एक कटोरी हातात घेऊन..
त्यात एक गच्च भरलेली पाणी-पुरी
ती उचलून तोंडात भरायची
तिचं ते गटकन फुटुन तोंडभर पसरणं
मग सगळीकडुन येणारा पूर आणि धूर
कधी तोंडातून.. कधी नाकातून
कानशीलाजवलून वहाणारा ओघळ घामाचा
लागलेला तो ठसका जीवघेणा..
आणि त्यानंतर रेंगाळलेली ती चव.. हवी हवीशी.!!
.
.
आयुष्यही असच काहीसं..
रोज त्याला हातात घेऊन उभं रहायचं
नव्याने भरलेली पाणी-पुरी खायची..
उसळणा-या लाटात मग डुंबायचं की बुडायचं..
ते ज्याचं त्यानेच ठरवायचं
लागतो कधी जीवघेणा ठसकासुद्धा
आणि त्यानंतर जगावसं वाटणारा दिवस नवा नवासा..!!
.
.
पण .. फक्त..
"भय्या... ज़रा मिठा बनाना" असे इथेही सांगता आलं असतं तर.. !!!!
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
एकमेकांना दिलेल्या दुःखांवर
एकमेकांन सोबत घालवलेल्या अनेक
आनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी..
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
अनेक जुन्या आठवणींनी आणलेले
एकमेकांच्या डोळ्यातील
आनंदाश्रु पुसण्यासाठी.....
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
आयुष्यात पुढे येणारया अनेक
दुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्या
हातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात
एक मेकांचा हात धरण्यासाठी,
एकमेकांना सावरण्यासाठी............
तु माझ्यासोबत चाललेली
ती चार पावलं मला आठवतात
तूझं हसणं, तूझं रूसणं,
मला तूझे स्पर्शही जाणवतात
मला अजूनसुद्धा आठवते
तुझ-माझी वाट पहाणं
मला अजुनसुद्धा आठवतं
तुझं पावसात चिंब नहाणं
ते आंब्याच झाड, मला
आजसुध्दा खुणावतं
आजसुध्दा मन माझं
त्याच दिवसात हरवतं....
तुलाही आठवत असेनच
ती रमलेली संध्याकाळ
तु मिठीत माझ्या शिरलेली
आणि बरसलेलं आभाळ
त्या चांदण्या, तो चंद्र,
ती रात्र, तो शहारा..
मी वेड्यासारखा वेचत रहातो
त्या आठवणींचा पसारा
ते दिवस मला आठवतात,
त्या आठवणी डोळ्यात साठतात
मी वाट देतो त्यांना
आणि अश्रु गालांवरून सांडतात...
facebook वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना chat मध्ये (प्रेमाने)
शिवी घालुन, मुलींशी मात्र सभ्य
भाषेत बोलतो ,
तो मुलगा मराठी असतो...!!
... ऑनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...!!
मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना embarrassing वाटेल
असे कही फारवर्द करत नाही ,
तो मुलगा मराठी असतो...!!
चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले
मागतात,
पण जो'I Respect your Privacy'
म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...!!
Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले
असतात,
पण जो'Whts Real,Virtual ?
Friends Are Forever'असे म्हणतो,
तो मुलगा मराठी असतो...!!
college madhye अनेक मुले असतात
पण जो सर्वांना सतत मदत करीत
असतो
तो मराठी मुलगा असतो...!!!
तुझा पहिला वहीला स्पर्श...
तुला पाहून लपवता न आलेला हर्ष...
सगळ सगळा पुन्हा अनुभावावसे वाटतंय...
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...♥
तुझं लाड लाड मला सार जग बक्षिसं देणं..
जोषात येऊन तू मला चांदणं तोडून देणं..
स्वप्नांच्या त्या विश्वात मला पुन्हा जगावंस वाटतंय..
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...♥
तुझं मला वेडू म्हणून हाक मारण..
मी चिडले की तुझं खोटा खोटा हसणं..
तूझे माझ्या वरचे प्रेम,पुन्हा एकदा अनुभवास वाटतंय...
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय..
हो आहे मी वेडा....
घराला 'विसावा' किंवा 'शांती' नाव देऊन घरात सगळ्यांशी यथेच्च भांडणारे जर 'सभ्य' असतील ना...
तर हो आहे मी वेडा...
गांधीजींच्या विचारांचं भांडवल करून त्यांचीच प्रतिमा असलेल्या नोटांसाठी राजकारण करणारे जर 'चाणाक्ष' असतील ना...
तर हो आहे मी वेडा...
शाळा-कॉलेजात नेहमी पहिल्या नंबर वर येणारे पण वाचन, कला, संगीत, सौंदर्य यापैकी कशाचाही गंध नसणारे जर 'हुशार' असतील ना...
तर हो आहे मी वेडा...
अमेरिकेची सुधारती आर्थिक स्थिती याबद्दल बोलणारे पण स्वतःच्या देशातली गरिबी हटवू न शकणारे जर 'विचारवंत' असतील ना...
तर हो आहे मी वेडा...
परदेशात Six digit salary कमावणारे पण मायदेशी आपल्या आप्तेष्टांच्या सुखं-दुखात सामील होऊ न शकणारे जर 'विद्वान' असतील ना...
तर हो आहे मी वेडा...
आणि आपल्या फायद्या साठी सगळ्यांशी गोड-गोड बोलणारे जर 'चांगले' असतील ना...
तर हो आहे मी वेडा...
आहे मी वेडा..
कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,
तरी तुझ्या प्रेमात पडलो मी..
तुझ्या सोबत जगण्याचे,
सुंदर स्वप्न पाहिले मी..
या स्वप्नाला माझ्या डोळ्यांत,
सदैव साठवून ठेवले मी..
स्वप्न हे स्वप्नाचं असते,
उशिरा हे जाणले मी..
तुझ्या प्रेमात पूर्णपणे,
स्वःताला विसरून गेलो मी..
पण नशिबाला मान्य नव्हते,
तुझ्या सोबत जगावे मी..
तुचं म्हणायचीचं ना,
प्रेम फक्त एकदाचं होतं..
आज तु दुस-या कुणासोबत करत आहेस,
मग ते काय एवढं तरी सांग ?
तुचं म्हणायचीचं ना,
जगणार नाही माझ्याशिवाय..
मग आता जगतेस कसं,
ते तरी सांग.. खोटी होती गं सगळीचं वचने तुझी,
खोटेचं असेन तुझे प्रेम ही..
मी मात्र खरा होतो,
खरे होते प्रेम माझे..
जेव्हा तुला कळेल माझ्या प्रेमाची किँमत,
तेव्हा पुन्हा माझ्याकडे येऊ नको..
मी त्यावेळी ही फक्त तुझाचं असेन,
फक्त तु पुन्हा माझी होऊ नको..
एकदा तुटलेली काच,
जशी पुन्हा जोडता येत नाही..
तशीचं आहे गत प्रेमाची,
एकदा ह्रदय तुटलं की पुन्हा खरे प्रेम कधीचं होत नाही..