या अहो घाला घाव कुणी फ़ोडा हा बाधं
होऊद्या मुक्त मला पाहूद्या सागरकाठची साजं
नातं आमचं फ़ार जुन युगा युगात महान
मला भेटूद्या सागरा लागली सागराची तहान.
डोगंर द-याचे मला निरोप द्यायचे आहेत
डोळे भरुन त्याला पुन्हां पहायचे आहे
कुशीत शीरुन त्याच्या मनसोक्त रडायचे आहे
काही झाले तरी ही सरीता सागराचीच आहे.
तुमचं शिवारं पीकण्यासाठी मी माझी शिवर गाळतेय
तुमची तहान भागण्यासाठी मी कारावास भोगतेय
वा रे माणसा वा हीच तुझी माणूसकी का रे
तुझ्या प्रकाशासाठी मी इथे काळोखात राहतेय.
माझ्या वाटा बदं करुन तुमची घर सजवलीत
ओघळत्या आसवांवर माझ्या तुम्ही पीकं रुजवलीत
आता तरी जाऊदे मला हे जिवन सपंण्याआधी
या फ़ाटक्या चादरीची आता सारी ठिळगं उसवलीत.
हात जोडते पाया पडते बघा आली मी शरण
मुक्त करा मला या कोणी तरी तोडा हा धरणं
सपंण्याआधी आता तरी लाभुदे सौभाग्य मला
एक इच्छा माझी येवो मला सुवासीनीच मरण.
ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणालाविखूरलेल्या स्वप्नांची मी पहावी वाट कशालाएक तुझ्या सोबतीचा आधार होता मलाआज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.मावळत्या सुर्याची ईथे आज आस कुणालाषितीजाच्या रगांची पहावी कुणी पहाट कशालाआज तुझीही साऊली हरवली याच साधीप्रकाशातआज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.मी दिल्या असख्यं हाका कुणी देईल साद कशालाकिचांळत्या काळजाची कुणी एकेल हाक कशालामाझ्या सा-या हाका ईथेच विरल्या या वादळांतआज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.
त्या चादंण्याचां काटा माझ्या मनात रूतलेला
वेडा जिव माझा चद्रांच्या मिठीत लपलेला
मग चद्रंही माझा चादंण्या पाहून लाजलेला
आठवते रात्र पोर्णीमेची चद्रं माझा चिबं भिजलेला
चद्रांला पाहून कुशीत माझ्या चादंण्याना राग आला
पाहून रुप चद्रांच एक तारा जळून राख झाला
त्या पोर्णीमेच्या रात्री मला अनोखा भास झाला
तेव्हांपासुन मी चद्रांचा आणी चद्रं माझा श्वास झाला.
प्रेमाची लहर पाहून वादळंही गार हवा झाली
गारवा साहण्यासाठी मग ढगांनी चादर केली
पहाटेच्या प्रकाशात मग चादंण्याना झोप आली
कळालच नाही चद्रांच्या मिठीत कधी रात्र गेली.
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.
कल्पनांचा पूर आता ओसरलाय
आता मला कविता सुचत नाहीत
शब्दच जणू काही हरवलेत माझे
कवितेत ते कुठेच दिसत नाहीत.
कवितेसाठी पुन्हां हा बाधं
या धरणाचा तुटावा लागेल
पुन्हां कल्पनांना पाण्यात वाहत
माझ्याकडे यावं लागेल.
कवितेसाठी पुन्हां माझ्या
पापण्यानां ओल व्हांव लागेल
ओघळल्यावर आसवे माझी
विचारंना त्यात भिजावं लागेल.
भिजण्याच्या भीतीने मग
माझेशब्दही माझ्याकडे परत येतील
आल्यावर पूर कल्पनांचा मग
कविताही माझ्या ओसरीला येतील.
