Pages

Saturday, May 19, 2012

पोटात माझ्या चूक होती


 
















पोटात माझ्या चूक होती
अवस्था किती नाजूक होती

पुसतात मग तोंडास पाने
जी माणसे कामूक होती

कित्येक दिसले हासताना
ती पोरगी चाबूक होती

मग सोडले उपवास त्याने
काया तिची साजूक होती

नाते कधी ना जोडतो पण
श्वशुराकडे बंदूक होती  :

गरतीस मी भेटून आलो
मर्जी तिची ठाऊक होती


सूर्यासमोर करता धिक्कार काजव्यांचा















सूर्यासमोर करता धिक्कार काजव्यांचा
मानाल घन तमी पण उपकार काजव्यांचा

रात्री उरास घेता भाड्यावरी कवडसे
दिवसा उजाड असतो बाजार काजव्यांचा

धग तापल्या घराची होते असह्य तेव्हा
शीतल प्रकाश भावे गुलजार काजव्यांचा

त्यांच्या प्रकाशण्याचा कसला उदात्त हेतू?
लुकलुक करीत चाले शृंगार काजव्यांचा

गरजेल तोफ तेव्हा विझतील प्राणज्योती
खिंडीत होत पावन निर्धार काजव्यांचा

अस्ताचलास गेले तेजोनिधी नृसिंह
दिल्लीत आज भरतो दरबार काजव्यांचा

हा र्‍हास की विवशता सामान्य माणसांची?
सोडून सूर्य करती सत्कार काजव्यांचा  


घातला तो खोल वर्मी घाव होता






















घातला तो खोल वर्मी घाव होता
सूड घेणे हाच तीचा डाव होता

कौतुकाने बोलणे ते ढोंग होते
सभ्यतेचा नाटकी तो आव होता

कोण जाणे काय आता होत आहे 
शांतता ही मूक, आत तणाव होता

गाठला पल्ला, कसा ना जाणतो मी?
केव्हढा तोही अवघड चढाव होता

डागल्या गोळ्या  चुकीच्या सावजावर
काळजाचा नेमका तो ठाव होता 

फसवले तीने मला हे सत्य होते 
ऐकणारा तो मुजोर जमाव होता

हृदय माझे, खेळणे केलेच होते
मीच होतो चोर, तो तर साव होता

हो ! म्हणाली एकदाची भेटण्याला
धूर्त आता, मांडला मी, डाव होता

मनात काही चलबिचल होते




















मनात काही चलबिचल होते
त्याचीच मग पुढे गझल होते
कोडे सत्याचे सुटत नाही
कधी न स्वप्नांची उकल होते
तुझ्या मी सोबतीने चालता
जगणे श्वासांची सहल होते
निष्कर्ष काढणे कुठे जमले
कळले ते नुसतेच कल होते
खऱ्याचे धैर्य देण्याऐवजी
शपथेस गिता, बायबल होते
हवा तो रंग वेळेला दिला
असे झब्बे शुभ्रधवल होते
तुझा उंबऱ्याला स्पर्श होता
झोपडीही ताजमहल होते
तुला वगळून मी लिहितो तरी
गझल नेमकी मुसलसल होते

जीवनाच्या वाटेवर चालावे लागते एकट्याला



















 जीवनाच्या वाटेवर चालावे लागते एकट्याला,
थोड्या काळासाठीच संगती असतात सोबतीला.
जीवनाच्या वाटेवर चालावे लागते काट्या मधुन,
फ़ुले सुध्दा असतात कधी कधी अधुन मधुन.
जीवनाच्या वाटेवर मिळवण्यासाठी यश,
पहिल्यांदा पचवावे लागते अपयश.
यश नक्कीच मिळत प्रयत्नातुन,
पण प्रयत्न करावे लागतात मनातुन.
जीवनाच्या वाटेवर चालने नाही सोपे,
वाटेवरुन जाताना बसतात जबर धक्के,
लागतात साथीदार त्यासाठी पक्के.
जीवनाच्या अवघड वाटेवर साथ असते मनाची,
आपली साथ आपणच करायची.
जीवनाच्या वाटेवर असतात खाच खळगे,
या वाटेवर रुनझुनताना आयुष्य जाते सगळे.
तरीही या वाटेवर सगळे चालतच राहतात,
सुखाच्या एक झुळकेने दुःख सगळे विसरुन जातात.

सागरात या आयुष्याच्या काठ शोधू चला

















 सागरात या आयुष्याच्या काठ शोधू चला,
प्रपंचात या ओळख आपुली स्वतंत्र निर्मू चला,
हसू ठेवून चेहऱ्यावरती आसू सारे विसरू चला,
जीवनाच्या वाटेवर या दिलखुलास आता जगू चला....

