होत..तो कधी जेवतो.... घरी किती वेळ
असतो... मित्रान बरोबर किती वेळ असतो...कधी झोपतो कधी उठतो..तिला हि वाटत
होत कि तो तिच्यावर प्रेम करत आहे..... पण तस काही नव्हते.
असच एकदा तिने त्याला फोन केला....दोघांच् या पण गप्पा छान रंगल्या होत्या
..आता तिला त्याच्या मनातल जाणून घ्यायचं होत....पण काही केल्या तिला ते
जमत नव्हते...मग त्यानेच तिला विचारले" तू लग्न कधी करतेस ?".त्यावर ती
चटकन त्याला म्हणाली..." छे ! एवढ्यात लवकर नाही अजून वेळ आहे बघू "....मग
तीने त्याला विचारलं " तू कधी करतोस लग्न"..तो तीला म्हणाला " मी लग्न
करणार नाही. मी एकटाच बरा आहे..".ती खूपदुखी होते... काही क्षण तिला काहीच
सुचत नाही..हा असा का बोलत आहे..पण स्वतःला सावरून ... ती परत त्याला
विचारते... " तू असा का बोलत आहे .... तुझ्या आयुष्यात काही घडल आहे
का?"..तो अपसेट होऊन तिला म्हणतो " होय, आणि आता मला कोणीच नको मी एकटाच
बरा आहे खूप सुखी आहे ".त्याच्या आयुष्यात खूप काही घडल आहे असे तिला वाटू
लागल..मग ते दोघे तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू लागतात ... आणि ती
त्याच कोमजलेला चेहरा फुलवते...
" सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?"
तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत... तो नकळत तिला बोलून जातो.
"तू खूप चांगली आहेस... तुझ चांगलच होईल..."
पण ती मनातल्या मनात म्हणत असे..... माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्यासोबत असशील"
करण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती...........