आज अस वाटलं की कोणी
जिवनात माझ्या डोकाउन गेलं
आज अस वाटलं की कोणी
मनात माझ्या पाहून गेलं
माझे डोळे बदं होते त्यावेळी
आणि श्वास जणू यांबला होता
मग असं वाटलं की कोणी
ह्दयाचे टोके कोणी मोजून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू केस माझे कुरवाळून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू पदराने मला झाकून गेलं
मला आटवतयं उश्याकडे कागंद
होती आणि हातात पेन होता
आज अस वाटलं की मानेखाली
मग उशी कोणी सरकवुन गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू दु:ख माझं जाणून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू डोळे माझे पुसून गेलं
हो ती नक्कीच माझी माय होती
माझी आई आणी कोणी नाही
मग पदराने डोळो पुसले कोणी
आणि देवापुटे हात कोणी जोडून गेलं.
इथे सारेच कलाकार मी कोण आहे
माझी किमंत काय कोणला जाण आहे
सारेच बहरलेत इथे हिरवळीत हिरव्या
मी कोण, सुकलेलं एक पिपंळ पान आहे.
इथे सारेच कामवाले मीच बेकार आहे
इथे सारेच आवरलेले मीच सुटार आहे
सारेच सुखावलेत इथे शब्दा शब्दांनी
मी कोण, निशब्द शब्दाचा उकार आहे.
इथे सारेच जिकंलेले मीच हरणारा आहे
इथे सारेच हसणारे मीच रडणारा आहे
सारेच हसतात इथे उगाच मोठेपणासाठी
मी कोण, शब्दा शब्दातुन आसवे गाळणारा आहे.
इथे सारेच यशस्वी मीच अपयशी आहे
इथे सारेच र्निदोष मीच अपराधी आहे
सारेच जगतात इथे आनदांत मनभरुन
मी कोण, दुखाःच्या नावेचा खलाशी आहे.
इथे सारेच यात्री मीच वनवासी आहे
इथे सारेच प्रतिसादी मीच अभिलाशी आहे
सारेच तड्पतात इथे ज्या अमुल्य आसवांसाठी
मी कोण, मी त्या आसवांचा जुना प्रवासी आहे.
तु माझी तु मझी म्हणत दिवस गेलेपण मी मात्र तुझा कधीच नाही झालोएक रात्र गेली तुझ एक स्वप्न गेलंमी मात्र तुझ्या स्वप्नांत कधीच नाही आलो.मी तुझ्यासाठी कधीच काही नाही केलप्रत्येक प्रयन्तात अपयशी मी झालोखरचं तुला मी कधीच काही नाही दिलतुझी प्रत्येक इच्छा काळजात साठवत गेलो.सांर आयुश्य बढाया मारण्यात गेलनेहमी खोटया स्वप्नांत मी जगत गेलोआज मागे वळून पाहील तर काहीच नव्ह्तंप्रत्येक वळनावर काही ना काही हरत गेलो.फ़क्त एक तुझी साऊली माझ्या सोबत होतीपण मी तीचीही साथ नाही देवु शकलो वाटंल तिच्यासोबत आयुश्य जगेन मी आतापण तीलाही मी आज काळॊखात घेवुन गेलो.
त्याने तुला काल एक गुलाब दिलं
आणी तु तोडलेला देट मी उचलला
उगाच कोणाला काटा लागु नये म्हणुन
आणी तो काटा माझ्याच काळंजात रुतला.
रात्रभर तुझाच प्रश्न माझ्या मनाला पडला
रात्रीच्या वाद्ळात दारातला पारीजातही पडला
फ़ुल वेचतानाही तुझ दर्शन नाही व्हायच आता
उरलेल्या फ़ुलांचा सडा तुझ्याच अगंणात पडला.
तु आज आहेस त्याच्या गुलाबात दगं
मझ्या अगंणात उरलाय टोचणारा निवडूगं
कोप-यातला मोगरा असाच सुकुन गेला
कारण तुला जडला आज आबोलीचा छदं.