स्वप्ने बघता उद्याची आज सतविते कालचे भय,
काचेच्या स्वप्नांची काळोखात विस्कटत जाते लय,
तेजोमय घर बांधून तिमीर हा भेदू चला,
जीवनाच्या वाटेवर या दिलखुलास आता जगू चला....

खडतर हे अंतराळ कापत जाऊ सलग,
हातामधला हात तरी ना होऊ देऊ विलग,
काटेरी मुलखात या गंधित फुले शोधू चला,
जीवनाच्या वाटेवर या दिलखुलास आता जगू चला....

झाड बनून एका जागी निस्तब्ध या बसू,
सावल्या अंथरू घनदाट धरेवर अन् गालातच हसू,
दु:ख ऊन,वारा,पावसाचे वरवर या झेलू चला,
जीवनाच्या वाटेवर या दिलखुलास आता जगू चला....

नको नको म्हणताना ही हळवे काही बोलू चला,
हृदय कठोर आहे ज्यांचे त्यास मृदू बनवू चला,
कटूतेस इथल्या मिळून सारे गोडवा जरा देऊ चला,
जीवनाच्या वाटेवर या दिलखुलास आता जगू चला..

केव्हातरी मिटण्यासाठीच

















केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती
काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते
असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे
माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही
– कुसुमाग्रज

आभाळ भरून आल्यानंतर
















आभाळ भरून आल्यानंतर
एकमेकांना भेटण्याचा संकेत अगदी अलीकडचा.
सर्व ऋतू खुडून तिच्या तळहातावर मी.
नजरेतील व्याकूळ प्रार्थना ती मला नजराणा देते.
संध्याकाळ मंद मंद चुळबुळत राहते
आकाशाभोवती.
बागेतल्या बुटक्या गवतावरून
सरपटत राहतो
मनातला हिरवा साप.
नुसत्या आभाळाकडे पाहून
पावसाचे अनुमान करता येत नाही.
म्हणून तिच्या तळहातावरची आरास
मी विस्कटून टाकतो.
ती आक्रोश करत राहते, मौनातून मौनात.
इथल्या तांबूस संबंधातला पालापाचोळा
झटकत ती उठते आणि
शब्दांचा नजर बंद करून
चालू लागते प्रार्थनेकडे.
आता
चर्चबेल अधिक जोरात
घणघणत राहते
माझ्या निरभ्र मेंदूत.

नको फुलासारखी, शंभर सुगंध देणारी


















नको फुलासारखी, शंभर सुगंध देणारी .....
नको सुर्यासारखी, सतत तापलेली .....
नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देणारी .....
नको सावळीसारखी, कायम पाठलाग करणारी ....
मैत्री .....
हवी आनंदासारखी, सुख दुखात समान साथ देणारी .....
तर मग कराल ना मजबरोबर "मैत्री".........................................................

जेव्हा एकटं रहावसं वाटतं















 जेव्हा एकटं रहावसं वाटतं.
 गोड हसणं मनातल्या मनात दाटतं.
 उघड्या डोळ्यांना स्वप्न पडतात.
 प्रेमपाखर ही हसत रडतात.
 तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो. …

थंड हवा मंजुळ होवुन जाते
. आकाशाचं छतं चांदण्यांनी भिजून जाते.
 तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.

जेव्हा फक्त तिचीचं आठवण य़ेते.
 फक्त ती आणि ती दिसते सगळीकडे.
अशक्य गोष्ट शक्य झाल्यासारखी वाटते.
 तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.

माझ्या कल्पित कथांमध्ये मी























माझ्या कल्पित कथांमध्ये मी
मलाच गुंतवत होतो
बेधुंध होऊन त्यात मी
गुरफडून जात होतो
… कधी एकटाच जोरजोरने हसत
तर कधी ढसाधसा रडत होतो
का कुणास थाऊक?
मी कल्पनेतच रमत होतो
कल्पनांना वास्तव समजून
मी त्यातच जगत होतो
आता कळते कल्पनांमध्ये
काहीच मिळत नाही
हसलो वा राडलो तरी
कुणालाच कळत नाही
कल्पनांना वास्तविक जीवनांमध्ये
काहीच महत्वा नाही
जन्माला येण्याआधीच जगण्याला
काहीच अर्थ नाही
भूतकाळात किव्हा भविष्काळात जगण्याला
खरच का? काही महत्व आहे
जेव्हा सर्व काही आपल्याला
वर्तमानात करायचे आहे
भूतकाळात रमल्याने
एकतर आनंद मिळतो वा दु:क्ख
जेव्हा भोगून झाले सर्व काही
मग चिंता करण्यात काय अर्थ
भविष्यात रमल्याने
चिंता असते काहीतरी करून दाखवण्याची
वर्तमानातच करणार नाही काही
तर कुठून येईल भविष्यात काही