उगाच नाही पुराच पाणी माझ्या अगंणात आलं
तु इकडे फ़िरकु नयेस म्हणुनच अस झालं
आता मीही लावेन गुलाब आणी आबोली अगंणात
पारीजातकाचं आणी मोग-याच झालं ते झालं.
पण एकही फ़ुल काही तुझ्या वाट्याला नाही येणार
मी त्यानां सुकलेल्या मोग-याची शप्पत देणांर
पारीजातकाच्या फ़ाद्यांपासुन कुपंण बनवतोय मी
तु येणा-या रस्त्यावर निवडूगं पहारेकरी म्हणून ठेवणांर.
दगडांना मी फ़ुलं समजतो परी मी कवि नाही जनांनोमी एक वेडा दगड मारणांराफुलं समझून दगड मारतो.मृगजळांनी मी भुमी भिजवतोअख्खं आभाळ डोळ्यात साठवतोपसरवुन जाळे पाणवट्यावर मी चद्रंबिबं माझ्या जाळ्यात पकडतो.स्वप्नांत पिऊन अमृत अमर होतोमी चद्रांलाही कधी काजवा समजतोमला ना पारख ना जाण चागंल्याचीसमजुन कल्पवृक्ष बाभळीस कवटाळतो.दोन शब्दांसाठी सारं विश्व धुडांळतोनाहीच मिळाले तर अक्षंर गुडांळतोमी कुठे शब्दांचा सौदागर सा-यापरीसौदागरापुढे शब्दांचा सौदा मदांवतो.आज मला कोण इथे ओळखतोकोंण मला या शब्दांत इथे शोधतोमी तर एक शब्द खूळा खुळ्यातलामाझा शब्दही मला खुळाच ठरवतो.
जेव्हां हात तुझा हातात होतातुझ्यासगे लाबं चालत रहायचीआता घराच्या बाहेर पडत नाहीमन घाबरतं कुठेतरी हरवायची.जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचामी त्याला आधार समजायचीआता उभी राहताच तोल जातो मझाधडपडताना तेव्हां तुझा हात धरायची.जेव्हां तु माझ्या जवळ होतासतेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होतीआता काटे विखरलेत अगंणात माझ्यातेव्हां फ़ुल माझ्या दारात होती.जेव्हां तु माझ्या काळजात होतासतेव्हां आत्मा माझ्या मनात होताआता मी इथे जिवंत प्रेत झालेयकारणं जिव माझा तुझ्यात होता.
मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढेस्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडेवाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारंआज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडेता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडेतु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातलीआता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढेउधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडेआठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतंआज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे.तु म्हणतेस मागुन बघ मिळेल तुला प्रेम कोणाकडेकोण येइल घरात माझ्या काय आहे आता या शुन्याकडेइथेच शब्दांनाही थाबंवतोय मी आता काय करु कारणतुझ्या आठवणी पुन्हां आल्या आहेत माझ्या पापण्यांकडे.
आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालोकाय दोश माझा मी या वादळांत मिळालोखरतर दोश तुझा नाही चुक माझीच होतीनेहमी सोडून सत्य स्वप्नांच्या मागे मी पळालो.अचानक त्या क्षितीजाच्या रगांवर मी भूललोलागल्या असंख्य ठेचा पण नाही मी सुधरलोप्रत्येक वळनावर तुझी मागुन हाक होतीखरतर मीच मुर्ख कधी मागे नाही वळलो.प्रत्येक वळनावर मी मार्ग बदलत रहीलोतु जवळ आली नाहीस मी दुर जात राहीलोशेवटी प्रेमाच्या गाठी तुही सोडत गेलीस मी वेड्यापरी त्या धाग्यांच टोक शोधत राहीलो.तु जिकंलीस नाही पण मी मात्र हरत राहीलोतुला दगड म्हणता म्हणता मीच दगड झाहलोपण ओलावतील पापण्या तुझ्या विरहात जेव्हांलक्षात ठेव तेव्हा तु हरलीस आणी मीच जिकंलो.
कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी.
कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.
कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी
कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला आठवणीचां अर्थ कुठे माहीत
आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठी.
प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी
ते एक मन ज्याला दगड बनवले मी
कधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळे
म्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.
ज्या आसवांनी या रत्रीनां जागवले मी
ते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मी
पण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेत
म्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.
तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी
उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.
तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मी
तुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मी
तुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागत
म्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी.
नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय या सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.
जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे
आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे
नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.
कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.
कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.
कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.
कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे
दिवस आलेत.
मी दिल्या शब्दा असंख्य हाका शब्द ना मागे वळला कधी
शब्दासाठी झाहलो शब्द्खुळा शब्द ना मज मिळाला कधी
शब्द सकाळ, शब्द मध्यान, शब्द सांज, शब्द निशा कधी
मी गाळली असंख्य आसवे पण शब्द माझा ना पाझरला कधी.
शब्दासाठी हा सारा प्रयास पण शब्दा तो ना कळला कधी
शब्दासाठी हा धडपडता प्रवास पण हात शब्दाने ना धरला कधी
शब्द सागर शब्द कीनारा शब्द वारा मग शब्द वादंळ कधी
मला मिळाल्या असंख्य ठेचा पण शब्द माझा ना ओघळला कधी.
शब्दात माझा जिव गुतंला पण जिव शब्दचा ना जडला कधी
मी लिहील्या असंख्य कविता पण शब्दा त्या ना कळळ्या कधी
शब्द जिवन शब्द संसार शब्द अस्तिव्त शब्द कविता कधी
झालो मी आज निशब्द कवि पण शब्दा हा कवि ना कळला कधी.
आज जिवन माझं प्रश्नचिन्हं पण शब्दास हा प्रश्न ना पडला कधी
शब्दाच्या ओजंळीत श्वास माझा शब्दाने हा जिव ना सोडला कधी
शब्द साउली शब्द आधार शब्द आयुश्य शब्द सर्वस्व कधी
शब्दासाठी मी नेहमी शून्यच होतो पण हा शब्द मी ना खोडला कधी.
कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा।
एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना
सोडूनी हात कधी पळतात वाटा।
पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते
जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा।
पाहूनी त्या वळणावर आसवांना,
काळोखाआड कधी गळतात वाटा।
कोणी बोले दुनिया तर गोल आहे
फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?
तीही सोडून मला वळनात गेली
तीच्या वाचून मला छळतात वाटा।
हो येथेच सुरवात , इथेच अंत...........
माणसाने प्रेमात असावेच असे काही नाही,
पण प्रेमाहूनही जास्त, जणू "मैत्री"त असे काही.
प्रत्येकाला एक प्रेयसी असावीच असे काही नाही,
पण प्रेयसीहून समजूतदार, एक मैत्रीण अशी काही.
रस्त्यावरून चालताना जिने हात धरावाच असे काही नाही,
पण सोबत चालताना कधी साथ न सोडावी अशी काही.
जिने मनातले सर्व काही सांगावेच असे काही नाही,
पण माझ्या मनातले नकळत जाणून घ्यावे अशी काही.
खोडसाळपणा केल्यास हळूच हसावेच असे काही नाही,
पण कानाखाली वाजवायला लाजणार नाही अशी काही.
जिला कॉफी साठी विचारताच हो म्हणावीच असे काही नाही,
पण घरी नेऊन सर्वांसमोर कॉफी पाजावी अशी काही.
तिला गिफ्ट देता तिने स्वीकारावेच असे काही नाही,
पण वाढदिवशी न दिल्यास हक्काने मागणारी अशी काही.
मला भेटण्यासाठी घरी थाप द्यावीच असे काही नाही,
पण घरी उशीर झाल्यास माझ्यासोबतच होती सांगणारी अशी काही.
जगात प्रेमाचंच नाते सारे काही असते असे काही नाही,
तर प्रेमाहूनही अधिक जपता येणारे, जसे मैत्रीचे नाते असे काही..